मुंबई: एकीकडे अतिवृष्टी, दरडी कोसळून नागरिकांचे बळी जात असताना, दुसरीकडे मात्र भाजप झारखंडमधील सरकार पाडण्याचा प्रयत्न करत आहे. यामध्ये भाजप नेते आणि माजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे नाव समोर येतेय, असा गंभीर आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि मंत्री नवाब मलिक यांनी केला आहे. (nawab malik alleged that chandrashekhar bawankule involved in overthrow hemant soren govt in jharkhand)
झारखंडमधील सरकार पाडण्यासाठी भाजप नेते प्रयत्न करत आहेत. आमदारांना पैसे देऊन कटकारस्थान रचण्याचे काम भाजप करत आहे. इतकेच नव्हे, तर एका पत्रकारालाही अटक करण्यात आली आहे. तसेच पोलिसांकडून एका हॉटेलात छापा टाकून तीन जणांना अटक केली. या तिघांनी भाजपच्या कोणत्या नेत्यांचा यात सहभाग आहे, याची कबुली दिल्याचा दावा नवाब मलिक यांनी केला आहे. मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
“सरकार पाडण्यासाठी १ कोटी आणि मंत्रिपदाची ऑफर दिली होती”; काँग्रेस आमदाराचा मोठा दावा
चंद्रशेखर बावनकुळे आमदारांशी डील करत होते?
काँग्रेसचे अमित कुमार यादव, इरफान अन्सारी आणि अपक्ष आमदार उमाशंकर अकेले यांना इंडिगोच्या विमानाने दिल्लीत नेण्यात आले. या तिघांना दिल्लीला नेणाऱ्या व्यक्तीचे नाव जयकुमार बेलखेडे असून, ते माजी कमांडर असल्याचे समोर येत आहे. ते कोचिंग क्लासेस चालवतात, असा दावा नवाब मलिक यांनी केला. दिल्लीतील हॉटेलमध्ये चंद्रशेखर बावनकुळे या तीनही आमदारांशी चर्चा करून डील करत होते. तसेच अमित यादव, अभिषेक ठक्कर पैसे घेऊन दाखल झाले. मात्र, पोलिसांचा छापा पडणार असल्याची कुणकुण त्यांना लागली आणि ते हॉटेलमधून निघून गेले. तरीही तीन शासकीय अधिकारी अन् लिकरला पडकले. मोठी रोख रक्कम तेथून हस्तगत करण्यात आली, अशी माहिती मलिक यांनी दिली.
“भास्कर जाधव यांचे गैरवर्तन म्हणजे मालकाला खूश करण्याचा प्रकार”; भाजपची टीका
चंद्रशेखर बावनकुळे यांचे FIR मध्ये नाव?
या प्रकणाचा तपास करण्यासाठी विशेष तपास पथक स्थापन करण्यात आले असून, महाराष्ट्रातील दोन आमदारांची नावे समोर येत आहेत. त्यामुळे महाराष्ट्रात येऊनही विशेष तपास पथक चौकशी करणार आहे. पोलिसांनी दाखल केलेल्या FIR मध्ये चंद्रशेखर बावनकुळे यांचे नाव आहे, असे मलिक म्हणाले. झारखंडमधील तपास यंत्रणेला मुंबई, महाराष्ट्रात तपास करण्यासाठी राज्य सरकार संपूर्ण सहकार्य करण्याची भूमिका असल्याचे मलिक यांनी यावेळी बोलताना नमूद केले.
“हिंदुत्ववादी भूमिका महत्त्वाची; मनसे शत्रूपक्ष नाही, पण...”; युतीबाबत फडणवीसांचे सूचक विधान
दरम्यान, कोलेबिरा मतदारसंघाचे आमदार असलेल्या कोंगारी यांनी आपल्यालाही सरकार पाडण्यासाठी मोठी ऑफर देण्यात आली होती. तीन जण माझ्यापर्यंत पक्षाचे कार्यकर्ते म्हणून पोहोचले होते. त्या तिघांपासून दूर जाण्याचा प्रयत्न केले. पण ते पुन्हा वेगवेगळ्या मार्गाने संपर्कात यायचे. एकदा तर त्यांनी मला रोख १ कोटी आणि मंत्रिपदाची ऑफर दिली. ही ऑफर आल्यानंतर लागलीच हे सगळे पक्षाचे नेते आलमगीर आलम आणि पक्षाचे प्रभारी आरपीएन सिंह यांच्या कानावर घातले. याबद्दल मी मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनाही माहिती दिली होती, असे आमदार कोंगारी यांनी सांगितले.