शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: एकनाथ शिंदे ठरले वरचढ, उद्धव ठाकरेंना मोठा फटका; ५१ पैकी केवळ १४ जागाच जिंकल्या
2
कोण १६२ मतांनी तर कोण २०८ मतांनी विजयी; 'या' जागांवर पाहायला मिळाली चुरशीची लढत!
3
एकनाथ शिंदेंना साथ देणारे हे आमदार झाले पराभूत, शहाजीबापूंसह या नेत्यांना बसला धक्का
4
महाराष्ट्रातील निकालांचा देशाच्या राजकारणावर किती परिणाम होईल? ६ मुद्द्यांमध्ये समजून घ्या
5
टी-२० मध्ये अशी कामगिरी करणारा पहिला भारतीय ठरला हार्दिक पांड्या
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: महायुतीच्या बंपर विजयाचा संघाने रचला पाया; भाजपाने प्रचाराचा ट्रेंडच बदलला
7
"मी १० वी नापास झालो तेव्हा वडिलांनी केलेलं सेलिब्रेशन", अनुपम खेर यांनी सांगितला किस्सा
8
Maharashtra Assembly Election 2024 Results Highlights : "सर्व दिग्गज नेते एकाच वेळी पराभूत होतील असं होऊ शकत नाही, आम्हाला संशय..."
9
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 : भाजपातून शरद पवार गटात प्रवेश केलेल्या नेत्यांचं काय झालं? वाचा सविस्तर
10
'या' दोन नेत्यांनी भाजपच्या विजयात निभावली महत्त्वाची भूमिका, मध्य प्रदेशातही केली होती कमाल!
11
कश्मिरा शाहच्या नाकावरची पट्टी काढली, पोस्ट करत म्हणाली, "जखमेच्या खुणा..."
12
मविआचा सुपडा साफ, महायुतीनं सत्ता राखली; नवीन सरकारचा शपथविधी पुन्हा वानखेडेवर?
13
विधानसभा निवडणूक निकालानंतर तेजस्विनी पंडितच्या पोस्टने वेधलं लक्ष; म्हणाली, "आमचा राजा..."
14
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: बहिणींची मोठी साथ, जरांगे फॅक्टर निष्प्रभ; महाविकास आघाडीची पूर्णपणे धूळधाण
15
औक्षण करताना उडाला आगीचा भडका; नवनिर्वाचित आमदार थोडक्यात बचावले
16
कपूर कुटुंबात लग्नाची लगबग, पापाराझींसमोर पडता पडता वाचली करिष्मा; व्हिडिओ व्हायरल
17
आजचे राशीभविष्य - २४ नोव्हेंबर २०२४, मान व प्रतिष्ठा वाढेल, नोकरीत बढतीही होऊ शकते
18
यशस्वी भव:! सिक्सर मारत तोऱ्यात ठोकली सेंच्युरी; जैस्वालची खास क्लबमध्ये एन्ट्री
19
शरद पवारांचा पश्चिम महाराष्ट्र गड अखेर ढासळला; महायुतीने जिंकल्या ५८ पैकी ४६ जागा
20
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: उत्तर महाराष्ट्रात ‘महायुती’ची मुसंडी, काँग्रेसचे पानिपत; उद्धवसेनेलाही साफ नाकारले

Narayan Rane: ...अन् असे घडले अटकनाट्य! भाजपची खेळी फसली; राणे ट्रॅपमध्ये सापडले

By ऑनलाइन लोकमत | Published: August 25, 2021 8:19 AM

NaRayan Rane Arrest Story: सोमवारी संध्याकाळपासूनच या घटनेची स्टोरी लिहिणे सुरू झाले होते. राणे यांचे विधान आल्यानंतर फीडबॅक घेण्यात आला. आंदोलनाचे काय पडसाद उमटतील याचाही आढावा घेण्यात आला. पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे आंदोलन तीव्र करण्यावर ठाम होते.

- अतुल कुलकर्णीलोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांच्या ‘त्या’ विधानानंतर भाजप आणि राणे यांच्या विरोधात शिवसेनेला राज्यभर मोठे आंदोलन उभे करायचे होते. त्यांना अटक करणे हा आंदोलनाचा मुख्य हेतू नव्हता. मात्र राणे यांनी दिवाणी न्यायालयात केलेला अर्ज फेटाळला गेला. उच्च न्यायालयानेही तातडीची सुनावणी नाकारली. तेव्हा ॲडव्होकेट जनरल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व गृहमंत्री यांची आपापसात चर्चा झाली. दोन्ही न्यायालयांनी राणे यांना दिलासा दिलेला नाही, त्यामुळे त्यांना अटक करणे हाच पर्याय आहे, असे सांगितले गेले आणि राणे यांना अटक करण्याचा मार्ग खुला झाला. (How Narayan Rane Arrested after BJP Fail in Politics.)

Narayan Rane: राणे कुटुंबिय कोकणात होते, मग वरुण सरदेसाईंनी आव्हान कोणाला दिले... 

सोमवारी संध्याकाळपासूनच या घटनेची स्टोरी लिहिणे सुरू झाले होते. राणे यांचे विधान आल्यानंतर फीडबॅक घेण्यात आला. आंदोलनाचे काय पडसाद उमटतील याचाही आढावा घेण्यात आला. पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे आंदोलन तीव्र करण्यावर ठाम होते. तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुख्यमंत्र्यांविषयी कोणीही, काहीही बोलू लागले आणि आपण गप्प राहिलो तर उद्या प्रत्येक जण मुख्यमंत्र्यांना वाटेल ते बोलेल. मुख्यमंत्री कोणीही असो, त्या पदाचा मानसन्मान राखला जात नसेल, तर कारवाई हाच उपाय आहे, अशी भूमिका मांडली. त्यानंतर आदित्य ठाकरे यांनी युवा सेनेला कार्यरत केले. परिवहनमंत्री अनिल परब यांनी प्रशासकीय बाजू सांभाळली. मोठे आंदोलन उभे करण्याचे ठरले. त्यानुसार सकाळपासून आंदोलनही सुरू झाले. 

Narayan Rane: ...म्हणून शिवसेनेने भाजपला घेतले शिंगावर; एकत्र येण्याचे प्रयत्न फसलेपोलिसांनी पाऊल उचलताच राणे कोर्टात 

  • राज्याचे पोलीस महासंचालक आणि या विषयाशी संबंधित असणाऱ्या अधिकाऱ्यांनाच आंदोलनाची माहिती दिली होती. त्यानुसार आंदोलन सुरू झाले. 
  • त्यावेळी माध्यमांनी राणे यांना लवकरात लवकर अटक होणार अशा बातम्या सुरू केल्या. या बातम्या नाशिकचे पोलीस आयुक्त दीपक पांडे यांनी दिलेल्या पत्राच्या आधारे सुरू झाल्या होत्या. 
  • पांडे सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पोलीस प्रमुख होते. त्यावेळी त्यांचे आणि राणे यांचे संबंध फारसे चांगले नव्हते. त्याच पांडे यांनी दिलेल्या पत्रावरून पुढील कारवाई सुरू झाली होती. 
  • त्यामुळे राणे यांनीही वकिलांचा सल्ला घेऊन दिवाणी न्यायालयात अर्ज केला आणि तेथेच सगळे गणित बदलले.

Narayan Rane: केंद्रीय मंत्र्याला अटक होऊ शकते? देशभरातील मंत्र्यांमध्ये नारायण राणे तिसरे 

योग्य वाटते ते करा; गृहमंत्र्यांच्या सूचना 

  • दिवाणी कोर्ट आणि हायकोर्टाचा राणे यांना दिलासा मिळाला नाही. त्यानंतर मुंबईत वरिष्ठ नेत्यांची विधी तज्ञांशी चर्चा सुरू झाली. 
  • चर्चेनंतर अटक करण्याचे आदेश दिले गेले आणि राणे यांना अटक झाली. या सर्व प्रकरणात राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांच्याकडे माध्यमांचे लक्ष होते. 
  • ते काहीतरी बोलतील, म्हणून माध्यमांनी त्यांना गाठले तेव्हा गृहमंत्र्यांनी माध्यमांच्या समोर गुप्तवार्ता आयुक्त आशुतोष डुंबरे यांना फोन केला. 
  • काय घडले हे त्यांनाच विचारले. नंतर ‘आमच्या तुम्हाला कोणत्याही सूचना नाहीत. कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने जे योग्य वाटते ते करा’, अशा सूचना गृहमंत्र्यांनी दिल्या. माध्यमांनी देखील त्याची बातमी चालवली. 

भाजपची खेळी फसली; राणे ट्रॅपमध्ये सापडले

  • राणे यांना अटक केल्यानंतर केंद्र सरकारमधून कोणाचीही फारशी प्रतिक्रिया आली नाही. शिवसेना दडपशाहीचे राजकारण करत आहे, असे चित्र तयार करायचे. दडपशाहीचा ठपका भाजपवर आहे. त्यामुळे प. बंगालमध्ये झालेले नुकसान भाजप विसरलेली नाही. महाराष्ट्रात ही खेळी खेळायची नाही. उलट शिवसेनाच दडपशाही करत आहे, असे सातत्याने सांगत राहायचे. 
  • राणे यांना मंत्रिपद सोडावे लागले तरीही फारशी चिंता करायची नाही, अशी रणनीती भाजपने आखल्याचे समजते. त्यामुळेच राणे यांच्या विधानाचे आम्ही समर्थन करत नाही असे महाराष्ट्रातील नेत्यांनी स्पष्ट केले. त्यामुळे राणे या ट्रॅपमध्ये सापडल्याची चर्चा आहे.
टॅग्स :Narayan Raneनारायण राणे Ajit Pawarअजित पवारAditya Thackreyआदित्य ठाकरेShiv Senaशिवसेना