'नरेंद्र मोदी म्हणजे भारताला लागलेलं व्हाईट फंगस'; काँग्रेस नेत्याची बोचरी टीका

By ऑनलाइन लोकमत | Published: August 8, 2021 03:10 PM2021-08-08T15:10:09+5:302021-08-08T15:13:16+5:30

Yashomati Thakur criticizes PM: काँग्रेसकडून नंदुरबारमध्ये व्यर्थ न हो बलिदान कार्यक्रमाचे आयोजन.

'Narendra Modi is India's white fungus'; Criticism of Congress leader yashomati thakur | 'नरेंद्र मोदी म्हणजे भारताला लागलेलं व्हाईट फंगस'; काँग्रेस नेत्याची बोचरी टीका

'नरेंद्र मोदी म्हणजे भारताला लागलेलं व्हाईट फंगस'; काँग्रेस नेत्याची बोचरी टीका

googlenewsNext

नंदुरबार: 'पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणजे भारताला लागलेलं व्हाईट फंगस आहे', अशी बोचरी टीका काँग्रेस नेत्या आणि महाराष्ट्राच्या महिला आणि बालविकास मंत्री यशोमती ठाकूर यांनी मोदींवर केली आहे. तसेच, भगवा ही कुणा एका पक्षाची जहागीर नाही, मुळात केंद्र सरकारच हिंदूविरोधी आहे, असा घणाघातही त्यांनी केला.  काँग्रेसकडून नंदुरबारमध्ये व्यर्थ न हो बलिदान, कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी बोलताना यशोमती ठाकूर बोलत होत्या.

भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्तानं महाराष्ट्र काँग्रेस कमिटीच्याकडून नंदुरबारमध्ये व्यर्थ न हो बलिदान कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी नंदुरबारमधील शहीद शिरीष कुमार आणि त्याच्या साथिदारांना अभिवादन करुन त्यांच्या स्मृतींना उजाळा देण्यात आला. यावेळी यशोमती ठाकूर आणि मंत्री के. सी. पाडवी यांच्या हस्ते स्वातंत्र्यसैनिक आणि त्यांच्या कुटुंबियांचा सत्कार करण्यात आला. यावेळी बोलताना यशोमती ठाकूर यांनी राज्यातील शैक्षणिक विषयावरही भाष्य केलं.

राज्यातील बालगृहातील 209 विद्यार्थ्यांनी 12 वी उत्तीर्ण होऊन उज्ज्वल यश मिळवलं. कौटुंबिक प्रेम आणि सुरक्षित वातावरण हेच यश मिळवण्यामागचे गमक असते असे नाही तर जिद्द आणि शिक्षणाची ओढ असल्यास प्रतिकूल परिस्थितीतही यशाला गवसणी घालता येते हे या मुलांनी दाखवून दिले आहे, असं यशोमती ठाकूर म्हणाल्या. तसेच, राज्यातील विविध कारणास्तव काळजी व संरक्षणाची गरज असलेली बालके बाल न्याय अधिनियमानुसार बाल कल्याण समितीकडे सादर केली जातात. सर्व कायदेशीर प्रक्रियेनंतर या बालकांना बालगृहात तर गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या विधीसंघर्षग्रस्त बालकांना पुनर्वसनाच्या दृष्टीने अनुरक्षण गृहात दाखल करण्यात येतात. या मुलांच्या पालन पोषणासह शिक्षण तसेच सर्वांगीण विकासासाठी सर्व त्या सोयीसुविधा शासन पुरवते, अशी माहिती त्यांनी दिली.

Web Title: 'Narendra Modi is India's white fungus'; Criticism of Congress leader yashomati thakur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.