शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

कुणबीसेनेच्या भूमिकेने राष्ट्रवादीच्या अडचणी वाढणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 15, 2019 01:10 IST

कुणबीसेनाप्रमुख विश्वनाथ पाटील यांनी लोकसभा निवडणुकीसाठी भाजप-सेनेला पाठिंबा देत आगामी विधानसभेसाठी नवी खेळी खेळल्याचे चित्र दिसत आहे.

- जनार्दन भेरे भातसानगर : कुणबीसेनाप्रमुख विश्वनाथ पाटील यांनी लोकसभा निवडणुकीसाठी भाजप-सेनेला पाठिंबा देत आगामी विधानसभेसाठी नवी खेळी खेळल्याचे चित्र दिसत आहे. या खेळीमुळे भविष्यात राष्ट्रवादीसमोरच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. अनुसूचित जमातीसाठी राखीव असलेल्या शहापूर विधानसभा मतदारसंघात कधी शिवसेना, तर कधी राष्ट्रवादीचे प्राबल्य दिसून येते. गेल्या २५ वर्षांचा इतिहास पाहता, या मतदारसंघात तीनवेळा शिवसेनेचे दौलत दरोडा, एकवेळा कै. महादू बरोरा निवडून आले.सध्या राष्ट्रवादीचे आमदार पांडुरंग बरोरा हे या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत आहेत. गेल्या आठवड्यात कुणबीसेनेच्या सभेत पांडुरंग बरोरा यांनी व्यासपीठावर उपस्थिती लावून, भविष्यातील राजकीय समीकरणांचे संकेत दिले. काँग्रेसने सुरेश टावरे यांना भिवंडी लोकसभा मतदारसंघाची उमेदवारी जाहीर केलेली असतानाही हा प्रकार घडला होता. त्यामुळे नेत्यांच्या व कार्यकर्त्यांच्या भुवया उंचावल्या होत्या. दरम्यानच्या काळात कुणबीसेनाप्रमुख विश्वनाथ पाटील यांनी सहा कलमी कार्यक्र मास मुख्यमंत्र्यांचा होकार घेऊन महायुतीला पाठिंबा दिल्याने राष्ट्रवादी काँग्रेसची कोंडी झाली आहे.शहापूर विधानसभा मतदारसंघ हा कुणबीबहुल मतदारसंघ आहे. कुणबीसेना स्थापन झाल्यापासून आजपर्यंत या मतदारसंघातील मतदार कुणबीसेनेबरोबर उभे राहिलेत. त्यांनी अनेकदा सेनेलाच पाठिंबा दिला.२०१४ मध्ये भिवंडी लोकसभेसाठी शहापूर विधानसभेतून एकूण दोन लाख ३० हजार २५९ मतदानापैकी एक लाख ४२ हजार ५५६ मतदान झाले. त्यापैकी भाजपचे कपिल पाटील यांना ५३ हजार २७०, काँग्रेसचे विश्वनाथ पाटील यांना ४९ हजार ८०९, तर मनसेने तिसऱ्या क्र मांकाची २२ हजार ४४२ मते मिळवली होती. कुणबीसेनेचा जोर पाहता, विश्वनाथ पाटील यांना काँग्रेसने उमेदवारी देऊनही ते शहापुरात आघाडी घेऊ शकले नाही. या मतदारसंघात कपिल पाटील यांनी तीन हजार ४६१ ची आघाडी घेऊन विजय मिळवला. तो कदाचित मोदीलाटेचा परिणाम होता. कारण, त्यानंतर लगेचच झालेल्या शहापूर विधानसभेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे विद्यमान आमदार पांडुरंग बरोरा हे ५४४४ मतांनी विजयी झाले. त्यावेळी भाजप-शिवसेना युती नसल्याने भाजपचे अशोक इरनक यांना तिसºया क्र मांकाची १८ हजार २२२, तर शिवसेनेचे दौलत दरोडा यांना ५१ हजार १७४ मते मिळाली होती. पांडुरंग बरोरा हे ५६ हजार ७०२ मते घेऊन विजयी झाले होते.सद्य:स्थितीत या विधानसभा मतदारसंघात घडलेल्या राजकीय घडामोडींमुळे येथील मतदार गोंधळलेल्या अवस्थेत आहे. तालुक्यातील शहापूर नगरपंचायतीवर शिवसेनेचे निर्विवाद वर्चस्व आहे. १७ सदस्यीय या नगरपंचायतीत शिवसेनेचे ११, तर भाजप, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रत्येकी तीन नगरसेवक आहेत; मात्र नगरपंचायतीच्या सत्तेमध्ये शिवसेनेने भाजपला बाजूला सारण्याचा सतत प्रयत्न केला आहे. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा मंजूषा जाधव या शिवसेनेच्या, तर उपाध्यक्ष सुभाष पवार हे राष्ट्रवादीचे आहेत. शहापूर पंचायत समितीमध्येही हीच परंपरा कायम ठेवण्यात आली आहे.>कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम कायम : भाजपचे उमेदवार कपिल पाटील यांच्या प्रचारसभेच्या वेळी शिवसैनिकांच्या रोषाला पालकमंत्र्यांसह सर्वांना सामोरे जावे लागले होते. त्यानंतर, पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत आयात उमेदवार नको, असा ठराव मंजूर करून तो शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे पाठवल्याने आयारामांची गोची झाली. एकूणच प्रकारामुळे दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते गोंधळून गेले आहेत.

टॅग्स :NCPराष्ट्रवादी काँग्रेसPoliticsराजकारणbhiwandi-pcभिवंडीMaharashtra Lok Sabha Election 2019महाराष्ट्र लोकसभा निवडणूक 2019