“ज्यांनी बँका बुडवल्या, ‘त्यांना’ पक्षात येण्याचं निमंत्रण?; राष्ट्रवादीत प्रवेश हा काय घरगुती निर्णय आहे का?”

By प्रविण मरगळे | Published: February 21, 2021 12:21 PM2021-02-21T12:21:05+5:302021-02-21T12:23:30+5:30

Satara NCP Disputes over Shashikant Shinde And Shivendraraje Bhosale Political Happening: जयंत पाटील, अजित पवारांचीही भेट झाली, मात्र एकदाही शिवेंद्रराजेंना पक्षात घ्यायचं आहे असं कुठेही त्यांनी सांगितलं नाही

NCP Dipak Pawar Target Shashikant Shinde & Shivendraraje Bhosale | “ज्यांनी बँका बुडवल्या, ‘त्यांना’ पक्षात येण्याचं निमंत्रण?; राष्ट्रवादीत प्रवेश हा काय घरगुती निर्णय आहे का?”

“ज्यांनी बँका बुडवल्या, ‘त्यांना’ पक्षात येण्याचं निमंत्रण?; राष्ट्रवादीत प्रवेश हा काय घरगुती निर्णय आहे का?”

Next
ठळक मुद्देविधानसभेच्या काळात शरद पवारांची पावसात भरसभेत माझी झालेली चूक दुरुस्त करा, या दोन्ही राजांना घरपोच करा असं विधान केले होतेपवारांच्या या विधानावर लोकांनी विश्वास दाखवत जावलीतून ७६ हजारांचे मतदान झाले.ज्यांनी २ बँका बुडवल्या आणि ५ संस्था मोडीत काढल्या त्यांना राष्ट्रवादीत घेणार का?

सातारा -  जिल्हा बँकेंच्या निवडणुकीवरून राष्ट्रवादीतच दोन गट पडल्याचं दिसून येत आहे, एकीकडे भाजपा आमदार शिवेंद्रराजे भोसले आणि राष्ट्रवादी आमदार शशिकांत शिंदे यांच्यातील वाद मिटण्याची चिन्हे दिसत असताना आता राष्ट्रवादीतील एक गट शशिकांत शिंदेविरोधात आक्रमक झाला आहे, जिल्हा बँकेच्या निवडणुकीसाठी चाललेलं राजकारण न समजायला जनता खुळी नाही असं विधान राष्ट्रवादीच्या स्थानिक नेत्याने केले आहे.(NCP Satara Internal Disputes over Shashikant Shinde Invite Shivendraraje Bhosale in Party)  

याबाबत राष्ट्रवादीचे नेते आणि जिल्हा परिषदेचे सदस्य दीपक पवार यांनी पत्रक काढत म्हटलंय की, मागील १५-२० दिवसांपासून वृत्तपत्राच्या माध्यमातून शिवेंद्रराजे भोसलेंबाबत बातमी वाचायला मिळत आहे, शिवेंद्रराजेंना राष्ट्रवादीत येण्याचं निमंत्रण दिलं जातंय, विधानसभेच्या काळात शरद पवारांची पावसात भरसभेत माझी झालेली चूक दुरुस्त करा, या दोन्ही राजांना घरपोच करा असं विधान केले होते, पवारांच्या या विधानावर लोकांनी विश्वास दाखवत जावलीतून ७६ हजारांचे मतदान झाले. प्रत्येक महिन्याला मी शरद पवारांना भेटतो, जयंत पाटील, अजित पवारांचीही भेट झाली, मात्र एकदाही शिवेंद्रराजेंना पक्षात घ्यायचं आहे असं कुठेही त्यांनी सांगितलं नाही किंवा जिल्हा पदाधिकाऱ्यांमध्ये कुठेही ठराव झाला नाही असं ते म्हणाले.

मग शशिकांत शिंदे म्हणतात, शिवेंद्रराजे भोसलेंना राष्ट्रवादीत या, नगरपालिका तुमच्या नेतृत्त्वात लढू, हा काय घरगुती पक्षप्रवेश कार्यक्रम आहे का? कुठेतरी विचार करून बोललं पाहिजे, ज्या ७६ हजार मतदारांनी राष्ट्रवादीला मतदान केले त्यांना तुम्ही हे विचारलं का? शशिकांत शिंदे यांच्या आवाहनामुळे कार्यकर्त्यांमध्ये चलबिचल झाली आहे. जिल्ह्यात विविध संस्थेवर राष्ट्रवादीची सत्ता आहे, मग शिवेंद्रराजेंना घेऊन राष्ट्रवादीची सत्ता येणार आहे का? ज्यांनी २ बँका बुडवल्या आणि ५ संस्था मोडीत काढल्या त्यांना राष्ट्रवादीत घेणार का? असा सवाल दीपक पवार यांनी शशिकांत शिंदेंना विचारलं आहे.

त्याचसोबत ग्रामपंचायत निवडणुकीत राष्ट्रवादीला चांगले यश मिळालं, अनेक ग्रामपंचायती राष्ट्रवादीच्या ताब्यात आहे मग असं असताना शशिकांत शिंदे अशाप्रकारे विधान ज्या ७६ हजार मतदारांनी राष्ट्रवादीला साथ दिली. त्या मतदारांमध्ये संभ्रमावस्था निर्माण करत आहेत. तो संभ्रम त्यांनी तत्काळ थांबवावा असं दीपक पवार यांनी शशिकांत शिंदेंना सांगितले.

Web Title: NCP Dipak Pawar Target Shashikant Shinde & Shivendraraje Bhosale

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.