शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचा बळी का..? , वरळीत मुलाला फायदा व्हावा यासाठी उद्धव ठाकरेंचा रईस शेख यांना पाठिंबा"
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : आर्वीचे आमदार दादाराव केचे यांची नाराजी दूर; ४ नोव्हेंबरला नामांकन अर्ज मागे घेणार
3
"गेल्या अडीच वर्षांपूर्वी CM शिंदे यांनाही अशीच धमकी आली होती, पण...!"; उदय सामंत यांचा खळबळजनक आरोप
4
आणखी एका पक्षाचे निवडणूक चिन्ह गेले; शिट्टी हे चिन्ह जनता दल (युनायटेड) साठी आरक्षित
5
निज्जर प्रकरणात गृहमंत्री अमित शहांचे नाव घेतल्याने भारताचा संताप; कॅनडाला फटकारले
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : राज्यात महायुती की महाविकास आघाडी? सर्व्हेतील धक्कादायक आकडे आले समोर
7
"...तर जरांगेंचा बोलवता धनी कोण? यावर शिक्कामोर्तब होईल"; भाजप नेते प्रविण दरेकर स्पष्टच बोलले 
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: 'शरद पवारांचे नाव घेतलं की अंगावर काटा येतो, त्यांच्यावर बोलणं..."; नरहरी झिरवाळांनी स्पष्टच सांगितलं
9
राज्यात पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या १० प्रचार सभा; ८ नोव्हेंबरला पहिली सभा
10
'कोणीही मतदानापासून वंचित राहू नये, साखर कारखाने २१ नोव्हेंबरनंतर सुरु करा'; सदाभाऊ खोतांनी केली मागणी
11
हिट अँड रन प्रकरणात BMW असलेल्या भाजपा नेत्याला पोलिसांनी घेतलं ताब्यात, तपास सुरू
12
लॉरेन्स बिश्नोईच्या नावाने पप्पू यादवांना धमकावणाऱ्याला अटक; मेव्हणीचं सिम वापरुन केला प्लॅन
13
'आयाराम गयाराम' ही म्हण राजकारणात कधी आली?; आमदाराने चक्क एका दिवसात २ पक्ष बदलले
14
सुनील केदार समर्थकांच्या बंडखोरीनं मविआत संताप; ठाकरे-पवारांच्या उमेदवारांना फटका?
15
लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या युवतीच्या मृत्यूचं रहस्य; फ्लॅटमध्ये आढळला मृतदेह
16
देवेंद्र फडणवीसांच्या सुरक्षेत अचानक वाढ, तपास यंत्रणा अलर्ट; नेमकं काय घडलं?
17
मराठा उमेदवारांबाबत रविवारी होणार निर्णय; अंतरवली सराटीत येण्याचे मनोज जरांगेंचे आवाहन
18
वेगवेगळ्या चकमकीत 3 दहशतवाद्यांचा खात्मा; ज्या घरात अडकले होते, त्यालाच जवानांनी लावली आग
19
Rajnath Singh : "अशी परिस्थिती येईल जेव्हा..."; दहशतवादी हल्ल्यांबाबत राजनाथ सिंह यांची मोठी भविष्यवाणी
20
IND vs NZ, 3rd Test Day 2 Stumps: दुसऱ्या दिवशी १५ विकेट्स; तिसऱ्या दिवशीच फुटणार विजयाचे फटाके?

"मोदी सरकारकडून पेट्रोल-डिझेलचे दर वाढवून लोकांचे खिसे कापायचा उद्योग" 

By ऑनलाइन लोकमत | Published: May 21, 2021 9:03 PM

Nawab malik : दुकानदारांना दुकान उघडता येत नाहीय. लोकांना त्रास सहन करावा लागतोय. मात्र केंद्राकडून पेट्रोल - डिझेलची दरवाढ करुन लोकांना उघड लुटण्यात येत असल्याचा आरोपही नवाब मलिक यांनी केला आहे.

ठळक मुद्देसर्वसामान्य लोकांमध्ये जाताना राज्याच्या दोन्ही विरोधी पक्षनेत्यांना नवीन बूट खरेदी करावे लागतात यासारखे आश्चर्य नाही, अशी उपरोधिक टीका नवाब मलिक यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि प्रवीण दरेकर यांच्यावर केली आहे.

मुंबई : जगात पेट्रोलियमचे भाव कमी होत असताना मोदी सरकारकडून मात्र पेट्रोल - डिझेलचे दर वाढवून हळूहळू लोकांचे खिसे कापायचा उद्योग सुरू आहे, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी केला आहे. (NCP Leader Nawab malik criticized PM Narendra Modi on petrol price hike) 

देशात आर्थिक संकट असताना प्रत्येक नागरीक हैराण झालाय. उत्पन्नाचे स्रोत कमी होत चालले आहेत. बर्‍याच लोकांच्या नोकर्‍या गेल्या आहेत. तर काहींना अर्धा पगार मिळतोय. दुकानदारांना दुकान उघडता येत नाहीय. लोकांना त्रास सहन करावा लागतोय. मात्र केंद्राकडून पेट्रोल - डिझेलची दरवाढ करुन लोकांना उघड लुटण्यात येत असल्याचा आरोपही नवाब मलिक यांनी केला आहे.

(काँग्रेस पक्षाकडून १११ अ‍ॅम्ब्युलन्स व ६१ लाख मास्कचे वाटप करणार- नाना पटोले)

'विरोधी पक्षनेत्यांना नवीन बूट खरेदी करावे लागतात, यासारखे आश्चर्य नाही' सर्वसामान्य लोकांमध्ये जाताना राज्याच्या दोन्ही विरोधी पक्षनेत्यांना नवीन बूट खरेदी करावे लागतात यासारखे आश्चर्य नाही, अशी उपरोधिक टीका नवाब मलिक यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि प्रवीण दरेकर यांच्यावर केली आहे. तौक्ते वादळाने कोकणात मोठ्याप्रमाणावर नुकसान झाले आहे. त्याची पाहणी करण्यासाठी राज्याचे दोन्ही विरोधी पक्षनेते कोकणच्या दौर्‍यावर होते. यावेळी प्रसिद्ध झालेल्या फोटोत दोन्ही विरोधी पक्षनेते एकसारखे नवीन बूट घातलेले दिसत आहेत. त्यामध्ये त्यांनी 'नायकी' चे की 'पूमा' चे बूट घातलेत हे माहीत नाही परंतु फोटोत मात्र एकसारखेच बूट दिसत आहेत असा उपरोधिक टोला नवाब मलिक यांनी लगावला आहे.

"कोरोना काळातील असमर्थता लपवण्यासाठी 'बनारस मॉडेल'चा प्रयत्न"देशात कोरोनाच्या विरोधात लढण्यासाठी 'बनारस मॉडेल' चा प्रचार करण्यात येत आहे. मात्र कोरोना काळातील असमर्थता लपवण्यासाठी हा प्रयत्न आता केला जात आहे, असा आरोप नवाब मलिक यांनी नरेंद्र मोदींवर केला आहे. बनारसच्या घाटावरील मृतदेहांवर अंत्यसंस्कार करायला जागा नव्हती. लोकांनी मृतदेह गंगा नदी टाकले. या घटनेची देशभर आणि जगभर चर्चा झाल्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी बनारस मॉडेल बनवण्यासाठी डीएम, डॉक्टर्स, हॉस्पिटलमधील कर्मचारी व अधिकारी यांच्याशी चर्चा करणार असल्याचे समजते. मात्र बनारस मॉडेल काही नाही, असे नवाब मलिक यांनी म्हटले आहे.

('लसी मिळवण्यात गुजरातचा स्ट्राइक रेट महाराष्ट्रापेक्षा जास्त कसा?')

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीnawab malikनवाब मलिकPoliticsराजकारण