टीकेचे बाण सोडणाऱ्या राऊतांवर स्पष्टच बोलले अजित पवार; दिला 'मोलाचा' सल्ला

By ऑनलाइन लोकमत | Published: March 28, 2021 04:42 PM2021-03-28T16:42:06+5:302021-03-28T16:43:39+5:30

ncp leader ajit pawar statement on shiv sena mp sanjay rauts jibe on anil deshmukh: त्रयस्थांनी बोललं तर समजू शकतो; पण आपल्यातल्या कोणी अडचणीत आणू नये; अजित पवारांचा राऊतांना सल्ला

ncp leader ajit pawar statement on shiv sena mp sanjay rauts jibe on anil deshmukh | टीकेचे बाण सोडणाऱ्या राऊतांवर स्पष्टच बोलले अजित पवार; दिला 'मोलाचा' सल्ला

टीकेचे बाण सोडणाऱ्या राऊतांवर स्पष्टच बोलले अजित पवार; दिला 'मोलाचा' सल्ला

Next

मुंबई: निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे प्रकरणावरुन माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी थेट गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप केले. याचे पडसाद थेट संसदेत उमटले आणि या प्रकरणामुळे देशात खळबळ उडाली. भारतीय जनता पक्षानं यावरून ठाकरे सरकारला धारेवर धरलं. यानंतर आता शिवसेना खासदार संजय राऊत यांनी अनिल देशमुख यांना लक्ष्य केलं आहे. त्यामुळे महाविकास आघाडीत धुसफूस पाहायला मिळत आहे. (ncp leader ajit pawar statement on shiv sena mp sanjay rauts jibe on anil deshmukh)

देशमुखांना अपघाताने मिळाले गृहमंत्रीपद, राऊतांनी रोखठोक चालवले बाण

'पोलीस आयुक्त, गृहमंत्री, मंत्रिमंडळातील प्रमुख लोक यांचा लाडका व भरवशाचा असलेला सचिन वाझे फक्त साधा सहाय्यक पोलीस निरीक्षक होता. त्याला मुंबई पोलिसांचे अमर्याद अधिकार कोणाच्या आदेशाने दिले हा खऱ्या चौकशीचा विषय आहे. मुंबई पोलीस आयुक्तालयात बसून वाझे वसुली करीत होता तर गृहमंत्र्यांकडे याबाबत माहिती का नसावी?,' असा सवाल उपस्थित करत राऊत यांनी अनिल देशमुख यांच्या कार्यक्षमतेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केलं. यावर राष्ट्रवादीचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवारांनी भाष्य करत राऊत यांना अप्रत्यक्षपणे उत्तर दिलं आहे.

एकच वाक्य बोलले, पण अगदी सूचक बोलले; शरद पवारांच्या भेटीबद्दल शहा म्हणाले...

देशमुख यांना गृहमंत्रीपद अपघाताने मिळाले. जयंत पाटील, दिलीप वळसे-पाटील यांनी गृहमंत्रीपद स्वीकारण्यास नकार दिला. तेव्हा हे पद शरद पवार यांनी देशमुखांकडे दिले, असं राऊत यांनी त्यांच्या 'रोखठोक' सदरात म्हटलं. त्यावर 'शरद पवारांनी अनेकदा अनेकदा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री ठरवले आहेत. बऱ्याचदा उपमुख्यमंत्रिपद कोण होणार याचे निर्णयदेखील घेतले आहेत. याबद्दल महाविकास आघाडी वगळता एखाद्या त्रयस्थानं काही विधान केल्यास समजू शकतो. पण महाविकास आघाडी सरकारमधल्या नेत्यांनी सरकारचं कामकाज सुरू असताना मिठाचा खडा टाकू नये,' असा इशारावजा सल्ला अजित पवारांनी राऊत यांना दिला.

'सरकारमधील तिन्ही पक्षांच्या नेत्यांनी एकमेकांबद्दल अशी विधानं करू नये. एकमेकांविषयी बोलताना काळजी घ्यायला हवी. ते काय बोलले, हे त्यांना माहीत आहे. महाविकास आघाडी सरकारचा कारभार सुरू असताना कोणी मिठाचा खडा टाकण्याचं काम करू नये. एखाद्या त्रयस्थ व्यक्तीनं असं विधान केल्यास समजू शकतो. पण आपल्यातील कोणी अशा प्रकारे एखाद्याला अडचणीत आणण्याचा प्रयत्न करू, असं अजित पवार म्हणाले

Web Title: ncp leader ajit pawar statement on shiv sena mp sanjay rauts jibe on anil deshmukh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.