Navjot Singh Sidhu: रॅलीवेळी नवज्योत सिंग सिद्धू जखमी; पायातून रक्त वाहत होते तरीही रोड शो केला
By ऑनलाइन लोकमत | Published: July 20, 2021 10:58 PM2021-07-20T22:58:26+5:302021-07-20T23:01:21+5:30
Navjot Singh Sidhu's Right leg toe injured: सिद्धू यांना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष करण्याचा निर्णय दिल्लीतून आलेला असला तरीदेखील पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी त्यांची भूमिका कायम ठेवली आहे. जोवर सिद्धू हे त्यांनी केलेल्या आरोपांवर आणि कुरापतींवर माफी मागत नाहीत, तोवर त्यांना भेटणार नसल्याची भूमिका त्यांनी घेतली आहे.
पंजाबकाँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बनताच नवज्योत सिंग सिद्धू (Navjot Singh Sidhu) यांच्या स्वागतासाठी अमृतसरमध्ये शेकडो कार्यकर्ते, चाहत्यांनी गर्दी केली होती. याचवेळी या गर्दीमध्ये सिद्धू यांच्या पायाला दुखापत झाली. उजव्या पायाच्या बोटातून रक्त वाहत होते, तरी देखील त्यांनी रोड शो पूर्ण केला. (Punjab Congress chief Navjot Singh Sidhu was welcomed by hundreds of people in Amritsar. )
अमृतसरमध्ये रोड शो वेळी सिद्धूंच्या उजव्या पायाच्या बोटाचे नख उखडले. नवनशहरमध्ये ही जखम झाली. या नखातून रक्त वाहत होते. तरीदेखील सिद्धू यांनी जखमी पायाने 129 किमीचा प्रवास केला. या दरम्यान सिद्धू यांनी फगवारा, जालंधर आणि अमृतसरच्या नागरिकांकडून शुभेच्छा स्वीकारल्या.
Reports of Navjot Singh Sidhu seeking time to meet
— ANI (@ANI) July 20, 2021
Punjab CM Amarinder Singh are totally false. No time has been sought. No change in stance -- CM won’t meet Sidhu till he publicly apologises for his personally derogatory social media attacks against him: Media Advisor to the CM pic.twitter.com/9uuIURJRme
दरम्यान, सिद्धू यांना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष करण्याचा निर्णय दिल्लीतून आलेला असला तरीदेखील पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी त्यांची भूमिका कायम ठेवली आहे. जोवर सिद्धू हे त्यांनी केलेल्या आरोपांवर आणि कुरापतींवर माफी मागत नाहीत, तोवर त्यांना भेटणार नसल्याची भूमिका त्यांनी घेतली आहे. यामुळे जरी सिद्धू यांना अध्यक्षपद मिळाले असले तरी कॅप्टन आणि बाजवा यांचा विरोध सहन करावा लागणार आहे. यामुळे सिद्धू हे या विरोधात, असहकारात पक्षाचे काम कसे करतात यावर देखील अनेकांचे लक्ष असणार आहे.
सिद्धू यांनी नुकतीच त्यांच्या गोटातील जवळपास 26 आमदारांची भेट घेतली होती. यामुळे कॅप्टन समर्थक आमदार सिद्धू यांच्याशी जुळवून घेतील का, घेतलेच तर त्यांच्यावर कॅप्टनची वक्रदृष्टी होईल का, असे प्रश्न पंजाबच्या राजकारणात डोकेवर काढणार आहेत.