मुंबई – केंद्रीय मंत्री नारायण राणे(Narayan Rane) यांनी अटकेच्या प्रकरणावर शिवसेनेवर आणि महाविकास आघाडी सरकारवर घणाघात केला आहे. संजय राऊत(Sanjay Raut) हे संपादकीय पदाच्या लायकीचे नाहीत. शिवसेनेने मला मुख्यमंत्री केले, मी गँगस्टर असेल तर मुख्यमंत्री केले. आत्ताही तेच असतील. मी १७ तारखेनंतर राऊतांना उत्तर देईन असा टोला केंद्रीय मंत्री नारायण राणेंना दिला आहे.
"मी सगळ्यांना पुरून उरलोय; तुम्हाला घरं नाहीत, मुलंबाळं नाहीत का?"
नारायण राणे पत्रकार परिषदेत म्हणाले की, सामाना अग्रलेखात उद्धव ठाकरेंना खुश करण्यापुरत लिहिलं जातं. मला वाटत नाही त्यावर मी प्रतिक्रिया द्यावी. शिवसेनेने(Shivsena) मुख्यमंत्री पद दिलं कारण कतृत्व होतं ते सिद्ध करून दाखवलं. आता कुणी कतृत्वान आहे का? हे सरकार कायम स्वरुपी नाही. कुछ दिनो के मेहमान आहे. गँगस्टर असताना शिवसेनेने मला मुख्यमंत्री केले, मग आताही मंत्री तेच असतील ना असं राणेंनी सांगितले. शिवसेना नेत्यांनी कधी असे शब्द उच्चारले नाहीत का? मी कुणालाही घाबरत नाही. मी सगळ्यांना पुरून उरलोय. मी आता यापुढे जपून पावलं उचलणार आहे. आम्ही तिघं घरात नसताना आंदोलन केले. तुम्हाला घर नाहीत? मुलंबाळं नाहीत का? असा सवालही राणेंनी विचारला.
“पवारसाहेब, काय सज्जन मुख्यमंत्री केलाय तुम्ही”
१ ऑगस्टला बीडीडी चाळीच्या पुनर्विकासाचं उद्घाटन होतं. शिवसेना नेत्यांनी असे शब्द उच्चारले नाहीत का? देशाबद्दल अभिमान आहे म्हणून मी संतापाने बोललो. उद्धव ठाकरे(Uddhav Thackeray) म्हणतात, शिवसेना भवनाबद्दल कुणी काही बोललं तर थोबाड फोडा हे आदेश नाहीत का? हा योगी आहे की ढोंगी, चप्पलाने मारले पाहिजे, एका राज्याच्या मुख्यमंत्र्यांना चप्पलाने मारलं हे शब्द वापरलेले चालतात? केंद्रीय मंत्री अमित शाह यांना निर्लज्ज असा शब्द वापरला ते चालतं का? असा सवाल विचारत पवारसाहेब काय सज्जन मुख्यमंत्री केलाय तुम्ही असंही नारायण राणेंनी चिमटा काढला.
ते जेलमध्ये जाईपर्यंत गप्प बसणार नाही
अनिल परब अधिकाऱ्यांना आदेश देतात पकडा त्यांना, काही दरोडा घातलाय का? राज्यात कायदा-सुव्यवस्था कुठे आहे? दिशा सालियानच्या आत्महत्येत कोण मंत्री उपस्थित होतं? का त्याचा छडा लागला नाही. पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात काय घडलं? कुठल्या मंत्र्याला अटक केली? आम्ही यापुढे कायदेशीर लढाई लढणार आहोत. त्यात जे जे होते ते जेलमध्ये जाईपर्यंत गप्प बसणार नाही असंही सूचक इशारा नारायण राणे यांनी शिवसेनेला दिला आहे.