शहरं
Join us  
Trending Stories
1
बापरे बाप, धावत्या रेल्वेत निघाला भलामोठा साप; प्रवाशांची धावपळ उडाली, पहा Video...
2
नाना पटोलेच होतील पुढील मुख्यमंत्री; काँग्रेस नेत्याचा दावा, नागपुरातील सहाही जागांवर लढणार
3
PM Modi US Visit Live: ...पण नियतीने मला राजकारणात आणले; मोदींनी अमेरिकेत भारतीयांसमोर मन मोकळे केले
4
Pune Rain Update: तीन दिवस उकाडा, पुण्यात मुसळधार पावसाला सुरुवात; अवघ्या 5 मिनिटात रस्त्याला नदीचे स्वरूप
5
मालदीवनंतर श्रीलंकाही चीनच्या गळाला; मार्क्सवादी अनुरा कुमारा दिसानायके नवे राष्ट्रपती
6
हिजबुल्लाहने इस्रायलचे आयर्न डोम फेल केले; नागरिकांवर बंकरमध्ये लपण्याची वेळ
7
धक्कादायक! अरबाज पटेल घराबाहेर, आठ आठवड्यांचा प्रवास संपला; निक्कीला अश्रू अनावर
8
एसटी महामंडळाचे अध्यक्षपद गोगावलेंनी नाकारले? कार्यकर्त्यांशी चर्चा करून निर्णय घेणार
9
चिपळूणमध्ये मोठी घडामोड! भास्कर जाधवांचा मुलगा अजित पवारांच्या भेटीला
10
खंबाटकी घाटात थरार! कंटेनर आठ वाहनांना धडकला; पाचजण जखमी 
11
UPA सरकार पाकिस्तानला घाबरायची; शाहपूरकंडी प्रकल्पावरुन जेपी नड्डांचा काँग्रेसवर हल्लाबोल
12
मुकेश अंबानी यांनी खरेदी केले सर्वात महागडे विमान; किंमत ऐकून फक्त 'शून्य' मोजत बसाल...
13
४४० व्होल्टचा झटका! १८ वर्षे 'तो' शेजाऱ्याचं वीज बिल भरत राहिला, असं समोर आलं 'सत्य'
14
Zerodha च्या नावाने सुरू आहे फ्रॉड, तुम्ही तर अडकला नाहीत ना?
15
"माझा दौरा रद्द करणारा जन्माला यायचाय", अजित पवारांनी आपल्याच नेत्याला झापले
16
जो बायडेन यांची विसरण्याची समस्या वाढली; स्टेजवर PM मोदींचे नाव विसरले, video व्हायरल
17
इस्रायलच्या औषधानंतर ६५ वर्षांच्या व्यक्तीला २५ वर्षांचे करणारी मशीन; ठग दाम्पत्याने ५०० लोकांना लुटले
18
अजित पवारांमुळे मंत्रिपदे गेली, आता किमान १०-१२ जागा हव्यात; मित्रपक्षाने महायुतीच्या जागावाटपात टाकला खडा
19
"त्या माणसाने आमच्या तोंडावर दरवाजा बंद केला", सुप्रिया सुळेंनी सांगितला वाईट अनुभव

सेनेला शह देणार! नारायण राणेंवर ‘मिशन ११४’ ची जबाबदारी? BMC निवडणुकीसाठी BJP ची तयारी

By ऑनलाइन लोकमत | Published: August 16, 2021 4:05 PM

दिल्लीतील भाजप नेतृत्वाने नारायण राणेंकडे मुंबई महापालिकेची निवडणूक पुढच्या वर्षी होत असल्याने मिशन ११४ ची जबाबदारी दिल्याचे बोलले जात आहेत.

ठळक मुद्देकेंद्रीय मंत्री नारायण राणेंची १९ ऑगस्टपासून जनआशीर्वाद यात्रामुंबई महापालिकेची निवडणूक पुढच्या वर्षी होत असल्याने मिशन ११४ ची जबाबदारीकोणत्याही परिस्थितीत हे मिशन यशस्वी करा, भाजपश्रेष्ठींचे आदेश

मुंबई: गेल्या काही दिवसांपासून मुंबई महापालिकांच्या आगामी निवडणुकांविषयी राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे. यातच केंद्रात नव्याने मंत्री झालेल्या महाराष्ट्रातील चार नेत्यांनी राज्याच्या विविध भागात जनआशीर्वाद यात्रा सुरू केली आहे. नव्या मंत्र्यांनी जनतेशी संवाद साधावा, यासाठी ही यात्रा काढल्याचे सांगितले जात असले, तरी या माध्यमातून भाजपने महापालिका निवडणुकीची मोर्चेबांधणी सुरू केल्याची चर्चा असल्याचे सांगितले जात आहे. भाजपने केंद्रीय उद्योग मंत्री नारायण राणे यांच्याकडे मुंबई महापालिकेसाठी ‘मिशन ११४’ सोपवल्याचे सांगण्यात असून, नारायण राणे यांच्या जनआशीर्वाद यात्रेला कसा प्रतिसाद मिळतो, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. (narayan rane jan ashirwad yatra bjp give responsibility of mission 114 for next bmc election)

“महाराष्ट्राला सर्वाधिक लसी दिल्या, तरी ठाकरे सरकारची तक्रार आहेच”; भारती पवारांचे टीकास्त्र

केंद्रीय मंत्री नारायण राणे गुरुवार, १९ ऑगस्टपासून जनआशीर्वाद यात्रेला सुरुवात करण्यात असून, केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार, कपिल पाटील आणि भगवान कराड यांनी आपापल्या जनआशीर्वाद यात्रांना सुरुवात केली आहे. नारायण राणे यांची जनआशीर्वाद यात्रा मुंबई आणि कोकण पट्ट्यात ही यात्रा राहणार आहे. पहिल्याच दिवशी ते विमानतळ ते कुलाबा असा प्रवास करणार असल्याचे सांगितले जात आहे. 

भावना ताई, ७ कोटींची कॅश आली कुठून?; चोरीच्या तक्रारीवरून भाजपा नेत्याचा मार्मिक सवाल

नारायण राणेंवर ‘मिशन ११४’ ची जबाबदारी?

दिल्लीतील भाजप नेतृत्वाने नारायण राणेंकडे कोकण आणि मुंबईची जबाबदारी दिली असून, मुंबई महापालिकेची निवडणूक पुढच्या वर्षी होत असल्याने मिशन ११४ ची जबाबदारी दिली आहे. मुंबई महापालिकेत ११४ जागा किंवा त्याहून अधिक जागा निवडून आणण्याची जबाबदारी देण्यात आली असून, कोणत्याही परिस्थितीत हे मिशन यशस्वी करा, असे पक्षश्रेष्ठींकडून सांगण्यात आले आहे. शिवसेनेला शह देण्यासाठी नारायण राणेंकडे मिशन देण्यात आले असून, महापालिका निवडणुकीत शिवसेनेविरोधात राणेंच्या ताकदीचा पुरेपूर वापर करून घेण्याचे भाजपने ठरवल्याचे सांगितले जात आहे. महापालिका निवडणुकीत नारायण राणेंच्या एन्ट्रीने ही निवडणूक शिवसेनेसाठी अत्यंत संघर्षाची ठरण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

“विरोधकांच्या एकतेसाठी सोनिया गांधी यांचे प्रयत्न प्रशंसनीय, पण...”; कपिल सिब्बलांचे रोखठोक मत

दरम्यान, केंद्रीय मंत्री नारायण राणे ७ दिवस चालणाऱ्या जनआशीर्वाद यात्रेत एकूण १७० हून अधिक भागांना भेट देणार आहेत. राणे यांच्या यात्रेचे प्रमुख म्हणून प्रमोद जठार व सहप्रमुख म्हणून आमदार सुनिल राणे काम पाहणार आहेत. या यात्रेत भाजपसह स्वाभिमानी संघटनेचे कार्यकर्तेही भाग घेणार आहेत. यापूर्वी, भारती पवार यांची जनआशीर्वाद यात्रा पालघर, मनोर, चारोटी, तालसरी, विक्रमगड, जव्हार, मोखाडामार्गे सुरू झाली असून, केंद्रीय मंत्री म्हणून स्थानिक आरोग्यसुविधांना कोणत्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे हे पाहणे आपली जबाबदारी असल्याचे भारती पवार यांनी सांगितले. केंद्र सरकारने सर्वाधिक लसी महाराष्ट्राला उपलब्ध करुन दिल्या आहेत. परंतु, राज्य सरकार तरीही लसींचा पुरवठा होत नाही अशी तक्रार करत आहे, अशा शब्दांत ठाकरे सरकारवर टीका केली. 

टॅग्स :PoliticsराजकारणMumbaiमुंबईElectionनिवडणूकShiv SenaशिवसेनाBJPभाजपाUddhav Thackerayउद्धव ठाकरेNarayan Raneनारायण राणे