Narayan Rane: ...अन् असे घडले अटकनाट्य! भाजपची खेळी फसली; राणे ट्रॅपमध्ये सापडले

By ऑनलाइन लोकमत | Published: August 25, 2021 08:19 AM2021-08-25T08:19:26+5:302021-08-25T08:20:30+5:30

NaRayan Rane Arrest Story: सोमवारी संध्याकाळपासूनच या घटनेची स्टोरी लिहिणे सुरू झाले होते. राणे यांचे विधान आल्यानंतर फीडबॅक घेण्यात आला. आंदोलनाचे काय पडसाद उमटतील याचाही आढावा घेण्यात आला. पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे आंदोलन तीव्र करण्यावर ठाम होते.

Narayan Rane: BJP's game failed; Rane found in trap and Arrested after Aditya Thackreay, Ajit Pawar's stand | Narayan Rane: ...अन् असे घडले अटकनाट्य! भाजपची खेळी फसली; राणे ट्रॅपमध्ये सापडले

Narayan Rane: ...अन् असे घडले अटकनाट्य! भाजपची खेळी फसली; राणे ट्रॅपमध्ये सापडले

googlenewsNext

- अतुल कुलकर्णी
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांच्या ‘त्या’ विधानानंतर भाजप आणि राणे यांच्या विरोधात शिवसेनेला राज्यभर मोठे आंदोलन उभे करायचे होते. त्यांना अटक करणे हा आंदोलनाचा मुख्य हेतू नव्हता. मात्र राणे यांनी दिवाणी न्यायालयात केलेला अर्ज फेटाळला गेला. उच्च न्यायालयानेही तातडीची सुनावणी नाकारली. तेव्हा ॲडव्होकेट जनरल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व गृहमंत्री यांची आपापसात चर्चा झाली. दोन्ही न्यायालयांनी राणे यांना दिलासा दिलेला नाही, त्यामुळे त्यांना अटक करणे हाच पर्याय आहे, असे सांगितले गेले आणि राणे यांना अटक करण्याचा मार्ग खुला झाला. (How Narayan Rane Arrested after BJP Fail in Politics.)

Narayan Rane: राणे कुटुंबिय कोकणात होते, मग वरुण सरदेसाईंनी आव्हान कोणाला दिले...
 

सोमवारी संध्याकाळपासूनच या घटनेची स्टोरी लिहिणे सुरू झाले होते. राणे यांचे विधान आल्यानंतर फीडबॅक घेण्यात आला. आंदोलनाचे काय पडसाद उमटतील याचाही आढावा घेण्यात आला. पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे आंदोलन तीव्र करण्यावर ठाम होते. तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुख्यमंत्र्यांविषयी कोणीही, काहीही बोलू लागले आणि आपण गप्प राहिलो तर उद्या प्रत्येक जण मुख्यमंत्र्यांना वाटेल ते बोलेल. मुख्यमंत्री कोणीही असो, त्या पदाचा मानसन्मान राखला जात नसेल, तर कारवाई हाच उपाय आहे, अशी भूमिका मांडली. त्यानंतर आदित्य ठाकरे यांनी युवा सेनेला कार्यरत केले. परिवहनमंत्री अनिल परब यांनी प्रशासकीय बाजू सांभाळली. मोठे आंदोलन उभे करण्याचे ठरले. त्यानुसार सकाळपासून आंदोलनही सुरू झाले. 

Narayan Rane: ...म्हणून शिवसेनेने भाजपला घेतले शिंगावर; एकत्र येण्याचे प्रयत्न फसले

पोलिसांनी पाऊल उचलताच राणे कोर्टात 

  • राज्याचे पोलीस महासंचालक आणि या विषयाशी संबंधित असणाऱ्या अधिकाऱ्यांनाच आंदोलनाची माहिती दिली होती. त्यानुसार आंदोलन सुरू झाले. 
  • त्यावेळी माध्यमांनी राणे यांना लवकरात लवकर अटक होणार अशा बातम्या सुरू केल्या. या बातम्या नाशिकचे पोलीस आयुक्त दीपक पांडे यांनी दिलेल्या पत्राच्या आधारे सुरू झाल्या होत्या. 
  • पांडे सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पोलीस प्रमुख होते. त्यावेळी त्यांचे आणि राणे यांचे संबंध फारसे चांगले नव्हते. त्याच पांडे यांनी दिलेल्या पत्रावरून पुढील कारवाई सुरू झाली होती. 
  • त्यामुळे राणे यांनीही वकिलांचा सल्ला घेऊन दिवाणी न्यायालयात अर्ज केला आणि तेथेच सगळे गणित बदलले.


Narayan Rane: केंद्रीय मंत्र्याला अटक होऊ शकते? देशभरातील मंत्र्यांमध्ये नारायण राणे तिसरे
 

योग्य वाटते ते करा; गृहमंत्र्यांच्या सूचना 

  • दिवाणी कोर्ट आणि हायकोर्टाचा राणे यांना दिलासा मिळाला नाही. त्यानंतर मुंबईत वरिष्ठ नेत्यांची विधी तज्ञांशी चर्चा सुरू झाली. 
  • चर्चेनंतर अटक करण्याचे आदेश दिले गेले आणि राणे यांना अटक झाली. या सर्व प्रकरणात राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांच्याकडे माध्यमांचे लक्ष होते. 
  • ते काहीतरी बोलतील, म्हणून माध्यमांनी त्यांना गाठले तेव्हा गृहमंत्र्यांनी माध्यमांच्या समोर गुप्तवार्ता आयुक्त आशुतोष डुंबरे यांना फोन केला. 
  • काय घडले हे त्यांनाच विचारले. नंतर ‘आमच्या तुम्हाला कोणत्याही सूचना नाहीत. कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने जे योग्य वाटते ते करा’, अशा सूचना गृहमंत्र्यांनी दिल्या. माध्यमांनी देखील त्याची बातमी चालवली. 


भाजपची खेळी फसली; राणे ट्रॅपमध्ये सापडले

  • राणे यांना अटक केल्यानंतर केंद्र सरकारमधून कोणाचीही फारशी प्रतिक्रिया आली नाही. शिवसेना दडपशाहीचे राजकारण करत आहे, असे चित्र तयार करायचे. दडपशाहीचा ठपका भाजपवर आहे. त्यामुळे प. बंगालमध्ये झालेले नुकसान भाजप विसरलेली नाही. महाराष्ट्रात ही खेळी खेळायची नाही. उलट शिवसेनाच दडपशाही करत आहे, असे सातत्याने सांगत राहायचे. 
  • राणे यांना मंत्रिपद सोडावे लागले तरीही फारशी चिंता करायची नाही, अशी रणनीती भाजपने आखल्याचे समजते. त्यामुळेच राणे यांच्या विधानाचे आम्ही समर्थन करत नाही असे महाराष्ट्रातील नेत्यांनी स्पष्ट केले. त्यामुळे राणे या ट्रॅपमध्ये सापडल्याची चर्चा आहे.

Web Title: Narayan Rane: BJP's game failed; Rane found in trap and Arrested after Aditya Thackreay, Ajit Pawar's stand

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.