'सत्ता गेल्यावर काय अवस्था होते हे वेगळं सांगण्याची गरज नाही...'; अनिल गोटेंचा सरकारला घरचा आहेर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 14, 2021 05:18 PM2021-07-14T17:18:54+5:302021-07-14T17:25:39+5:30

Anil Gote on Mahavikas Aghadi government: 'सत्तारुढ पक्षातील काही नेते प्रसार माध्यमांना स्वतःहून खाद्य पुरवत आहेत'

ncp leader Anil Gote advises leaders in the Mahavikas Aghadi government | 'सत्ता गेल्यावर काय अवस्था होते हे वेगळं सांगण्याची गरज नाही...'; अनिल गोटेंचा सरकारला घरचा आहेर

'सत्ता गेल्यावर काय अवस्था होते हे वेगळं सांगण्याची गरज नाही...'; अनिल गोटेंचा सरकारला घरचा आहेर

Next
ठळक मुद्दे'आताचे काही नेते प्रसिध्दी माध्यमांना स्वतःहून खाद्य पूरवत आहेत''आताच्या नेत्यांना कोणीतरी खडसावून सांगण्याची गरज आहे.'

धुळे: 'सत्तारुढ पक्षातील काही नेते विरोधकांना आवडतील अशी वक्तव्य करत आहेत, असे म्हणत राष्ट्रवादीचे उपाध्यक्ष अनिल गोटे(Anil Gote) यांनी आपल्याच सरकारला घरचा आहेर दिला आहे. काँग्रेस नेते नाना पटोले यांनी थेट मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांवर पाळत ठेवत असल्याचे आरोप केल्यानंतर वातावरण चांगलेच तापले आहे. त्यांच्या आरोपानंतर राष्ट्रवादी-शिवसेनेकडूनही प्रत्युत्तर देण्यात आले. या वादात भाजपने उडी घेत सत्ताधाऱ्यांवर टीका करण्याची संधी सोडली नाही. या सर्व गोष्टीची माध्यमांमध्ये होणारी चर्चा पाहून अनिल गोटेंनी एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे महाविकास आघाडीच्या नेत्यांना घरचा आहेर दिलाय. 

'...तेव्हा एकही बेडी-वाकडी बातमी आली नाही'

आपल्या प्रसिद्धी पत्रकार गोटे म्हणतात की, 'सत्तारुढ पक्षातील काही नेते विरोधकांना आवडतील अशी वक्तव्य करत आहेत. आघाडीत सहभागी असलेले तीनही पक्ष स्वखुशीने सत्तेत आले आहेत. कुणीही कुणाला बळजबरी केलेली नाही. ती जबाबदारी आपण स्वेच्छेने स्विकारली आहे. 1978 मध्ये शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली पुलोदचे सरकार आले. त्या सरकारमध्ये जनसंघ, समाजवादी, प्रजासमाजवादी, शेतकरी कामगार पक्ष तसेच काँग्रेस पक्षातील असंतुष्ट नेते आणि शरद पवारांचा एस. काँग्रेस वगैरे सहभागी होते. मतभेद तेंव्हाही होते. पण चुकूनही वृत्तपत्रात एकही वेडी-वाकडी बातमी आली नाही.

'सत्ता गेल्यावर काय अवस्था होते...'

गोटे पुढे म्हणतात, याउलट आताचे अनेक नेते प्रसिध्दी माध्यमांना स्वतःहून खाद्य पूरवत आहेत. आपले हसू होते हे कोणीतरी खडसावून सांगण्याची गरज आहे. हे कटू सत्य सांगण्याचे धाडस कुणीतरी करणे आवश्यक आहे. हा वाईटपणा घेण्याची जबाबदारी मी स्वतःहून स्वीकारली आहे. आज आपण आपला पक्ष सत्तेत आहे म्हणूनच आपण काय बोलतो? याला प्रसिध्दी माध्यमामध्ये वजन आहे किंवा किंमत आहे. सत्ता गेल्या नंतर आपली काय अवस्था होते हे आपण सर्वांनीच मागील पाच वर्षात अनुभवले आहे. आपण आत्मघात करुन पदरी काय पाडून घेणार आहोत? असा सवाल गोटेंनी विचारला.

भाजपला टोला
गोटेंनी आपल्या प्रसिद्धी पत्रकात भाजपवरही निशाणा साधला. भाजपचे अतिउत्साही आणि मुख्यमंत्री पदासाठी उतावीळ झालेले विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांना असे काही वक्तव्य आले की, हर्षवायूच होतो. त्यांनी वृत्तपत्रांना लगेच सांगितले की, शिवसेनेचा व राष्ट्रवादी काँग्रेसचा थरकाप उडाला. त्याच दिवशी त्याच वर्तमान पत्रात भाजप नेते अशिष शेलार यांनी मात्र काँग्रेसचे वक्तव्य गांभिर्याने घेण्याची आवश्यकता नाही, असे जाहीर केले. भाजपा नेत्यांनी पक्षांतर्गत असलेल्या नेतृत्व स्पर्धेचे उगाच जाहिर प्रदर्शन करु नये, असाही टोलाही गोटेंनी भाजप नेत्यांना लगावला.

Web Title: ncp leader Anil Gote advises leaders in the Mahavikas Aghadi government

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.