शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंब्र्यात छत्रपती शिवाजी महाराजांचे मंदिर उभारा; फडणवीसांचं उद्धव ठाकरेंना आव्हान
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला; सतेज पाटलांसमोर शाहू महाराजांची घोषणा
3
IPL २०२५ च्या मेगा लिलावाचे शहर ठरले; या तारखांना सौदीत २०४ खेळाडू निवडले जाणार
4
Uddhav Thackeray: शिंदेंना वाटले तर चिन्ह द्या, पण शिवसेना माझीच राहणार; उद्धव ठाकरेंचे मोठे वक्तव्य
5
मावळात राज ठाकरेंनी मोठा निर्णय घेतला; अजित पवार गटाच्या बंडखोर उमेदवाराला पाठिंबा जाहीर
6
गुजरातच्या आणंदमध्ये बुलेट ट्रेनचा पूल कोसळला; दोन मजुरांचा मृत्यू, एक जखमी
7
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "महायुतीची लाडकी बहीण योजना तात्पुरती, आम्ही योजना कायम ठेवणार"; विश्वजीत कदमांचा विरोधकांवर हल्लाबोल
8
महाराष्ट्रापूर्वी झारखंडमध्ये इंडिया आघाडीचा जाहीरनामा; ७ गॅरंटी, महिलांना पैसे देणार
9
पॅरिस ऑलिम्पिकमध्ये महिला बॉक्सरकडून फसवणूक; गोल्ड जिंकलं पण पुरुष असल्याचे उघड झालं
10
कोल्हापूर उत्तरमधून अपक्ष उमेदवार राजेश लाटकर अर्ज मागे घेणार होते, तितक्यात...
11
महाराष्ट्रात कुठे कोणाची ताकद? मुंबई, विदर्भ, मराठवाड्याचे राजकीय समीकरण काय? पाहा...
12
शाहू महाराज खासदारकीचा राजीनामा देणार? सतेज पाटलांनी अपमान केल्याच्या अफवांवर छत्रपतींचे निवेदन...
13
उत्तर महाराष्ट्रातील ११ मतदारसंघात काट्याची लढत; कुठे कुठे बंडखोरांचं आव्हान?
14
ओडिशात धावत्या ट्रेनवर गोळीबार; प्रवाशांमध्ये प्रचंड घबराट, पाहा व्हिडिओ
15
"...तर हार्ट द्या!"; राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीला सुरुवात होताच चर्चेत आली इवांका; काय घडलं?
16
Maharashtra Election: राजघराण्यातील तीन व्यक्ती पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात आमने-सामने
17
देशातील अशी 'ही' १४ गावं; जिथले ५००० मतदार महाराष्ट्र अन् तेलंगणातही करतात मतदान
18
धक्कादायक! तांत्रिकाच्या सांगण्यावरून संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त; वाराणसीत चार जणांच्या हत्येनंतर आत्महत्या
19
राहुल गांधी उद्या महाराष्ट्रात; काँग्रेस विधानसभा प्रचाराचे रणशिंग फुंकणार, मविआच्या सभा
20
भयंकर! यूट्यूबवर Video पाहून गर्भवती महिलेचं केलं ऑपरेशन; महिलेचा मृत्यू होताच डॉक्टर फरार

"जावडेकरांच्या आरोपामुळे लोकांची दिशाभूल होऊ नये म्हणून...", रोहित पवारांनी लसीकरणाबाबत मांडले मुद्दे...

By ऑनलाइन लोकमत | Published: March 20, 2021 5:44 PM

ncp mla rohit pawar gives reply to union minister prakash javadekar on corona vaccination : कोरोनाच्या बाबतीत राज्य सरकार काळजीपूर्वक आणि प्रभावी काम करत असतानाही जावडेकर यांच्या आरोपामुळे लोकांची दिशाभूल होऊ नये म्हणून काही गोष्टींना समोर आणणे गरजेचे वाटते,असे रोहित पवार यांनी नमूद केले आहे.

ठळक मुद्देमहाराष्ट्रात आतापर्यंत केवळ ४४ टक्के लसीचे लसीकरण झाले असून ५६ टक्के लस पडून राहिली असा आरोप केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी बुधवारी केला.

नवी दिल्ली : महाराष्ट्रात कोरोना रुग्ण वाढत असताना आता लसीकरणावरून आरोप-प्रत्यारोप होत आहेत. महाराष्ट्रात आतापर्यंत केवळ ४४ टक्के लसीचे लसीकरण झाले असून ५६ टक्के लस पडून राहिली असा आरोप केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी बुधवारी केला. हा आरोप राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी फेटाळून लावला आहे. तर जावडेकरांच्या या आरोपाला राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनीही सोशल मीडियाद्वारे उत्तर दिले आहे. (ncp mla rohit pawar gives reply to union minister prakash javadekar on corona vaccination) 

"राज्याला आपल्या मनाप्रमाणे लसीचा वापर करता येतो, असे नाही तर तज्ज्ञ गटाने ठरवून दिलेला प्राधान्यक्रम आणि नियोजनानुसारच लसीकरण केले जाते. राज्याकडे लसींचा साठा असला तरी तो परस्पर वितरीत करता येत नाही. यासाठी एका जबाबदार मंत्र्याने राज्य सरकारला दोषी धरणे चुकीचे आहे",  असे उत्तर रोहित पवार यांनी दिले आहे. तसेच, केंद्र सरकारने अधिकाधिक गटांना लसीकरणासाठी परवानगी द्यावी आणि त्यासाठी डोस उपलब्ध करून द्यावेत, यासाठी जावडेकरांनीच केंद्राकडे प्रयत्न करावेत, असा सल्लाही त्यांनी दिला आहे.

याचबरोबर, "महाराष्ट्रातील घनता लक्षात घेता कोरोनाचे प्रमाण देशाच्या तुलनेत महाराष्ट्रात सर्वाधिक आहे. त्यामुळे राज्यात सरसकट लसीकरण होणे आवश्यक आहे. मात्र, जावडेकरांनी याकडे दुर्लक्ष करून स्वतःच्या मातृराज्यावर टीका केली. कोरोनाच्या बाबतीत राज्य सरकार काळजीपूर्वक आणि प्रभावी काम करत असतानाही जावडेकर यांच्या आरोपामुळे लोकांची दिशाभूल होऊ नये म्हणून काही गोष्टींना समोर आणणे गरजेचे वाटते", असे रोहित पवार यांनी नमूद केले आहे.

रोहित पवारांनी लसीकरणाबाबत मांडलेले मुद्दे...

- 'केंद्र सरकारनं स्थापन केलेल्या National Expert Group on Vaccine Administration for COVID-19 (NEGVAC) या तज्ज्ञ गटाच्या सूचनेनुसार देशभरात लसीकरण केलं जातं. लसीच्या चाचण्या, लस निवड, योग्य वितरण, खरेदी, वित्तपुरवठा, वितरण यंत्रणा, लोकसंख्या गटांचे प्राधान्यक्रम, लस Safety Surveillance ठेवणे, प्रादेशिक सुसूत्रता आणि शेजारी देशांना मदत आदींची जबाबदारी या गटाकडं आहे.

- 'एखाद्या राज्याला लसीचे डोस मिळाले म्हणजे, आपल्या मनाप्रमाणे त्यांचा वापर करता येत नाही. राज्याकडं लसींचा साठा असला तरी तो परस्पर वितरीत करता येत नाही. त्यामुळं केंद्राकडून महाराष्ट्राला आतापर्यंत (१२ मार्च) ५४.१७ लाख डोसेसचा पुरवठा झाला असला तरी तज्ज्ञ गटाच्या नियोजनानुसारच ते वापरले जात आहेत.

(Corona Vaccination: महाराष्ट्रात तब्बल 56 टक्के कोरोना लसी वापराविना; प्रकाश जावडेकरांचे राज्य सरकारवर गंभीर आरोप)

- लसींच्या डोसेस वितरणामध्ये काही प्रशासकीय अडचणीही आहेत. कोविनवर लाभार्थ्यांची नोंदणी आणि प्रोग्रेस ट्रॅक करणे ही उद्दिष्टे आहेत. काही लाभार्थी लसीसंदर्भात साशंक असल्याने ती घेण्यास उत्सुक नसतात. त्यामुळं सक्तीने लसीकरण करता येत नाही. कोविन हा डिजिटल प्लॅटफॉर्म असल्यानं ग्रामीण भागात अनेक ठिकाणी नोंदणी करताना अडचणी येत आहेत.

- सर्व बाबींचा विचार करता राज्याला मिळालेल्या लसींपैकी किती डोसेस वापरले हे पूर्णपणे तज्ज्ञ गटाच्या (NEGVAC ) नियोजनावर अवलंबून आहे. त्यामुळं एखाद्या जबाबदार मंत्रीमहोदयांनी लसीकरणाबाबत राज्य शासनाला दोषी धरणं चुकीचं आहे.

- वास्तविक लसीकरणाबाबत राज्य सरकार आपल्या पातळीवर संपूर्ण शक्तीनिशी प्रयत्न करतंय. लसीकरणाविषयी जनजागृती मोहीमही राबवली जात आहे. किंबहुना राज्य सरकार आपली जबाबदारी व्यवस्थित पार पाडत असून ती पुढंही पाडणार असा विश्वास आहे. त्यामुळं राज्य सरकारवर एकांगी टीका न करता राज्याची गरज लक्षात घेऊन केंद्र सरकारने १८ वर्षांपुढील सर्वांचं सरसकट लसीकरण करण्याची गरज आहे.

(आता लसीकरणावरून केंद्र-राज्यात जुंपली, प्रकाश जावडेकर यांचे आरोप टोपे यांनी फेटाळले)

- महाराष्ट्र हे देशाचं इंजिन असून कोणत्याही परिस्थितीत ते पूर्ण कार्यक्षमतेनं सुरू रहाणं आवश्यक आहे. त्यामुळं केंद्र सरकारनं राज्यात सार्वत्रिक लसीकरणास परवानगी द्यावी आणि लसींचे पुरेसे डोसेसही उपलब्ध करून द्यावेत. त्यासाठी जावडेकरांनी प्रयत्न करावेत. 

टॅग्स :Rohit Pawarरोहित पवारPrakash Javadekarप्रकाश जावडेकरRajesh Topeराजेश टोपेCorona vaccineकोरोनाची लसMaharashtraमहाराष्ट्रPoliticsराजकारण