Nanded By election 2024 Shedule: महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीचा बिगुल वाजला. केंद्रीय निवडणूक आयोगाने झारखंड आणि महाराष्ट्र या दोन्ही राज्यांच्या विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला. त्याचबरोबर नांदेड आणि वायनाड या दोन लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीची घोषणा केली. (Nanded Election 2024 Date in marathi)
नांदेड लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसचे वसंतराव चव्हाण विजयी झाले होते. त्यांचे आजाराने निधन झाले. त्यामुळे ही जागा रिक्त झाली. तर राहुल गांधी यांनी राजीनामा दिल्याने वायनाड लोकसभा मतदारसंघाची जागा रिक्त झाली होती. या दोन्ही मतदारसंघासाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे.
नांदेड लोकसभा पोटनिवडणूक संपूर्ण वेळापत्रक; मतदान, निकाल कधी?
निवडणूक अधिसूचना - २२ ऑक्टोबर २०२४
उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची तारीख - २९ ऑक्टोबर
उमेदवारी अर्ज पडताळणी तारीख - ३० ऑक्टोबर २०२४
उमेदवारी अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख - ४ नोव्हेंबर २०२४
मतदानाची तारीख - २० नोव्हेंबर २०२४
निकाल - २३ नोव्हेंबर २०२४
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक : मतदान कधी, निकाल कधी लागणार?
- निवडणुकीची अधिसूचना - २२ ऑक्टोबर २०२४
अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख - २९ ऑक्टोबर २०२४
उमेदवारी अर्ज पडताळणी - ३० ऑक्टोबर २०२४ अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख - ४ नोव्हेंबर २०२४
मतदान- २० नोव्हेंबर २०२४
निकाल- २३ नोव्हेंबर २०२४