मुंबई – राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची घेतलेली मुलाखत ही राज्याच्या राजकारणातील ऐतिहासिक मुलाखत ठरेल असा दावा शिवसेना नेते संजय राऊत यांनी केली आहे. या मुलाखतीत शरद पवारांनी देशाच्या राजकारणापासून राज्याच्या राजकारणापर्यंत अनेक प्रश्नांची उत्तरे दिली आहेत. या मुलाखतीचे प्रोमो प्रसिद्ध करण्यात येत आहेत. त्यात पवारांनी वेगवेगळ्या मुद्द्यावर भाष्य केल्याचं दिसून येते.
शरद पवारांच्या या मुलाखतीत प्रियंका गांधी यांना मोदी सरकारने राहत्या घराच्या बाहेर काढलं या प्रश्नाला उत्तर देताना हे मोदी सरकारचं शुद्रपणाचं राजकारण आहे. सत्ता ही विनयाने वापरायची असते, सत्तेचा दर्प डोक्यात गेला की अशाप्रकारे गोष्टी होत असतात असं टीकास्त्र पंतप्रधान नरेंद्र मोदींवर सोडलं आहे. ही संपूर्ण मुलाखत उद्यापासून तीन टप्प्यात प्रेक्षकांना पाहता येणार आहे.
तसेच उद्धव ठाकरेंच्या कामाची पद्धत ही शिवसेनेच्या कामाची पद्धत आहे. भाजपाच्या हातात सरकार चालवायला देणे हे शिवसेनेच्या हिताचं नाही, राज्यात सेंट्रल ऑफ पॉवर एकच असली पाहिजे असं पवारांनी सांगितले. तसेच पार्लांमेटमध्ये नरेंद्र मोदींच्या चेंबरमध्ये जाऊन काय संवाद झाला याबाबतही पवारांनी मुलाखतीत खुलासा केला आहे.
शरद पवारांचा विरोधकांवर घणाघात; भाजपाच्या हातात सरकार चालवायला देणं म्हणजे...
दरम्यान, बुधवारी या मुलाखतीचा पहिला टिझर प्रसिद्ध झाला. त्यात महाराष्ट्रातील सत्ता बदल हा अपघात होता काय?' असा मथळा असलेला हा व्हिडिओ उत्कंठा वाढवणारा ठरला. शरद पवारांची मुलाखत ऐतिहासिक ठरेल. अशी मुलाखत होणे नाही, असा दावा राऊत यांनी केला आहे. 'शरद पवार यांची मुलाखत घेण्याचं आधीच ठरलं होतं. शरद पवार हे राज्यातील देशातील प्रमुख नेते आहेत. लोकांनी बघितलेले आणि मी पाहिलेले पवार वेगळे आहेत. त्यांच्याविषयी गैरसमज पसरवण्यात आले, बदनामीकारक विधानं केली गेली. जेव्हा पहाटेचा शपथविधी झाला, तेव्हा लोकांनी पवारांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केलं होतं. पण मी म्हटलं होतं की, शरद पवार सरकार स्थापन करतील. त्यांनी बसलेली खीळ तोडून सरकार स्थापन केलं,' असं राऊत यांनी म्हटलं होतं.
तर संजय राऊत यांची एक मुलाखत घ्या आणि त्याला ‘एक नारद, शिवसेना गारद’ असे नाव द्या अशा संदेश मला व्हाट्सअप आल्याचा चिमटा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी काढला. तसेच, सामना हे सध्या बाळासाहेबांचा सामना राहिला नाही. सामना सध्या वाचतंच, कोण? असे म्हणत सामना वर्तमानपत्र आपण वाचत नसल्याचेही फडणवीस यांनी म्हटलं आहे.
अन्य महत्त्वाच्या बातम्या
छत्रपती शिवाजी महाराजांची थट्टा खपवून घेणार नाही; ‘लोकमत’च्या बातमीची सरकारकडून दखल
स्टँडअप कॉमेडियनने केली छत्रपती शिवाजी महाराजांची थट्टा; सोशल मीडियात संतापाची लाट
गँगस्टर विकास दुबेचा खात्मा, जप्त केलेल्या ‘त्या’काळ्या बॅगेतून उलगडणार अनेक रहस्य
जम्मू काश्मीर हा भारताचा अविभाज्य घटक आहे, होता आणि यापुढेही राहील; पाकला सुनावलं