Modi Cabinet Expansion: नवी दिल्ली: मोदींच्या मंत्रिमंडळात कोणाची वर्णी लागणार कोणाचा पत्ता कट होणार याबाबत तर्क वितर्क लढविले जात असताना राज्याचे नेते, माजी मुख्यमंत्री नारायण राणे (Narayan Rane) आणि खासदार कपिल पाटील (Kapil Patil) पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या (PM Narendra Modi) निवासस्थानी पोहोचले आहेत. तर दुसरीकडे भाजपाचे आमदार नितेश राणे (Nitesh rane) हे दिल्लीला पोहोचल्याने राणेंचे मंत्रिपद फिक्स झाल्याचे बोलले जात आहे. (Nitesh Rane arrived in Delhi, Narayan rane, kapil Patil went to meet PM Narendra Modi)
Cabinet reshuffle: महाराष्ट्रातील आणखी एका नेत्याला दिल्लीतून बोलावणे; मराठवाड्यात चर्चांना उधाण
नारायण राणेंनी त्यांच्यावर आलेल्य़ा सर्व जबाबदाऱ्या यशस्वीरित्या पार पाडल्या आहेत. मी नेहमी दिल्लीला येत असतो. माझा भाऊ निलेश राणे खासदार होता. नारायण राणे आता खासदार आहेत. यामुळे दिल्लीवारी असायची. काल राज्यातील अधिवेशन पार पडले. ते आटोपून मी दिल्लीत आलो आहे. नारायण राणेंना मोदींना भेटून बाहेर येऊदेत, सर्व माहिती मिळेल, अशी माहिती नितेश राणे यांनी दिली आहे.
नारायण राणे मंगळवारी सपत्नीक दिल्लीला पोहोचले आहे. नुकतेच ते आणि कपिल पाटील, भारती पवार, डॉक्टर भागवत कराड हे पीएम मोदी यांच्या निवासस्थानी पोहचले आहेत. यापैकी कोणाला राज्य मंत्री पदे मिळतील आणि कोणाला कॅबिनेट याबाबत अद्याप सस्पेन्स आहे. आज सायंकाळी ६ वाजता मंत्रिमंडळ विस्तार (Narendra Modi Cabinet expansion) होणार आहे.
दी मंत्रिमंडळाचा विस्तार (Narendra Modi Cabinet expansion) आज सायंकाळी ६ वाजता केला जाणार आहे. मोदींनी आजची कॅबिनेट बैठक रद्द केली असून ज्या नेत्यांना मंत्रिपदे देण्यात येणार आहेत त्यांना दोन दिवसांपासून दिल्लीला हजर होण्याचे आदेश देण्यात आले आहे.
सर्व नेते दिल्लीतमिळालेल्या माहितीनुसार, रिटा बहुगुणा जाेशी, रामेश्वर कथेरिया, राहुल कासवान, सी. पी. जाेशी, प्रवेश वर्मा किंवा मीनाक्षी लेखी, झफर इस्लाम, अश्वनी वैष्णव, पूनम महाजन, हिना गावित, प्रीतम मुंडे आणि डाॅ. भागवत कराड यांना स्थान मिळेल, असे सांगण्यात आले. आसामचे माजी मुख्यमंत्री सर्वानंद साेनाेवाल यांच्यासह सुशील माेदी, वरुण गांधी, भूपेंद्र यादव, दिलीप घाेष या भाजप नेत्यांना तसेच लल्लन सिंग (जेडीयू), पशुपती पारस (एलजेपी), अनुप्रिया पटेल (अपना दल), चंद्र प्रकाश (एजेएसयू) यांना सामावून घेण्याचा भाजप पक्षश्रेष्ठीचा प्रयत्न राहणार आहे. दरम्यान, नारायण राणे, प्रीतम मुंडे, कपिल पाटील दिल्लीत पोहचले आहेत. डाॅ, भागवत कराड दिल्लीमध्ये आहेत. मंत्रिमंडळ विस्तारात अल्पसंख्याकांनाही सामावून घेण्यात येउ शकते.