म्हणून पुढच्या १०० पिढ्या मोदींना माफ करणार नाहीत! काँग्रेसच्या युवा नेत्याची टीका

By ऑनलाइन लोकमत | Published: August 13, 2020 06:45 PM2020-08-13T18:45:08+5:302020-08-13T18:50:07+5:30

अर्थव्यवस्था हाताळण्यात केलेल्या या चुकांसाठी पुढच्या १०० पिढ्या मोदींना माफ करणार नाहीत, या शब्दात महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष सत्यजीत तांबे यांनी मोदींवर हल्लाबोल केला आहे.

The next 100 generations will not forgive Narendra Modi! Satyajit Tambe Congress leader | म्हणून पुढच्या १०० पिढ्या मोदींना माफ करणार नाहीत! काँग्रेसच्या युवा नेत्याची टीका

म्हणून पुढच्या १०० पिढ्या मोदींना माफ करणार नाहीत! काँग्रेसच्या युवा नेत्याची टीका

Next
ठळक मुद्देनोटबंदीसारख्या चुकीच्या आर्थिक धोरणांमुळे बेरोजगारी मोठ्या प्रमाणात वाढली होतीलॉकडाऊनमुळे ज्यांना रोजगार होता अश्या 12 करोड लोकांच्या नोकऱ्या गेल्याहे दुष्परिणाम 2-4 वर्षांपूरते मर्यादित नसून येणाऱ्या अनेक पिढ्यांना ते भोगावे लागणार आहेत

मुंबई -  कोरोनाचे संकट येण्याअगोदरच नोटबंदीसारख्या चुकीच्या आर्थिक धोरणांमुळे बेरोजगारी मोठ्या प्रमाणात वाढली होती. त्यात आता लॉकडाऊनमुळे ज्यांना रोजगार होता अश्या 12 करोड लोकांच्या नोकऱ्या गेल्या असून, अतिशय गंभीर परिस्थिती झाली आहे. अर्थव्यवस्था आणि लोकांच्या एकूणच जगण्यावर झालेले हे दुष्परिणाम 2-4 वर्षांपूरते मर्यादित नसून येणाऱ्या अनेक पिढ्यांना ते भोगावे लागणार आहेत. अर्थव्यवस्था हाताळण्यात केलेल्या या चुकांसाठी पुढच्या 100 पिढ्या मोदींना माफ करणार नाहीत, या शब्दात महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष सत्यजीत तांबे यांनी मोदींवर हल्लाबोल केला आहे.

सत्यजीत तांबेंच्या संकल्पनेतून महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसने घेतलेल्या, ‘कहां गये वो 20 लाख करोड?’ या आंदोलनाच्या चौथ्या दिवशी बेरोजगार युवकांशी संवाद साधत त्यांना 20 लाख कोटींच्या पॅकेजची काय मदत मिळाली हे जाणून घेतले. जिल्हा व तालुका पातळीवर बेरोजगार युवकांशी साधलेल्या संवादातून रोजगाराची गंभीर स्थिती समोर आली आहे. गेलेल्या नोकऱ्या परत मिळत नाहीत. लॉकडाउन संपला तरी खर्चाला कात्री लावण्यासाठी कंपन्या कामावरून काढत आहेत. जगायचं कसं हा प्रश्न आहे, अशी निराशा युवकांनी व्यक्त केली. तर "पैसे जाऊ द्या, मोदी म्हणतात नोव्हेंबरपर्यंत ८० करोड लोकांच्या जेवणाची सोय केली आहे. आमच्या गावात तर कुणालाच नाही भेटली ही मदत" अशी सद्यस्थिती असल्याचे काहींनी सांगितले. मोदींनी घोषित केलेल्या 20 लाख करोडच्या पॅकेजबद्दल तरुणांमध्ये नाराजी आणि मोदींनी भ्रमनिरास केल्याचे प्रकर्षाने जाणवले.
उद्या युवक काँग्रेसचे पदाधिकारी भाजप पदाधिकाऱ्यांच्या कार्यालयासमोर धरणे आंदोलन करून त्यांनाच ‘कहां गये वो 20 लाख करोड?’ हा जाब विचारणार आहेत.

इतर महत्त्वाच्या बातम्या

ताशी १८० किमी वेग, उशीर झाल्यास नुकसान भरपाई; अशा असतील देशातील खासगी ट्रेनमधील सुविधा

केवळ ३८ जणांवर चाचणी, अनेक साइड इफेक्ट्स, असं आहे रशियाच्या कोरोनावरील लसीचं वास्तव

आता घरबसल्या स्मार्टफोनद्वारे बनवता येणार रेशन कार्ड, केवळ या कागदपत्रांची आवश्यकता

वुहानमधील ९० टक्के कोरोनामुक्त रुग्णांची फुप्फुसे झाली खराब, अभ्यासातून समोर आली धक्कादायक माहिती

रक्षाबंधनाच्या मुहुर्तावर स्वस्तात सोने खरेदीची संधी, मोदी सरकारच्या या योजनेमुळे होणार सर्वसामान्यांची चांदी

टाइम कॅप्सुल म्हणजे नेमकं काय? जमिनीत पुरून ठेवण्यामागे असतो हा उद्देश

अमेरिकेला मिळाली कोरोनावरील लस, खरेदी केले १० कोटी डोस

घरी राहिल्यानेही कमी होत नाही कोरोनाच्या संसर्गाचा धोका, संशोधकांचा धक्कादायक खुलासा

कोरोनाविरोधात लस विकसित करण्याच्या ऑक्सफर्डच्या मोहिमेचं या महिलेनं केलं नेतृत्व, अवघ्या काही महिन्यांत असं मिळवलं यश

कोरोनावरील लस विकसित करण्याच्या शर्यतीत आहेत 'या' सात भारतीय कंपन्या, काहींनी घेतलीय संशोधनात आघाडी

Web Title: The next 100 generations will not forgive Narendra Modi! Satyajit Tambe Congress leader

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.