शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha 2024: ‘एक्झिट पोल’ इतके गोंधळलेले का आहेत? 'हे' यावेत किंवा 'ते' यावेत; पण...
2
केवायसी नाही म्हणून खाते फ्रीझ करू नका! आरबीआयने सर्व बँकांना खडसावले
3
Maharashtra Vidhan Sabha: आतापर्यंत कोणत्या पक्षाचा स्ट्राइक रेट राहिला सर्वाधिक?
4
गौतम अदानींना अमेरिकेत अटक होऊ शकते? जाणून घ्या दोषी आढळल्यास काय शिक्षा होईल
5
Employment: देशात १९ लाख तरुणांना महिनाभरात मिळाले जॉब; ९.३३ टक्के अधिक संधी
6
सांगोल्यात उच्चांकी मतदानामुळे निकालाची उत्कंठा वाढली; महिलांच्या मतदानाचा फायदा कोणाला?
7
दगाफटका टाळण्यासाठी काँग्रेसकडून खबरदारी, विदर्भातील आमदारांना विशेष विमानाने सुरक्षित ठिकाणी हलवणार
8
माढ्याचा मतदानाचा वाढलेला टक्का कोणाकडे?; गावागावांतील नेतेमंडळी गुंतले आकडेमोडीमध्ये!
9
निवडणुकीत डिपॉझिट वाचवण्यासाठी उमेदवारांना किती मतांची गरज असते?; जाणून घ्या सविस्तर
10
मणिपुरात आमदाराच्या घरातून दीड कोटीचे दागिने लुटून नेले; जमावाने केली नासधूस
11
यशस्वीचा ऑस्ट्रेलियातील पहिला डाव अयशस्वी! टीम इंडियाचा युवा हिरो स्टार्कसमोर ठरला झिरो (VIDEO)
12
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: कामात यशस्वी व्हाल, आर्थिक लाभ होण्याची शक्यता!
13
Zomato च्या झीरो सॅलरी ऑफरमध्ये नवा टर्न; बॅकफायरनंतर दीपिंदर गोयल यांनी आता काय केल?
14
जगभर : सौदी अरेबियाने १०१ परदेशी नागरिकांना लटकवलं फासावर!
15
याला म्हणतात संस्कार! कैलाश खेर समोर येताच गौरव मोरे पडला पाया, अभिनेत्यावर होतोय कौतुकाचा वर्षाव
16
IND vs AUS : बुमराहच्या नेतृत्वाखाली या दोन नव्या चेहऱ्यांना मिळाली पदार्पणाची संधी
17
‘ती’ वादग्रस्त विधाने आयोगाच्या रडारवर; केंद्रीय मुख्य आयुक्तांनी मागवले अहवाल
18
करवीर ते कुलाबा 40 टक्के मतांचे अंतर; असे का ते समजून घ्या!
19
बीड जिल्ह्यात मतदान केंद्र फोडले; ४० जणांवर गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल
20
दहशतवादी हल्ल्यात पाकिस्तानमध्ये ५० ठार; मृतांमध्ये आठ महिला, पाच लहान मुलांचा समावेश

'सत्ता गेल्यावर काय अवस्था होते हे वेगळं सांगण्याची गरज नाही...'; अनिल गोटेंचा सरकारला घरचा आहेर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 14, 2021 5:18 PM

Anil Gote on Mahavikas Aghadi government: 'सत्तारुढ पक्षातील काही नेते प्रसार माध्यमांना स्वतःहून खाद्य पुरवत आहेत'

ठळक मुद्दे'आताचे काही नेते प्रसिध्दी माध्यमांना स्वतःहून खाद्य पूरवत आहेत''आताच्या नेत्यांना कोणीतरी खडसावून सांगण्याची गरज आहे.'

धुळे: 'सत्तारुढ पक्षातील काही नेते विरोधकांना आवडतील अशी वक्तव्य करत आहेत, असे म्हणत राष्ट्रवादीचे उपाध्यक्ष अनिल गोटे(Anil Gote) यांनी आपल्याच सरकारला घरचा आहेर दिला आहे. काँग्रेस नेते नाना पटोले यांनी थेट मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांवर पाळत ठेवत असल्याचे आरोप केल्यानंतर वातावरण चांगलेच तापले आहे. त्यांच्या आरोपानंतर राष्ट्रवादी-शिवसेनेकडूनही प्रत्युत्तर देण्यात आले. या वादात भाजपने उडी घेत सत्ताधाऱ्यांवर टीका करण्याची संधी सोडली नाही. या सर्व गोष्टीची माध्यमांमध्ये होणारी चर्चा पाहून अनिल गोटेंनी एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे महाविकास आघाडीच्या नेत्यांना घरचा आहेर दिलाय. 

'...तेव्हा एकही बेडी-वाकडी बातमी आली नाही'

आपल्या प्रसिद्धी पत्रकार गोटे म्हणतात की, 'सत्तारुढ पक्षातील काही नेते विरोधकांना आवडतील अशी वक्तव्य करत आहेत. आघाडीत सहभागी असलेले तीनही पक्ष स्वखुशीने सत्तेत आले आहेत. कुणीही कुणाला बळजबरी केलेली नाही. ती जबाबदारी आपण स्वेच्छेने स्विकारली आहे. 1978 मध्ये शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली पुलोदचे सरकार आले. त्या सरकारमध्ये जनसंघ, समाजवादी, प्रजासमाजवादी, शेतकरी कामगार पक्ष तसेच काँग्रेस पक्षातील असंतुष्ट नेते आणि शरद पवारांचा एस. काँग्रेस वगैरे सहभागी होते. मतभेद तेंव्हाही होते. पण चुकूनही वृत्तपत्रात एकही वेडी-वाकडी बातमी आली नाही.

'सत्ता गेल्यावर काय अवस्था होते...'

गोटे पुढे म्हणतात, याउलट आताचे अनेक नेते प्रसिध्दी माध्यमांना स्वतःहून खाद्य पूरवत आहेत. आपले हसू होते हे कोणीतरी खडसावून सांगण्याची गरज आहे. हे कटू सत्य सांगण्याचे धाडस कुणीतरी करणे आवश्यक आहे. हा वाईटपणा घेण्याची जबाबदारी मी स्वतःहून स्वीकारली आहे. आज आपण आपला पक्ष सत्तेत आहे म्हणूनच आपण काय बोलतो? याला प्रसिध्दी माध्यमामध्ये वजन आहे किंवा किंमत आहे. सत्ता गेल्या नंतर आपली काय अवस्था होते हे आपण सर्वांनीच मागील पाच वर्षात अनुभवले आहे. आपण आत्मघात करुन पदरी काय पाडून घेणार आहोत? असा सवाल गोटेंनी विचारला.

भाजपला टोलागोटेंनी आपल्या प्रसिद्धी पत्रकात भाजपवरही निशाणा साधला. भाजपचे अतिउत्साही आणि मुख्यमंत्री पदासाठी उतावीळ झालेले विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांना असे काही वक्तव्य आले की, हर्षवायूच होतो. त्यांनी वृत्तपत्रांना लगेच सांगितले की, शिवसेनेचा व राष्ट्रवादी काँग्रेसचा थरकाप उडाला. त्याच दिवशी त्याच वर्तमान पत्रात भाजप नेते अशिष शेलार यांनी मात्र काँग्रेसचे वक्तव्य गांभिर्याने घेण्याची आवश्यकता नाही, असे जाहीर केले. भाजपा नेत्यांनी पक्षांतर्गत असलेल्या नेतृत्व स्पर्धेचे उगाच जाहिर प्रदर्शन करु नये, असाही टोलाही गोटेंनी भाजप नेत्यांना लगावला.

टॅग्स :PoliticsराजकारणMaharashtraमहाराष्ट्रAnil Goteअनिल गोटेNCPराष्ट्रवादी काँग्रेसcongressकाँग्रेसShiv SenaशिवसेनाDhuleधुळेSharad Pawarशरद पवारNana Patoleनाना पटोले