“देशातील जनता भाजपला कंटाळलीय, काँग्रेस पक्ष हाच सक्षम पर्याय”: नाना पटोले

By ऑनलाइन लोकमत | Published: August 26, 2021 08:53 PM2021-08-26T20:53:34+5:302021-08-26T20:55:46+5:30

काँग्रेसला माननारा मोठा वर्ग असून काँग्रेस हाच सक्षम पर्याय आहे, असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले म्हणाले.

nana patole says congress party is the only capable option | “देशातील जनता भाजपला कंटाळलीय, काँग्रेस पक्ष हाच सक्षम पर्याय”: नाना पटोले

“देशातील जनता भाजपला कंटाळलीय, काँग्रेस पक्ष हाच सक्षम पर्याय”: नाना पटोले

Next
ठळक मुद्देराज्यातील परिस्थिती सध्या काँग्रेस पक्षाला अनुकुल आहेकाँग्रेसला माननारा मोठा वर्ग असून काँग्रेस हाच सक्षम पर्यायराज्यात काँग्रेस एक नंबरचा पक्ष व्हावा यासाठी बुथ कमिट्या सक्षम करण्यावर भर

मुंबई:काँग्रेस पक्ष हा राष्ट्रीय पक्ष असून सर्वात जुना आणि मोठा पक्ष आहे. राज्यातील परिस्थिती सध्या काँग्रेस पक्षाला अनुकुल आहे. काँग्रेसला माननारा मोठा वर्ग असून काँग्रेस हाच सक्षम पर्याय आहे, असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले म्हणाले. टिळक भवन येथे विधानसभा, लोकसभा २०१९ च्या निवडणुकीतील काँग्रेस पक्षाच्या पराभूत उमेदवारांची बैठक संपन्न झाली. या बैठकीत प्रदेशाध्यक्ष नाना पटोले बोलत होते. (nana patole says congress party is the only capable option)

मोदी सरकारची BPCL खासगीकरणासाठी तयारी सुरू; ‘या’ तीन कंपन्यांमध्ये मोठी चढाओढ

ते पुढे म्हणाले की, २०१९ च्या निवडणुकीत काँग्रेसचे जवळपास १४ ते १५ उमेदवार अत्यंत कमी मताने पराभूत झाले आहेत. आता आगामी निवडणुकी जास्तीत जास्त उमेदवार कसे निवडून येतील यासाठी आपला प्रयत्न असेल. राज्यात काँग्रेस एक नंबरचा पक्ष व्हावा यासाठी बुथ कमिट्या सक्षम करण्यावर भर द्या. काँग्रेसचा विचार तळागाळापर्यंत पोहचवा, देशातील जनता भारतीय जनता पक्षाच्या कारभाराला कंटाळली आहे. शेतकरी आंदोलन करत असून त्यांच्याकडे सरकार लक्ष देत नाही, महागाई, बेरोजगारीची समस्या मोठी असून जनतेला भेडसावणाऱ्या या समस्यांकडे केंद्रातील भाजपाचे सरकार दुर्लक्ष करत आहे. केंद्रातील सरकार कोरोनाची परिस्थिती हाताळण्यातही सपशेल अपयशी ठरले आहे. केंद्र सरकारचे हे अपयश जनतेपर्यंत पोहचले पाहिजे. पक्ष संघटना बळकट करण्यावर भर द्या आणि समर्पण भावनेने काम केल्यास काँग्रेसची कामगिरी उज्ज्वल होईल, असे पटोले म्हणाले.

“आता कार्यालयावर हल्ला झाला, तर ईट का जवाब पत्थर से देंगे”; भाजपचा थेट इशारा    
     
या बैठकीला प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, माजी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे, प्रदेश कार्याध्यक्ष नसीम खान, चंद्रकांत हांडोरे, आ. कुणाल पाटील, सेवादलाचे प्रदेशाध्यक्ष विलास औताडे, संजय निरूपम, प्रदेश उपाध्यक्ष हुसेन दलवाई, मोहन जोशी, चारुलता टोकस, मधु चव्हाण, रमेश बागवे, वसंत पुरके, प्रदेश प्रवक्ते अतुल लोंढे व डॉ. सुधीर ढोणे आदी उपस्थित होते.

Web Title: nana patole says congress party is the only capable option

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.