नवी दिल्ली: कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव, त्यानंतर करण्यात आलेला लॉकडाऊन, त्यामुळे सर्वसामान्यांना भोगावा लागलेला त्रास, अडचणीत सापडलेली अर्थव्यवस्था यावरून विरोधक सातत्यानं मोदी सरकारला लक्ष्य करत आहेत. कोरोनामुळे ठप्प झालेल्या अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी २० लाख कोटींचं पॅकेज जाहीर केलं. यावरूनही विरोधकांनी सीतारामन यांच्यावर टीका केली. अर्थमंत्र्यांनी जाहीर केलेलं २० लाख कोटींचं पॅकेज किती जणांपर्यंत पोहोचलं, असा सवाल काँग्रेसच्या नेत्यांनी वारंवार उपस्थित केला. मात्र काँग्रेसनं सातत्यानं टीका केलेल्या सीतारामन यांचं राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळेंनी आज संसदेत कौतुक केलं. त्यामुळे उपस्थित असलेल्या अनेकांच्या भुवया उंचावल्या.मार्शल आले नसते, तर उपसभापतींवर हल्ला झाला असता- रविशंकर प्रसाद'निर्मला सीतारामन यांचं मंत्रालय नेहमी इतर विभागांपेक्षा चांगली कामगिरी करतं. आमचे त्यांच्याशी मतभेद असू शकतात. पण मला अर्थमंत्री आणि अर्थ राज्यमंत्री यांच्या कामाचं कौतुक करावंसं वाटतं. ते सातत्यानं विधेयकं सादर आणून परिस्थिती सुधारण्याचा प्रयत्न करत आहेत,' अशा शब्दांत सुळेंनी अर्थमंत्री सीतारामन आणि अर्थराज्यमंत्री अनुराग ठाकूर यांचं कौतुक केलं. सुळेंच्या या स्तुतीसुमनांनी अनेकांचं लक्ष वेधून घेतलं.
मोदींच्या 'त्या' दोन मंत्र्यांबद्दल सुप्रिया सुळे कौतुकानं बोलल्या; उपस्थितांच्या भुवया उंचावल्या
By कुणाल गवाणकर | Published: September 21, 2020 10:23 PM