शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्रीय मंत्रिमंडळ बैठकीत सरकारचा मोठा निर्णय; लाखो विद्यार्थ्यांचा होणार फायदा
2
डोनाल्ड ट्रम्पना आणखी एक मुलगी? पाकिस्तानातल्या तरुणीचा खळबळजनक दावा, Video व्हायरल
3
"अजित दादांच्या जाहीरनाम्यात 'प्रिंटिंग मिस्टेक', एक ओळ छापायची राहून गेली!"; काय म्हणाले अमोल कोल्हे?
4
David Warner चं कॅप्टन्सीचं ग्रहण सुटलं! RTM एन्ट्रीसह DC त्याला Rishabh Pant च्या जागी आजमावणार?
5
डोनाल्ड ट्रम्प यांच्या लाल टोपीवर '45-47' हे काय लिहिलेलं होतं, जे खरं ठरलं? असं आहे कनेक्शन
6
IPL Auction 2025 : पाकिस्तानची वाट लावणारा IPL च्या लिलावात; अमेरिकेच्या दहा खेळाडूंनी केली नोंदणी
7
'ज्यांच्या घरावर बुलडोझर चालवला, त्यांना २५ लाख रुपये द्या'; सुप्रीम कोर्टाचे योगी सरकारला आदेश
8
"कुणी कुणाचं काहीही चोरलेलं नाही"; राज ठाकरेंच्या टीकेवर अजितदादा म्हणाले, "कधी काय बोलतील..."
9
Priyanka Gandhi : "मी मागे हटणार नाही, तुमच्यासाठी लढेन"; प्रियंका गांधींनी स्वतःला म्हटलं 'योद्धा', भाजपावर टीकास्त्र
10
“राहुल गांधीची भूमिका संविधान बचाओ, फडणवीसांना शहरी नक्षलवाद का वाटतो?”; काँग्रेसचा सवाल
11
कमला हॅरिसनी राजीनामा दिला तरी उपराष्ट्राध्यक्ष पद भारताच्या जावयबापूंकडे राहणार; असे जुळतेय समीकरण...
12
'बविआ'समोर भाजपचे आव्हान! जागा शिंदेंच्या पण उमेदवार भाजपचे
13
"काहीही झालं तरी जातनिहाय जनगणना होणार अन् आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा हटवणारच"
14
"मी त्यांना नोटीस पाठवतो"; रामराजेंबाबत अजित पवारांना घेतली कठोर भूमिका, कारण...
15
'तो' एक फॉर्म्युला लागू झाल्यास परळीत धनंजय मुंडेंची होणार अडचण; नेमकं राजकारण काय?
16
“...तेव्हा झोपेत होते का, फडणवीसांनी बोलायचा ठेका दिला का”: जरांगेंचा राज ठाकरेंवर पलटवार
17
"सुनील राऊतांना ताबडतोब अटक करा"; निवडणूक अधिकाऱ्याला पत्र; सोमय्यांनी काय म्हटलंय?
18
जम्मू-काश्मीर विधानसभेत कलम ३७० पुन्हा लागू करण्याचा ठराव मंजूर; भाजप आमदारांनी '५ ऑगस्ट झिंदाबाद'च्या दिल्या घोषणा
19
बॉलिवूड अभिनेत्रीने अमेरिकेत केलं मतदान, ट्रम्प यांच्या विजयावर नाराजी दर्शवत म्हणाली...
20
भारतीय शेअर बाजारातही चाललं ट्रम्प कार्ड! आयटी क्षेत्रात तेजी, सेन्सेक्समध्ये ९०० अंकांची उसळी

Modi Cabinet News: ३ मंत्रिपदे मागितलेली, मोदींनी एकच दिले; नितीश कुमार तरीही खूश?

By ऑनलाइन लोकमत | Published: July 08, 2021 9:17 AM

Narendra Modi Cabinet Reshuffle: नितीश कुमार स्वत:च सांगतात, जेव्हा ते पुड्या बांधून फेकतात तेव्हा त्या उघडत नाहीत. मग त्यांनी २०१९ मध्ये एक मंत्रिपद मिळत असल्याने नाराजी व्यक्त करून मोदी सरकारमध्ये सहभागी होण्यास नकार दिला होता. मात्र, तेच सांकेतिक पद त्यांना दोन वर्षांनी मान्य झाले आहे, यामागे मोठे कारण आहे. 

Cabinet expansion: नवी दिल्ली: बिहार निवडणुकीत कमी जागा निवडून आल्या तरीदेखील नितीश कुमार (Nitish Kumar) यांना भाजपाने मुख्यमंत्री पदी ठेवले होते. बिहारमध्ये (Bihar Politics) तापलेले कुरघोडीचे वातावरण शमले आहे. परंतू, कालच्या मोदींच्या मंत्रिमंडळ विस्तारामध्येनितीश कुमार सहभागी होणार की नाही यावरून संभ्रम होता. कारण नितीश कुमार यांनी नरेंद्र मोदींकडे (PM Narendra Modi) तीन मंत्रिपदे देण्याची अट ठेवली होती. मात्र, मोदींनी त्यांना एकावरच समाधान मानायला लावले आहे. तरीदेखील नितीश कुमार नाराज नाही तर खूश असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात होत आहे. (Nitish kumar's party JDU got 1 minister post in modi cabinet expansion, they want 3.)

Cabinet reshuffle: मोदींच्या नव्या मंत्रिमंडळाची आज मोठी बैठक; मंत्रीदेखील पदभार स्वीकारणार

नितीश कुमार स्वत:च सांगतात, जेव्हा ते पुड्या बांधून फेकतात तेव्हा त्या उघडत नाहीत. मग त्यांनी २०१९ मध्ये एक मंत्रिपद मिळत असल्याने नाराजी व्यक्त करून मोदी सरकारमध्ये सहभागी होण्यास नकार दिला होता. मात्र, तेच सांकेतिक पद त्यांना दोन वर्षांनी मान्य झाले आहे, यामागे मोठे कारण आहे. 

मोदी सरकारच्या कॅबिनेट विस्तारानंतर नितीश कुमारांनी एका दगडात दोन पक्षी मारल्याचे बोलले जात आहे. नितीश यांनी चिराग पासवानला दुसरा झटका देण्यासाठी दोन मंत्रिपदांचा बळी दिल्याचे म्हटले जात आहे. पशुपति पारस यांना केंद्र सरकारमध्ये सहभागी करण्याचा निर्णय घेण्यात आला तेव्हाच नितीश यांनी चिराग पासवानना पहिला झटका दिला होता. 

Cabinet Reshuffle : केंद्रीय मंत्रिमंडळात 38 नवे चेहरे; नारायण राणे कॅबिनेट मंत्री; भागवत कराड, कपिल पाटील, भारती पवार राज्यमंत्री

पारस यांना केंद्र सरकारमध्ये सहभागी करण्याचा सरळ अर्थ असा होता की, भाजपाने पारस यांच्या नेतृत्वातील एलजेपीला स्वीकारले आहे. नितीश कुमारांनादेखील हेच हवे होते. बिहार विधानसभा निवडणुकीत चिरागमुळे नितीश कुमारांना २० जागा गमवाव्या लागल्या होत्या. याचा बदला त्यांना घ्यायचा होता. मात्र, चिराग पंतप्रधान मोदींचा हनुमान म्हणत त्याची ढाल बनवून नितीश कुमारांसमोर उभे ठाकत होते. यामुळे पारस यांची केंद्रीय मंत्रिमंडळात वर्णी लागणे हा नितीश कुमार यांचाच विजय मानला जात आहे. 

हार के भी जीत....एक फिल्मी डायलॉग आहे, 'हार कर जीतने वाले को ही बाजीगर कहते हैं'. चिराग पासवानला दोन झटके देण्यासाठी नितीश कुमारांनी दोन मंत्रिपदांवर पाणी सोडले. हरूनही जिंकल्याची भावना आता नितीश कुमारांच्या गोटात आहे. 

२५ राज्यांना मिळाले प्रतिनिधीत्वकेंद्रीय मंत्रिमंडळाच्या विस्तारात २५ राज्यांना प्रतिनिधीत्व मिळाले आहे. ज्या पंधरा कॅबिनेट मंत्र्यांनी शपथ घेतली, त्यांच्यात आठ नवे चेहरे असून सात जणांना बढती मिळाली आहे.

आता भाजप संघटनेतही होणार मोठे बदल; जावडेकरांसह 'या' नेत्यांना मिळू शकते मोठी जबाबदारी

१२ मंत्र्यांचे राजीनामेकेंद्रीय मंत्रिमंडळ विस्ताराच्या काही तास आधी केंद्रीय माहिती व प्रसारण खात्याचे मंंत्री प्रकाश जावडेकर, आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन, माहिती तंत्रज्ञानमंत्री रविशंकर प्रसाद या मंत्र्यांसह १२ केंद्रीय मंत्र्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. त्यामध्ये शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल निशंक, संतोषकुमार गंगवार, देबश्री चौधरी, रतनलाल कटारिया, संजय धोत्रे, थावरचंद गेहलोत, डी. व्ही. सदानंद गौडा, प्रतापचंद्र सारंगी, आदींचीही नावे आहेत.

टॅग्स :Nitish Kumarनितीश कुमारNarendra Modiनरेंद्र मोदीBiharबिहारCabinet expansionमंत्रिमंडळ विस्तार