मुख्यमंत्र्यांच्या ‘त्या’ तोडग्यावर काँग्रेसचा आक्षेप; आव्हाडांच्या निर्णयावर पटोले नाराज!

By ऑनलाइन लोकमत | Published: June 23, 2021 09:05 PM2021-06-23T21:05:24+5:302021-06-23T21:06:58+5:30

टाटा कॅन्सर रुग्णालयाला म्हाडाच्या १०० सदनिका उपलब्ध देण्याच्या निर्णयाबाबत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

nana patole asked jitendra awhad over decision to allot flats to tata cancer hospital | मुख्यमंत्र्यांच्या ‘त्या’ तोडग्यावर काँग्रेसचा आक्षेप; आव्हाडांच्या निर्णयावर पटोले नाराज!

मुख्यमंत्र्यांच्या ‘त्या’ तोडग्यावर काँग्रेसचा आक्षेप; आव्हाडांच्या निर्णयावर पटोले नाराज!

Next

जळगाव: टाटा कॅन्सर रुग्णालयाला म्हाडाच्या १०० सदनिका उपलब्ध करून देण्याच्या निर्णयावर महाविकास आघाडीमध्ये चांगलाच कलगीतुरा रंगताना दिसत आहे. या निर्णयाला देण्यात आलेली स्थगितीवर अवघ्या २४ तासांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तोडगा काढला. मात्र, आता यावरून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी नाराजी व्यक्त केली असून, ‘टाटा’ला जनतेचा वाटा देण्याची गरज काय, अशी विचारणा नाना पटोले यांनी केली आहे. (congress nana patole asked jitendra awhad over decision to allot flats to tata cancer hospital)

काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते टाटा कॅन्सर रुग्णालयाला १०० सदनिका देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. खुद्द शरद पवारांच्या हस्ते मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी या सदनिकांच्या चाव्या सुपूर्द करण्याचा कार्यक्रम घेतला होता. मात्र, या शिवसेना आमदार अजय चौधरी यांनी याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र लिहून तक्रार केली होती. यानंतर या निर्णयाला स्थगिती देण्यात आली. मुख्यमंत्र्यांनी अचानक दिलेल्या स्थगितीमुळे जितेंद्र आव्हाड नाराज झाले होते. त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन निर्णयाला स्थगिती दिल्याची खंत व्यक्त केली आणि स्थगितीवर केवळ २४ तासांत यावर तोडगा काढण्यात आला. यावर आता नाना पटोले यांनी तीव्र आक्षेप घेतला आहे.

‘टाटा’ला जनतेचा वाटा देण्याची गरज काय?

राज्य सरकारच्या तिजोरीत पैसे नाहीत. अशा परिस्थितीत टाटाने आपला सीएसआर फंड वापरावा. टाटाला जनतेचा वाटा देण्याची गरज काय, असा सवाल नाना पटोले यांनी केला आहे. या निर्णयावर महाविकास आघाडी सरकारमध्ये एकमत नसल्याचे आता पाहायला मिळत आहे.

तर २४ तासांत निर्णय झाला नसता

मुख्यमंत्र्यांनी आजच्या आज त्याच परिसरात जागा शोधून निर्णय घ्या असे सांगितले अन् १५ मिनिटांत निर्णयही झाला. जर महाविकास आघाडी सरकारमध्ये कुठलाही संवाद नसता तर २४ तासांत निर्णय झाला नसता. काल स्थगिती मिळाली आणि आज त्याच परिसरात तेवढ्याच जागा देऊ शकलो याचा आनंद आहे, अशी प्रतिक्रिया जितेंद्र आव्हाड यांनी दिली आहे. 
 

Web Title: nana patole asked jitendra awhad over decision to allot flats to tata cancer hospital

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.