शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे नवे मुख्यमंत्री कोण? सस्पेन्स अजून कायम; १ किंवा २ डिसेंबरला शपथविधी होणार
2
निवडून येतात तेव्हा गपगार, पराभवानंतर EVM ला दाेष; काेर्टाने याचिकाकर्त्यांना फटकारलं
3
कुजबुज! एका छताखाली कोणता झेंडा हाती?; पराभूत उमेदवार आता देवदर्शन करणार
4
प्रत्येक निवडणुकीनंतर EVM विरोधात घोंघावणारे हे वादळ कायमस्वरूपी शमविण्याची गरज
5
...तर महाराष्ट्रात खळबळ उडेल; उद्धव - राज यांनी एकत्र येण्याला आणखी कुठला मुहूर्त हवा?
6
गुजरात ते मुंबई प्रवासात हत्येचा थरार?; तीन वर्षांनी हत्येचा गुन्हा, तपास सुरू
7
...तोपर्यंत कांजूर डम्पिंग बंद करणे अशक्य; मुंबई महापालिका पर्यायी जागेच्या शोधात
8
पश्चिम रेल्वेवर वाढणार एसी लोकलच्या १३ फेऱ्या; वातानुकूलित फेऱ्यांची संख्या ९६ वरून १०९
9
इन्फ्लुएंझामुळे मुंबईकर ‘आजारी’, राज्यात ५७ रुग्णांचा मृत्यू; काय आहेत लक्षणे?
10
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
11
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
12
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
13
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
14
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
15
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
16
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

'असं' करुन विरोधी पक्षांच्या मुद्द्यांमधली हवाच काढून घ्या ना!; रोहित पवारांचा भाजपला चिमटा

By मोरेश्वर येरम | Published: December 27, 2020 1:06 PM

कृषी कायद्यांविरोधात शेतकरी आंदोलनाला महिना उलटूनही सरकार तोडगा काढू न शकल्याच्या मुद्द्यावरुन रोहित पवार यांनी भाजपचा जोरदार समाचार घेतला आहे.

ठळक मुद्देशेतकऱ्यांच्या आंदोलनावरुन रोहित पवारांचा मोदी सरकारविरोधात आणखी एक लेखशेतकरी आंदोलनावर अद्याप तोडगा न निघू शकल्यानं केली टीकाकृषी कायद्यात हमीभावाचा उल्लेख करण्याची केली मागणी

मुंबई"केंद्र सरकारला शेतकऱ्यांची एवढीच काळजी आहे तर या कायद्यांमध्ये हमीभावाचा उल्लेख करुन विरोधी पक्षाच्या मुद्द्यांमधली हवाच काढून घ्या ना, यासाठी विरोधी पक्षाने काही सरकारला रोखलेलं नाही", असा चिमटा राष्ट्रवादी आमदार रोहित पवार यांनी मोदी सरकारला काढला आहे.

कृषी कायद्यांविरोधात शेतकरी आंदोलनाला महिना उलटूनही सरकार तोडगा काढू न शकल्याच्या मुद्द्यावरुन रोहित पवार यांनी भाजपचा जोरदार समाचार घेतला आहे. रोहित पवार यांनी आपल्या फेसबुक पेजवर एक सविस्तर लेख लिहीलाय. 

"शेतकरी आंदोलनाला तब्बल एक महिना झाला तरी शेतकरी आंदोलनाच्या मुख्य मागण्या अद्यापही केंद्र सरकारच्या लक्षात येत नाहीत ही सर्वात मोठी शोकांतिका आहे. शेतकऱ्यांची मुख्य मागणी आहे हमीभाव! मग हमीभावाबद्दल बोलणं अपेक्षित असताना शेतकरी मालक होईल, शेतकऱ्याला माल विकण्याचे स्वातंत्र्य मिळेल अशा इतर गोष्टी सांगण्यातच सरकार वेळकाढूपणा करतंय. पण हमीभावाबद्दल चकार शब्दही काढत नाही. विरोधी पक्ष शेतकऱ्यांची दिशाभूल करत असल्याचा कांगावा सरकारकडून केला जातो पण तिन्ही कायद्यांमध्ये हमीभावाच्या संरक्षणाची एक ओळ का टाकत नाही? सरकारला शेतकऱ्यांची एवढी काळजी आहे तर या कायद्यांमध्ये हमीभावाचा उल्लेख करुन विरोधी पक्षाच्या मुद्द्यांमधली हवाच काढून घ्या ना! यासाठी विरोधी पक्षाने काही सरकारला रोखलेलं नाही", असं रोहित पवार यांनी फेसबुक पोस्टमध्ये लिहीलंय.

महाराष्ट्रातील भाजप नेते रेटून खोटं बोलतातकृषी विधेयकाच्या मुद्द्यावरुन रोहित पवार यांनी राज्यातील भाजप नेत्यांच्या विधानांमध्ये एकमत नसल्याची टीका केली. "महाराष्ट्र भाजपा तर रेटून खोटं बोलण्यात इतकी पुढं गेलीय की आपण काय बोलून जातो याचंही त्यांना भान राहत नाही. कृषी उत्पन्न बाजार समित्यांचं अस्तित्व संपणार नाही, असं केंद्र सरकार म्हणतं आणि दुसरीकडं कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये शेतकऱ्यांची लूट होत असल्याची ओरड महाराष्ट्र भाजपचे नेते करतात. एकंदरीतच सगळाच सावळा गोंधळ सुरुय", असं रोहित पवार यांनी म्हटलं आहे. 

महाविकास आघाडी सरकारने अधिक मदत केल्याचा दावाराज्यात भाजप सरकार असतानाच्या काळापेक्षा गेल्या वर्षभरात महाविकास आघाडी सरकारने अधिक प्राधान्याने शेतकऱ्यांना मदत केल्याचं रोहित पवारांनी म्हटलं आहे. "राज्य सरकार शेतकऱ्यांना मदत करत नसल्याचा निराधार आरोप विरोधी पक्ष नेहमी करत असतो. याबाबत बघितलं तर गेल्या पाच वर्षात मागील सरकारने शेतकऱ्यांना जवळपास ५३ हजार कोटींची मदत केली होती तर महाविकास आघाडी सरकारने अवघ्या एका वर्षात शेतकऱ्यांना जवळपास ३७ हजार कोटीची मदत केलीय. भाजपा सरकारच्या काळात पाच वर्षात जवळपास जेवढी मदत झाली त्याच्या ६७% मदत महाविकास आघाडी सरकारने अवघ्या एका वर्षात केलीय", असा दावा रोहित पवार यांनी केला आहे. 

शेतकरी हा 'शेतकरी' असतोदिल्लीच्या सीमेवरील आंदोलन हे देशातील कानाकोपऱ्यातील शेतकऱ्यांचं आंदोलन असल्याचं रोहित पवारांनी यावेळी नमूद केलं. "काही लोकं म्हणतात की आंदोलन करणारा शेतकरी हा फक्त उत्तर भारतातील आहे; पण मला या लोकांना सांगायचंय की शेतकरी हा फक्त शेतकरी असतो. त्याला ना जात, ना धर्म, ना प्रदेश असतो. त्यामुळं शेतकऱ्यांविषयी असलेली तुमची भावना ही तुमची विचारसरणी दाखवून देत असते", अशी टीका रोहित पवार यांनी भाजपवर केली आहे. 

टॅग्स :Rohit Pawarरोहित पवारNarendra Modiनरेंद्र मोदीFarmer strikeशेतकरी संपFarmerशेतकरीNCPराष्ट्रवादी काँग्रेसBJPभाजपा