जयपूर: गेल्या अनेक महिन्यांपासून राजस्थानच्या राजकारणातकाँग्रेस आणि भाजपमधील अंतर्गत वाद चांगलाच रंगल्याचे पाहायला मिळत आहे. एकीकडे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्यावर सचिन पायलट नाराज असून, ते कधीही काँग्रेसला सोडचिठ्ठी देतील, असा कयास बांधला जात आहे. तर भाजपमधील वसुंधरा राजे गट राज्यातील पक्ष नेतृत्वावर नाराज असून, बंडखोरी करण्याच्या तयारी असल्याची चर्चा आहे. यातच आता भाजपच्या राष्ट्रीय उपाध्यक्षांनी सचिन पायलट लवकरच भारतीय जनता पक्षात प्रवेश करणार असल्याचा दावा केला आहे. (national vice president abdullakutty claims sachin pilot will soon join bjp)
पाकिस्ताननंतर आता बांगलादेशात ६ मंदिरांमध्ये तोडफोड; ५० हून अधिक मूर्तींचे नुकसान
भाजपचे राष्ट्रीय उपाध्यक्ष ए पी अब्दुल्लाकट्टी भाजप अल्पसंख्यक मोर्चाच्या प्रदेश कार्यसमितीच्या एका बैठकीला उपस्थित होते. यानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी बोलताना ते म्हणाले की, सचिन पायलट चांगले नेते आहेत. आगामी काळात लवकरच सचिन पायलट काँग्रेसला सोडचिठ्ठी देऊन भाजपमध्ये प्रवेश करतील.
पायलट यांनी लगावला टोला
गेल्या वर्षभरापासून काँग्रेसमध्ये अंतर्गत कलह सुरू असल्याचे पाहायला मिळत असून, सचिन पायलट यांच्या समर्थक आमदारांनी बंडखोरी करण्याचा निर्णयही घेतला होता. मात्र, तो प्लान यशस्वी झाला नाही. काँग्रेसने त्यावेळी वेळ मारून नेली. यानंतर भाजप नेत्या रिटा बहुगुणा जोशी यांनी सचिन पायलट भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचे म्हटले होते. यावर, बहुगुणा यांनी सचिन तेंडुलकरसोबत चर्चा केली असेल. माझ्यासोबत चर्चा झालेली नाही, असे म्हणत सचिन पायलट यांनी टोला लगावला होता.
“मानवाधिकारांना पोलीस ठाण्यांमध्ये सर्वाधिक धोका, कोठड्यांमधील छळ कायम”
दरम्यान, सचिन पायलट यांनी गेल्या ६ महिन्यांत देशात पेट्रोलच्या किंमती जवळपास ६६ वेळा वाढल्या आहेत, असे म्हणत मोदी सरकारवर जोरदार निशाणा साधला होता. सध्याच्या काळात पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतींमध्ये वाढ झाल्यावर सर्वच गोष्टी महाग होत आहेत आणि त्याचा थेट परिणाम हा सर्वसामान्यांच्या आर्थिक गणितावर होतो आहे. आजच्या काळात पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती तर शुद्ध देशी तुपापेक्षाही जास्त झाल्या आहेत, अशा शब्दांत पायलट यांनी टीकास्त्र सोडले होते.