शहरं
Join us  
Trending Stories
1
मंगळवारी ठरणार फॉर्म्युला, अमित शाह यांच्या उपस्थितीत ठरणार महायुतीचे जागावाटप
2
२,६०० पदे कंत्राटी पद्धतीने भरणार; ‘जीआर’चा शासनालाच पडला विसर
3
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२४; नवीन कार्यारंभ करायला आजचा दिवस अनुकूल
4
आघाडी अन् युती कोणाच्या पथ्यावर? काँग्रेस ८२ पार गेली नाही; वेगळे लढल्यावर भाजपला यश
5
राज्यात ‘परिवर्तन महाशक्ती’ तिसरी आघाडी; राजू शेट्टी, संभाजीराजे, बच्चू कडू यांचा पुढाकार; २६ सप्टेंबरला मेळावा
6
आपल्यालाही मिळणार गुडन्यूज? अमेरिकेत अडीच वर्षांनी झाली व्याजदरांत कपात, आता नजर आरबीआयवर
7
एनपीएस : लाभार्थ्यांत महाराष्ट्र, यूपी आघाडीवर; संख्येत सातत्याने वाढ : २०२३ मध्ये एक कोटी ७३ लाख संख्या
8
अडीच कोटी पाकिस्तानी मुले शाळेबाहेर ! धक्कादायक माहिती उघड
9
तिरुपतीच्या लाडूत प्राण्याची चरबी? आरोपावरून वादळ; प्रयोगशाळेच्या अहवालावरुन मुख्यमंत्री नायडू व वायएसआरसीपीची एकमेकांवर टीका
10
दाेन हजार घरे; सव्वा लाख अर्ज, म्हाडाच्या परवडणाऱ्या घरांची मुंबईकरांना भुरळ
11
पूजा खेडकरकडे कोर्टाने मागितला खुलासा; बायोमेट्रिक नमुने घेतल्याची खोटी साक्ष दिल्याचा यूपीएससीचा आरोप
12
खाद्यतेल, मिरची पावडर, दुधाचे नमुने जप्त; अन्न व औषध प्रशासनाची विशेष मोहीम
13
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा ‘परफॉर्मन्स’ कसा राहणार? २०१९ मध्ये मुंबईत लढविल्या होत्या २५ जागा
14
राहुल यांच्या लोकप्रियतेने भाजपमध्ये वाढती घबराट; काँग्रेस नेते रमेश चेन्निथला यांचे टीकास्त्र
15
आवाजाचा डेसिबल डबल! ईद, गणेशोत्सव मिरवणुकीत डीजेंचा दणदणाट, मुंबईकरांच्या कानठळ्या बसल्या
16
सीए ॲनाच्या मृत्यूची केंद्राकडून चौकशी; कामाच्या प्रचंड ताणाचा करणार तपास
17
कुलगुरूपदावरील नियुक्ती रद्द; डॉ. अजित रानडे यांची हायकोर्टात धाव
18
सख्ख्या भावानेच केली लहान भावाची हत्या; धरणात आढळलेल्या मृतदेहाचा छडा
19
‘कोस्टल’वरून ४० लाख वाहनांची वर्दळ; वाहतूक नियोजनाला आणखी गती मिळाली
20
मुंबईकरांनी मारला सव्वालाख टन आंब्यांवर ताव; एप्रिल-मे महिन्यात ५०० कोटींची उलाढाल

Narayan Rane: नारायण राणेंवरील कारवाईवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची होती बारीक नजर, वर्षावरून असे घेत होते अपडेट 

By ऑनलाइन लोकमत | Published: August 25, 2021 9:11 AM

Narayan Rane Arrest News: काल दिवसभर चाललेल्या या संपूर्ण घटनाक्रमावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे बारीक नजर ठेवून होते. या संदर्भात ते क्षणाक्षणाची अपडेट वर्षा बंगल्यावर बसून घेत होते.

मुंबई - मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंविरोधात केलेल्या प्रक्षोभक विधानाप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर केंद्रीय मंत्री नारायण राणेंच्या अटकेचे नाट्य काल दिवसभर रंगले होते.  अखेर रात्री उशिरा या प्रकरणात राणेंना जामीन मिळाला होता. (Narayan Rane Arrest Update) दरम्यान, काल दिवसभर चाललेल्या या संपूर्ण घटनाक्रमावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) बारीक नजर ठेवून होते. या संदर्भात ते क्षणाक्षणाची अपडेट वर्षा बंगल्यावर बसून घेत होते. नारायण राणेंना अटक केल्यास होणारे परिणाम आणि भविष्यातील कारवाईबाबत निकटवर्तीयांसोबत चर्चा करत होते. (Chief Minister Uddhav Thackeray had a keen eye on the action taken against Narayan Rane)

नारायण राणेंना रत्नागिरीमध्ये अटक झाल्यानंतर त्यांना रात्री रायगडमधी महाड येथे आणण्यात आले. तेथे कोर्टाने जामीन मंजूर केल्यानंतर राजकीय आणि कायदेशीर उलथापालथींनी भरलेला दिवस समाप्त झाला. सर्वावर मुख्यमंत्र्यांची बारीक नजर होती. दरम्यान नारायण राणेंवरील अटकेची कारवाई ही बदल्याच्या भावनेने नाही तर मुख्यमंत्र्यांविरोधात कुठल्याही प्रकारची अपमानकारक आणि असंसदीय भाषेचा वापर करता येणार नाही, हे दाखवून देण्यासाठी करण्यात आल्याचे शिवसेनेच्या एका नेत्याने सांगितले.

नारायण राणे आणि त्यांच्या कुटुंबीयांनी याआधीही ठाकरे कुटुंबाबाबत आक्षेपार्ह भाषेचा वापर केला होता. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी याआधी याकडे दुर्लक्ष केले होते. मात्र आता जर कारवाई झाली नसती तर मुख्यमंत्र्यांना काहीही म्हणता येऊ शकते, असा संदेश गेला असता, असे शिवसेनेकडून सांगण्यात आले.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी देशाच्या स्वातंत्र्य दिनाबद्दल बोलताना केलेल्या विधानाचा संदर्भ देत नारायण राणेंनी काल एक वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. रायगडमध्ये नारायण राणेंनी हे चिथावणीखोर विधान केल्यानंतर महाड, नाशिकमध्ये गुन्ह्याची नोंद झाली होती. उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री आहेत. ते घटनात्मक पदावर आहेत. त्यामुळे त्यांच्याबद्दल केलेलं विधान हे संपूर्ण राज्याचा अपमान करणारं आहे, अशी तक्रार नाशिकचे शिवसेनेचे पदाधिकारी सुधाकर बडगुजर यांनी दाखल केली होती.  त्यानंतर राणेंना अटक करून महाड येथील कोर्टात दाखल करण्यात आले होते.

दरम्यान, नारायण राणेंवर कारवाई करण्यासाठी महाविकास आघाडी सरकारमधील मंत्र्यांमध्ये एकमक होते. कायद्यापेक्षा कुणीही मोठे नाही, हा संदेस आम्हाला द्यायचा होता. आता राणेंना जामीन मिळाल्याने काही हरकत नाही, असे शिवसेनेच्या एका नेत्याने सांगितले.  

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेShiv SenaशिवसेनाNarayan Raneनारायण राणे BJPभाजपाPoliticsराजकारण