शरद पवार आणि अजित पवार यांच्यातील संबंधांवर प्रफुल्ल पटेल यांचे मोठे विधान, म्हणाले...
By ऑनलाइन लोकमत | Published: August 16, 2020 04:10 PM2020-08-16T16:10:36+5:302020-08-16T16:16:01+5:30
पवार कुटुंबीय आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सध्या सुरू असलेल्या घडामोडींवर शरद पवार यांचे निकटवर्तीय आणि राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल यांनी मोठे विधान केले आहे.
नागपूर - गेल्या काही दिवसांत अजित पवारांचे पुत्र पार्थ पवार यांनी केलेली विधाने आणि त्यानंतर शरद पवार यांनी त्याबाबत दिलेली संतप्त प्रतिक्रिया यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अंतर्गत संघर्ष सुरू असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. तसेच पवार कुटुंबामधील अंतर्गत मतभेद दूर करण्यासाठी कुटुंबीयांकडून प्रयत्न सुरू आहेत. त्या पार्श्वभूमीवर शरद पवार यांचे निकटवर्तीय आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल यांनी मोठे विधान केले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये शरद पवार विरुद्ध अजित पवार असा काही विषयच नाही आहे, असे स्पष्टीकरण प्रफुल्ल पटेल यांनी दिले आहे. तसेच पार्थ पवार हा विषयही पक्षासाठी काही मोठा नाही, असे त्यांनी म्हटले आहे. पार्थ पवार यांनी अभिनेता सुशांत सिह राजपूतच्या आत्महत्येची सीबीआय चौकशी करण्याची मागणी केली होती. तसेच जय श्रीराम म्हणत अयोध्येतील राम मंदिराला पाठिंबा दिला होता. त्यावरून राष्ट्रवादीच्या गोटात खळबळ उडाली होती. तसेच पार्थ पवार हे अपरिपक्व असल्याचे विधान शरद पवार यांनी केले होते.
दरम्यान, काँग्रेसच्या नाराजीवरही प्रफुल्ल पटेल यांनी सूचक विधान केले आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादीत काही मतभेदांवर चर्चेतून मार्ग काढण्याचे काम सुरू आहे. मात्र आता राज्यात आम्ही मोठे झालो आहोत. आधी काँग्रेस होती. तसेच आजच्या घडीला आम्ही काँग्रेसला सोबत घेऊन चाललो आहोत. तसेच आता काँग्रेसने राष्ट्रवादीलाही विदर्भात स्थान दिले पाहिजे, अशी मागणी करत आगामी महानगरपालिका निवडणुकांबाबत प्रफुल्ल पटेल यांनी सुचक विधान केले.
पवार कुटुंबामध्ये सगळं व्यवस्थित, शर्मिला पवार यांची प्रतिक्रिया
ष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी फटकारल्याने नाराज असणारे पार्थ पवार कुटुंबातील नातेवाईकांची भेट घेत होते. यामध्ये पार्थ यांची काका श्रीनिवास पवार यांच्या 'अनंतारा ' निवासस्थानी बैठक झाली. यामध्ये पार्थ यांची समजूत घालण्यात आल्याची चर्चा आहे .या चर्चेबाबत' लोकमत'शी बोलताना पार्थ यांच्या काकू शर्मिला पवार यांनी सांगितले की सगळं व्यवस्थित असल्याचं वक्तव्य केलं आहे .
कणन्हेरी येथे पार पडलेल्या बैठकीस उपमुख्यमंत्री अजित पवार, श्रीनिवास पवार, आई सुनेत्रा पवार, काकी शर्मिला पवार यांची उपस्थिती होती. यामध्ये पार्थ यांची समजूत घालण्यात आल्याची चर्चा आहे. पार्थ पवार शनिवारी त्यांचे काका श्रीनिवास यांच्या निवासस्थानी दुपारी साडेतीन वाजता आले होते. मात्र, यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार येणार नसल्याची माहिती मिळाली होती. मात्र, काल रात्री साडेसात वाजता अचानक अजितदादा या ठिकाणी पोहचले. या वेळी पार्थ यांची समजूत घालण्यात आल्याची चर्चा आहे. मात्र, या चर्चेत नेमकं काय घडलं, पार्थ पवार यांची नाराजी दूर झाली का? याबाबत माहिती समजू शकलेली नाही.
इतर महत्त्वाच्या बातम्या
ताशी १८० किमी वेग, उशीर झाल्यास नुकसान भरपाई; अशा असतील देशातील खासगी ट्रेनमधील सुविधा
केवळ ३८ जणांवर चाचणी, अनेक साइड इफेक्ट्स, असं आहे रशियाच्या कोरोनावरील लसीचं वास्तव
आता घरबसल्या स्मार्टफोनद्वारे बनवता येणार रेशन कार्ड, केवळ या कागदपत्रांची आवश्यकता
वुहानमधील ९० टक्के कोरोनामुक्त रुग्णांची फुप्फुसे झाली खराब, अभ्यासातून समोर आली धक्कादायक माहिती
टाइम कॅप्सुल म्हणजे नेमकं काय? जमिनीत पुरून ठेवण्यामागे असतो हा उद्देश
अमेरिकेला मिळाली कोरोनावरील लस, खरेदी केले १० कोटी डोस
घरी राहिल्यानेही कमी होत नाही कोरोनाच्या संसर्गाचा धोका, संशोधकांचा धक्कादायक खुलासा
कोरोनावरील लस विकसित करण्याच्या शर्यतीत आहेत 'या' सात भारतीय कंपन्या, काहींनी घेतलीय संशोधनात आघाडी