शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे नवे मुख्यमंत्री कोण? सस्पेन्स अजून कायम; १ किंवा २ डिसेंबरला शपथविधी होणार
2
निवडून येतात तेव्हा गपगार, पराभवानंतर EVM ला दाेष; काेर्टाने याचिकाकर्त्यांना फटकारलं
3
कुजबुज! एका छताखाली कोणता झेंडा हाती?; पराभूत उमेदवार आता देवदर्शन करणार
4
प्रत्येक निवडणुकीनंतर EVM विरोधात घोंघावणारे हे वादळ कायमस्वरूपी शमविण्याची गरज
5
...तर महाराष्ट्रात खळबळ उडेल; उद्धव - राज यांनी एकत्र येण्याला आणखी कुठला मुहूर्त हवा?
6
गुजरात ते मुंबई प्रवासात हत्येचा थरार?; तीन वर्षांनी हत्येचा गुन्हा, तपास सुरू
7
...तोपर्यंत कांजूर डम्पिंग बंद करणे अशक्य; मुंबई महापालिका पर्यायी जागेच्या शोधात
8
पश्चिम रेल्वेवर वाढणार एसी लोकलच्या १३ फेऱ्या; वातानुकूलित फेऱ्यांची संख्या ९६ वरून १०९
9
इन्फ्लुएंझामुळे मुंबईकर ‘आजारी’, राज्यात ५७ रुग्णांचा मृत्यू; काय आहेत लक्षणे?
10
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
11
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
12
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
13
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
14
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
15
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
16
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

...तर वाराणसीमधून निवडणूक लढवणार, प्रदेशाध्यक्षपद स्वीकारताच नाना पटोलेंचं थेट मोदींना आव्हान

By बाळकृष्ण परब | Published: February 11, 2021 1:40 PM

Nana Patole Challenge to Narendra Modi : काँग्रेसचे प्रदेशाध्यक्षपद स्वीकारताच नाना पटोले भाजपा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात कमालीचे आक्रमक झाले आहेत.

ठळक मुद्देभाजपा आणि मोदी सरकारच्या धोरणांवर टीका करताना आता नाना पटोले यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींना दिले आव्हानकाँग्रेस पक्षाने आदेश दिल्यास पंतप्रधान नरेंद्र मोदींविरोधात वाराणसीमधून निवडणूक लढवण्याची आपली तयारी आहेराज्यातील काँग्रेसचे एकमेव लोकसभा खासदार बाळू धानोरकर यांनीही काही दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदींना आव्हान दिले होते

नागपूर - आक्रमक शेतकरी नेते म्हणून ओळख असलेल्या नाना पटोले यांची नुकतीच काँग्रेसच्या (Congress) महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी निवड झाली आहे. दरम्यान, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्षपद स्वीकारताच नाना पटोले भाजपा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात कमालीचे आक्रमक झाले आहेत. भाजपा (BJP) आणि मोदी सरकारच्या धोरणांवर टीका करताना आता नाना पटोले यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींना आव्हान दिले आहे. (Nana Patole Challenge to Narendra Modi)काँग्रेस पक्षाने आदेश दिल्यास पंतप्रधान नरेंद्र मोदींविरोधात वाराणसीमधून निवडणूक लढवण्याची आपली तयारी आहे, असे विधान करत नाना पटोले यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींना आव्हान दिले आहे. काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी निवड झाल्यानंतर पहिल्यांदाच नागपूरमध्ये आलेल्या पटोले यांचे जंगी स्वागत करण्यात आले. त्यानंतर पटोले यांनी हे विधान केले.दरम्यान, राज्यातील काँग्रेसचे एकमेव लोकसभा खासदार बाळू धानोरकर यांनीही काही दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदींना आव्हान दिले होते. २०२४ च्या निवडणुकीमध्ये पक्षाने आदेश दिल्यास वाराणसीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींचा डोनाल्ड ट्रम्प करून दाखवेन अशी गर्जना राज्यातील काँग्रेसचे एकमेव खासदार बाळू धानोरकर यांनी केली होती.  पक्षश्रेष्ठींनी आदेश द्यावा, बाळू धानोरकर तुम्ही निवडणूक लढवण्यासाठी वाराणसीला जावा. मग तिथे जाऊन निवडणूक नाही लडलो आणि नरेंद्र मोदींना नाही पराभूत केलं, तर मी बाळू धानोरकर नाही, असा इशाराच बाळू धानोरकर यांनी दिला होता.पंतप्रधानपदासाठी दावेदारी केल्यानंतर नरेंद्र मोदी यांनी निवडणूक लढवण्यासाठी उत्तर प्रदेशमधील वाराणसी मतदारसंघाची निवड केली होती. या मतदारसंघातून लोकसभेच्या दोन निवडणुकांमध्ये मोदी मोठ्या मताधिक्याने विजयी झाले आहेत. टिकैत यांचे अश्रू भाजप नेत्यांना दिसले नाहीत; नाना पटोले यांची टीकाराज्यसभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी भावूक झाले. पण  शेतकऱ्यांसाठी लढणाऱ्या राकेश  टिकैत यांच्या डोळ्यातील अश्रू भाजप नेत्यांना दिसले नाहीत. मोदींना नटसम्राट व्हायचे असेल तर त्यांनी सिनेमात जावे, अशी टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली.  पटोले म्हणाले, अन्नदाता हा प्रमुख घटक अहे. पण मोदींनी शेतकऱ्यांच्या मार्गात खिळे ठोकले. एवढी क्रूरता दाखविली. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसह संपूर्ण जनतेला आम्ही हे तीन काळे कायदे समजावून सांगू. राष्ट्रप्रेम, राष्ट्रभक्ती हे भाजपने देशाला शिकवू नये. पंतप्रधान मोदी लोकसभेत उभे राहून आंदोलनजीवी अशी उपरोधिक टीका करतात. ही नवी परंपरा त्यांनी सुरू केली. हे त्यांचे नवे देशप्रेम लोकांनी ओळखले आहे, अशी टीका त्यांनी केली.

टॅग्स :Nana Patoleनाना पटोलेcongressकाँग्रेसNarendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपाPoliticsराजकारण