दिंडोरीत 'आत्राम' पॅटर्न? अजित पवारांचं गोकूळ झिरवळांनी वाढवलं टेन्शन!

By ऑनलाइन लोकमत | Published: September 24, 2024 05:58 PM2024-09-24T17:58:25+5:302024-09-24T18:00:45+5:30

Sharad Pawar Dindori vidhan sabha 2024 : शरद पवारांच्या रणनीतीमुळे दिंडोरी लोकसभा मतदारसंघातून भास्कर भगरे यांना संसदेत पोहोचले. आता शरद पवार विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत. दिंडोरी विधानसभा मतदारसंघात अजित पवारांच्या राष्ट्रवादीत मोठ्या घडामोडी सुरू आहेत. 

Narahari Jirwal's son Gokul Jirwal is preparing to contest elections from Sharad Pawar's NCP in dindori vidhan Sabha | दिंडोरीत 'आत्राम' पॅटर्न? अजित पवारांचं गोकूळ झिरवळांनी वाढवलं टेन्शन!

दिंडोरीत 'आत्राम' पॅटर्न? अजित पवारांचं गोकूळ झिरवळांनी वाढवलं टेन्शन!

Narhari Zirwal Gokul Zirwal Sharad Pawar : लोकसभा निवडणुकीतील अपयश बाजूला सारून अजित पवार सध्या पायला भिंगरी बांधून राज्यभर फिरताना दिसत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रभाव असलेल्या मतदारसंघांमध्ये अजित पवारांनी जास्त लक्ष्य केंद्रीत केल्याचे दिसत आहे. पण, पक्षातीलच नेत्यांच्या घरं दुभंगताना दिसत आहे. कारण धर्मरावबाबा आत्राम यांच्यानंतर नरहरी झिरवळ यांचा मुलगाही शरद पवारांच्याराष्ट्रवादी काँग्रेसच्या वाटेवर असल्याचे दिसत आहे. नरहरी झिरवळ यांचे सुपुत्र गोकूळ झिरवळ यांनी काही दिवसांपूर्वी जयंत पाटलांची भेट घेतली होती. पण, आता ते राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या शिवस्वराज्य यात्रेत सहभागी झाले. त्यामुळे दिंडोरीत 'आत्राम' पॅटर्नची पुनरावृत्ती होण्याची चर्चा सुरू झाली आहे.   

काही दिवसांपूर्वी गोकूळ झिरवळ यांनी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची भेट घेतली होती. 'मीच जयंत पाटील यांची भेट घेण्यासाठी पाठवलं होतं', असे स्पष्टीकरण नरहरी झिरवळ यांनी दिलं होतं. पण, आता गोकूळ झिरवळ यांनी चक्क राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या शिवस्वराज्य यात्रेच्या स्वागताचे बॅनर्स लावले. इतकंच नाही, तर ते त्यात सहभागीही झाले. 

शरद पवारांच्या पक्षात प्रवेश करणार?

लोकसभा निवडणुकीचे निकाल लागल्यापासून गोकूळ झिरवळ शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चांना तोंड फुटले. त्यानंतर गोकूळ झिरवळ हे शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांना भेटले. आता त्यांनी शरद पवारांच्या पक्षात असल्याचेच अप्रत्यक्षपणे सांगून टाकले. 

"दिंडोरीतून लढण्यासाठी मी इच्छुक आहे, पण पक्ष आणि महाविकास आघाडी ज्याला उमेदवारी देईल, त्याचा आम्ही प्रचार करू. त्याला निवडून आणण्यासाठी प्रयत्न करू. राजकीयदृष्ट्या महाविकास आघाडी म्हणून आम्ही एकत्र राहू", असे उत्तर गोकूळ झिरवळ यांनी दिले. त्यामुळे अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नसल्याचे झिरवळ यांनी स्पष्ट केले. 

गोकूळ झिरवळांबद्दल बोलताना जयंत पाटील म्हणाले की, "त्यांचे माझ्यावर प्रेम आहे. गोकूळ य़ांच्या पक्ष प्रवेशाबद्दल चर्चा झाली नाहीये. त्याबाबत बोलणंही झालेलं नाही. पण, उमेदवारी मिळावी यासाठी त्यांनी अर्ज केला आहे. पक्षाने अजून उमेदवार ठरवलेला नाही", असे उत्तर जयंत पाटील यांनी दिले. 

दिंडोरीत आत्राम पॅटर्न?

काही दिवसांपूर्वी अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार धर्मरावबाबा आत्राम यांच्या मुलीने वडिलांच्या विरोधात जाऊन शरद पवारांच्या पक्षात प्रवेश केला. त्यांना अहेरी विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी दिली जाणार असे मानले जात आहे. त्याच पार्श्वभूमीवर आता दिंडोरी विधानसभा मतदारसंघातही गोकूळ झिरवळ हे नरहरी झिरवळ यांना सोडून शरद पवारांकडे आले, तर वडील विरुद्ध मुलगा अशी लढत होऊ शकते. 

Web Title: Narahari Jirwal's son Gokul Jirwal is preparing to contest elections from Sharad Pawar's NCP in dindori vidhan Sabha

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.