मुंबई: गेल्या काही दिवसांपासून मुख्यमंत्री कार्यालयाकडून कॅबिनेट बैठकीत घेण्यात आलेल्या निर्णयांची माहिती देताना औरंगाबादसाठी संभाजीनगर, तर उस्मानाबादसाठी धाराशिव नाव वापरण्यात येत आहे. याला काँग्रेसनं आक्षेप घेतला असला तरीही मुख्यमंत्री कार्यालयाच्या ट्विटर हँडलवरून तेच शब्द वापरले गेले. त्यामुळे शिवसेना विरुद्ध काँग्रेस सामना पाहायला मिळाला. आता या वादावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी भाष्य केलं आहे. औरंगाबादनंतर आता 'या' जिल्ह्यावरून वातावरण तापणार?; CMOचं ट्विट ठरतंय चर्चेचा विषयमुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी औरंगाबादचा उल्लेख संभाजीनगर असा केल्यानं सीएमओच्या ट्विटर हँडलवर संभाजीनगर शब्द वापरला गेला. त्यावरून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आणि महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी नाराजी व्यक्त केली. त्यांनी ट्विट करत माहिती व जनसंपर्क विभागाला बजावलं होतं. मात्र त्यानंतरही CMO च्या ट्विटर हँडलवर औरंगाबादचा उल्लेख संभाजीनगर असा करण्यात आला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी त्यांच्या विधानात संभाजीनगर म्हटल्यानं सीएमओनं तोच शब्द ट्विटमध्ये वापरला होता.पुढेही हेच करणार; 'संभाजीनगर'वरील थोरातांच्या आक्षेपानंतरही मुख्यमंत्री ठाकरे जोरातदोनच दिवसांपूर्वी सीएमओनं मंत्रिमंडळ निर्णयांची माहिती देताना उस्मानाबादपुढे धाराशिव शब्द वापरला. शिवसेनेकडून नामांतराचा मुद्दा रेटला जात असताना आणि काँग्रेसकडून त्याला विरोध होत असताना शरद पवार यांनी यावर अगदी मोजक्या शब्दांत भाष्य केलं. 'आमच्यात कोणतेही मतभेद नाहीत. या विषयाकडे मी गांभीर्यानं पाहत नाही,' असं पवार म्हणाले. CMO चं पुन्हा औरंगाबादचं संभाजीनगर उल्लेख करत ट्विट; काँग्रेसला डिवचण्याचा शिवसेनेचा प्रयत्न?
मुख्यमंत्री ठाम, काँग्रेस नाराजमुख्यमंत्री उद्धव ठाकरे औरंगाबादचा उल्लेख संभाजीनगर असा करत असल्यानं काँग्रेसनं नाराजी व्यक्त केली. औरंगाबादच्या नामांतराला काँग्रेसचा असलेला विरोध कायम असल्याची भूमिका मंत्री बाळासाहेब थोरात यांनी स्पष्ट केली. त्यानंतरही मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी औरंगाबादला संभाजीनगरच म्हणणार असल्याचं ठणकावून सांगितलं. 'मी नवीन काय केलंय? आतापर्यंत मी जे बोलत आलोय, बाळासाहेब जे बोलत आलेत, तेच मी बोलतोय, तेच करतोय आणि पुढेही तेच करणार. औरंगजेब सेक्युलर नव्हता. त्यामुळे महाविकास आघाडी सरकारच्या सेक्युलर अजेंड्यात औरंगजेब बसत नाही,' असं मुख्यमंत्री म्हणाले.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी पुन्हा एकदा संभाजीनगर म्हटल्यावर काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी त्यांच्या भूमिकेचा पुनरुच्चार केला. 'छत्रपती संभाजी महाराज आमचं श्रद्धास्थान आहे. आम्ही त्यांचा आदर करतो. मात्र आमचा नामांतराला आणि त्यावरून होणाऱ्या राजकारणाला विरोध आहे. महाविकास आघाडीनं किमान समान कार्यक्रम निश्चित केला आहे. त्यामुळे मतभेदांचे मुद्दे चर्चेतून सोडवू. आमची भूमिका मुख्यमंत्र्यांनी पटवून देऊ,' असं थोरात यांनी म्हटलं.