राष्ट्रवादीची शिवसेनेला साथ, काँग्रेसदेखील देणार हात; पुन्हा एकदा भाजपचा करेक्ट कार्यक्रम?
By ऑनलाइन लोकमत | Published: April 1, 2021 04:58 PM2021-04-01T16:58:24+5:302021-04-01T17:02:21+5:30
NCP samajwadi party backs Shiv Sena in bmc standing committee election: मुंबई महापालिकेत महाविकास आघाडीची नांदी; काँग्रेसच्या भूमिकेकडे लक्ष
मुंबई: मुंबई महापालिकेत महाविकास आघाडीची नांदी होताना दिसत आहे. महापालिका निवडणुकीच्या आधी होणाऱ्या वैधानिक समित्यांच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस आणि समाजवादी पक्षानं शिवसेनेला पाठिंबा दिला आहे. भारतीय जनता पक्षाला रोखण्यासाठी राष्ट्रवादी, समाजवादी पक्षानं शिवसेनेला साथ दिली आहे. तर काँग्रेसच्या भूमिकेकडे लक्ष लागलं आहे. (BMC Standing Committee Election Shivsena gets support of NCP SP)
शरद पवार गुजरातला कशासाठी गेले होते?; जयंत पाटलांनी सांगितलं 'गोड' कारण
स्थायी समिती अध्यक्षपदासाठी नगरसेवक यशवंत जाधव यांना चौथ्यांदा रिंगण्यात उतरवण्यात आलं आहे. महत्वाच्या समित्यांवर शिवसेनेकडून आधीच्याच अध्यक्षांना पुन्हा संधी देण्यात आली आहे. आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सेनेकडून भाजपला रोखण्यासाठी जुनी फळीच मैदानात उतरवण्यात आली आहे. तर राष्ट्रवादी आणि समाजवादी पक्षांनी अर्ज दाखल केले नाहीत. त्यांनी शिवसेनेला पाठिंबा दिला आहे. त्यामुळे पुढील वर्षी होणाऱ्या महापालिका निवडणुकीच्या आधी भाजपेतर पक्ष एकत्र येताना दिसत आहेत.
नोटबंदीपासून ते.....; केंद्र सरकारने यापूर्वीचे निर्णयदेखील नजरचुकीने घेतले असावे; जयंत पाटील यांचा टोला
काँग्रेस शिवसेनेला पाठिंबा देणार की..?
समिती निवडणुकांसाठी काँग्रेसकडून अर्ज दाखल झाले आहेत. मात्र काँग्रेसकडून हे अर्ज मागे घेतले जाणार अशी चर्चा आहे. काँग्रेसदेखील शिवसेनेलाच पाठिंबा देईल असा दावा शिवसेनेकडून करण्यात आला आहे.
महापालिकेतील सध्याचं पक्षीय बलाबल-
शिवसेना- ९२
भाजप- ८२
काँग्रेस- ३०
राष्ट्रवादी काँग्रेस- ९
समाजवादी पक्ष- ६
एमआयएम- २
मनसे- १
अभासे- १