शहरं
Join us  
Trending Stories
1
"आता कुठे तरी थांबलं पाहिजे, नव्या पिढीला...’’, शरद पवारांकडून राजकीय निवृत्तीचे संकेत?  
2
'बंटेंगे तो कटेंगे'... योगी आदित्यनाथ ठरणार निवडणुकीत 'ट्रम्प कार्ड', PM मोदींपेक्षा जास्त सभा घेणार!
3
कर्जत-जामखेडमध्ये रोहित पवारांची कोंडी?; नाम साधर्म्य असलेल्या उमेदवाराला मिळाले ट्रम्पेट चिन्ह!
4
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : संजय वर्मा महाराष्ट्राचे नवीन पोलीस महासंचालक; निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महत्त्वाची नियुक्ती
5
रेल्वे स्टेशनवर सुटकेमध्ये मृतदेह, गुपचूप पळणाऱ्या बाप-लेकीला पोलिसांनी ठोकल्या बेड्या
6
सुनील तटकरे महायुतीशी गद्दारी करतायेत; शिंदे गटाच्या आमदाराचा गंभीर आरोप
7
सेल्फीमुळे गेला जीव; राष्ट्रीय स्तरावर निवड झालेल्या टेबल टेनिसपटूंचा तलावात बुडून मृत्यू
8
IPL 2025 Mega Auction: MI शिवाय या ४ फ्रँचायझी संघात सेट होऊ शकतो Arjun Tendulkar
9
“उमेदवारी यादी आधीच दिली, ते माघारीचे कारण नाही, मनोज जरांगेंवर दबाव...”: राजरत्न आंबेडकर
10
"शाहू महाराजांना फोन आला अन् मधुरिमाराजेंनी..."; शेवटच्या १० मिनिटांत घडलेल्या राजकीय भूकंपाचे कारण समोर
11
"...मग पंतप्रधान कशाला होता, मुख्यमंत्री व्हा"; बारामतीतून शरद पवारांचा PM मोदींवर निशाणा
12
त्यांनी बाळासाहेबांचे विचार आणि धनुष्यबाण गहाण ठेवले होते; शिंदेंसाठी CM शिंदेंची बॅटिंग, ठाकरेंवर हल्ला
13
भारताच्या लाजिरवाण्या पराभवाने BCCI 'अ‍ॅक्शन मोड'मध्ये; गौतम गंभीरवर होणार प्रश्नांची सरबत्ती
14
UIDAI नं मोफत आधार कार्ड अपडेटची मुदत वाढवली, 'या' तारखेपर्यंत शुल्क लागणार नाही
15
IAS अधिकाऱ्याला मिठाईच्या बॉक्समधून लाच देणं नेत्याला पडलं महागात, पोलीस आले अन्....
16
सर्वोच्च न्यायालयाचा मदरशांना मोठा दिलासा, मदरसा कायदा घटनात्मक घोषित; हायकोर्टाचा निर्णय फिरला
17
दो भाई दोनों तबाही! शिखर धवन आणि युझवेंद्र चहलची भन्नाट कॉमेडी; चाहत्यांना हसू आवरेना
18
राज ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांवर केलेल्या टीकेला संजय शिरसाट यांचं प्रत्युत्तर; स्पष्टच बोलले
19
भाजपाला मोठा धक्का, अपक्ष निवडणूक लढवत असलेल्या माजी महिला खासदाराचा पक्षाला राम राम
20
“कोल्हापूर उत्तर आम्ही ७ वेळा जिंकली, ७ दिवस भांडलो पण काँग्रेसने जागा सोडली नाही”: संजय राऊत

'नारायण राणे नॉन मॅट्रिक, केंद्रात मंत्रिपद देण्याची वेळ म्हणजे दुर्दैवच'

By ऑनलाइन लोकमत | Published: February 09, 2021 6:15 PM

Narayan Rane : कॉलेजच्या उद्घाटनासाठी मंजुरीच्या फाईलवर सही करण्यासाठी मातोश्रीवर फोन केल्याचे राणे यांनी सांगितले होते. त्या आधी राऊत यांनीदेखील राणे सारखे सारखे मातोश्रीवर फोन करत असल्याचे म्हटले होते. त्याला राणे यांनी महिनाभराने कबुली दिली होती. 

मुंबई : सिंधुदूर्गातील राज्यसभा खासदार नारायण राणेंच्या वैद्यकीय कॉलेजच्या उद्घाटनाला केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आल्याने पुन्हा एकदा शिवसेना-राणे संघर्ष सुरू झाला आहे. नारायण राणेंना केंद्रात मंत्रीपद मिळण्याची चर्चा जोर धरू लागलेली असतानाच राणेंच्या पुत्राला पाडणाऱ्या खासदार विनायक राऊत यांनी जोरदार टीका केली आहे. (Narayan Rane supposed to get minister post in Modi Government)

नारायण राणेंसारख्या नॉन मॅट्रिक माणसाला केंद्रात मंत्रिपद देण्याची वेळ आली, तर दुर्दैवच, असा टोला राऊत यांनी भाजपाला हाणला आहे. कॉलेजच्या उद्घाटनासाठी मंजुरीच्या फाईलवर सही करण्यासाठी मातोश्रीवर फोन केल्याचे राणे यांनी सांगितले होते. त्या आधी राऊत यांनीदेखील राणे सारखे सारखे मातोश्रीवर फोन करत असल्याचे म्हटले होते. त्याला राणे यांनी महिनाभराने कबुली दिली होती. 

अमित शहा सिंधुदूर्गमध्ये येऊन जात नाहीत तोच शिवसेनेने आमदार नितेश राणे यांच्या मतदारसंघातील वैभववाडी नगरपरिषदेचे 7 नगरसेवक फोडले आहेत. हे नगरसेवक लवकरच शिवसेनेत प्रवेश करणार असून यावर नितेश राणे यांनी उद्धव ठाकरे हार, गुच्छ घेणार नसल्याने हे नगरसेवक व्हॅलेंटाईन गिफ्ट असल्याचे म्हटले होते. आता नारायण राणेंना केंद्रात मंत्रिपद मिळण्यावरून चर्चा जोर धरू लागली आहे. यावर शिवसेनेने टीका केली आहे. 

तुमचे पाचपट नगरसेवक फोडणारवाभदे-वैभववाडी नगरपंचायतमध्ये भाजपची एकहाती सत्ता होती. 17 पैकी 17 नगरसेवक हे भाजपकडे होते. मात्र सोमवारी त्यातील 7 नगरसेवक फुटून आज शिवसेनेत प्रवेश करत असल्याने भाजपाला मोठा धक्का बसल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र याचदरम्यान भाजपाने शिवसेनेला देखील आता इशारा दिला आहे. आमचे जेवढे नगरसेवक फोडले, त्याच्या पाच पटीने तुमचे फोडणार, असा इशारा भाजपाचे खासदार नारायण राणे यांचे पुत्र आणि माजी खासदार निलेश राणे यांनी दिला आहे.  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत हा पक्ष प्रवेश होणार आहे. या 7 जणांसह माजी नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष यांचाही समावेश आहे. भाजपाचे आमदार नितेश राणे सोमवारपर्यंत त्यांच्या परिवारावर दबाव टाकत होते, असा आरोप या नगरसेवकांनी केला आहे.

नारायण राणे मैदान सोडणार नाहीत ना...अमित शहा यांनी नारायण राणेंना कितीही बळ पुरवले तरी ते शिवसेनेला घाबरून मैदान सोडून पळ काढणार नाहीत, याची खातरजमा अमित शहा यांनी करून घ्यावी असा टोला आमदार वैभव नाईक यांनी लगावला होता.  तसेच राणेंना कितीही ताकद दिली तरी पुढच्या निवडणुकीत शिवसेना त्यांना पुन्हा एकदा पराभूत करून भगवा फडकवल्याशिवाय राहणार नाही, असा विश्वासही वैभव नाईक यांनी व्यक्त केला, त्याचसोबत माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नारायण राणेंचा उल्लेख महाराष्ट्राचे दबंग नेते असा केला होता. मात्र या दबंग नेत्याला पक्षात प्रवेश देण्यासाठी वर्षभर का ताटकळत का ठेवले, असा सवाल वैभव नाईक यांनी फडणवीस आणि भाजपाला विचारला आहे.

टॅग्स :Narayan Raneनारायण राणे Vinayak Rautविनायक राऊत BJPभाजपाAmit Shahअमित शहाShiv Senaशिवसेना