नाना पटोले लहान माणूस, त्यांच्या बोलण्याने फार फरक पडत नाही, प्रफुल्ल पटेल यांची शेलक्या शब्दात टीका

By ऑनलाइन लोकमत | Published: July 16, 2021 05:05 PM2021-07-16T17:05:35+5:302021-07-16T17:13:34+5:30

Praful Patel Criticize Nana Patole: मला काँग्रेस म्हणून एच के पाटील प्रभारी काय म्हणतात हे जास्त महत्वाचे आहे. त्यात जास्त तथ्य असते, कारण ते थेट हाय कमांडचे प्रतिनिधी म्हणून बोलतात

Nana Patole is a small man, his speech does not make much difference, Praful Patel's criticism in shellac words | नाना पटोले लहान माणूस, त्यांच्या बोलण्याने फार फरक पडत नाही, प्रफुल्ल पटेल यांची शेलक्या शब्दात टीका

नाना पटोले लहान माणूस, त्यांच्या बोलण्याने फार फरक पडत नाही, प्रफुल्ल पटेल यांची शेलक्या शब्दात टीका

googlenewsNext

नागपूर - महाविकास आघाडीचे जनक आहेत शरद पवार आहेत. ते ठाकरे सरकारचे नेते आहेत. आघाडी म्हणून जे काही आहे त्याचे मार्गदर्शक पवारच. तेच पुढे राहतील. म्हणून बाकीचे लोक काय इकडे तिकडे बोलतात त्यावर आम्ही रोज काय उत्तर द्यायचे ? अशा शब्दात राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना टोला लगावला नागपुरात ते पत्रकारांशी बोलत होते.

पटेल म्हणाले, आता त्यांच्या पक्षात काय सुरू आहे? चव्हाण, थोरात भेटायला गेले होते तेव्हा एच. के. पाटील काय बोलले,   ह्याचा अर्थ काय, इशारा तुम्हाला माहितीच आहे. नाना पटोले लहान माणूस आहेत, नाना पटोलेंच्या बोलण्याने खूप फरक पडत नाही. पण एक आहे की तो एक मीडिया इव्हेंट झाला आहे. मला काँग्रेस म्हणून एच के पाटील प्रभारी काय म्हणतात हे जास्त महत्वाचे आहे. त्यात जास्त तथ्य असते, कारण ते थेट हाय कमांडचे प्रतिनिधी म्हणून बोलतात, अशी रोखठोक भूमिका पटेल यांनी मांडली.

शिव सेनेत कोण नाराज आहे हे माहिती नाही, पण आमच्या पक्षात कोणी नाराज नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. प्रशांत किशोर हे कन्सल्टंट आहेत. भाजपचेही होते. पश्चिम बंगाल निवडणुकीनंतर त्यांनी कन्सल्टन्सी सोडली असल्याचे स्पष्ट केले आहे. ते कुणाला भेटत असतील तर भेटू द्या. शेवटी आज राजकारणाची दिशा कुण्या एका व्यक्तीमुळे ठरत नसते, असा टोलाही त्यांनी लगावला.

Web Title: Nana Patole is a small man, his speech does not make much difference, Praful Patel's criticism in shellac words

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.