मुंबई:राज्य सरकारचे दोन दिवसीय पावसाळी अधिवेशनात सावळा गोंधळ पाहायला मिळाला. मराठा आरक्षण, ओबीसींचे राजकीय आरक्षण, MPSC भरती यांसारख्या मुद्द्यांवरून भाजपने ठाकरे सरकारची कोंडी केल्याचे दिसले. तसेच पहिल्याच दिवशी भाजपच्या १२ आमदारांच्या निलंबनाचा मुद्दाही जोरदार गाजला. अधिवेशनातही सत्ताधारी महाविकास आघाडी आणि विरोधक यांच्यात आरोप-प्रत्यारोपांच्या जोरदार फैरी झडल्याचे पाहायला मिळाले. विधिमंडळात भारतीय जनता पक्षाचे सदस्य कमी करून जर ठाकरे सरकारला वाटत असेल त्यांनी फार मोठा पराक्रम केला तर तो बालिशपणा ठरेल, अशी टीका भाजप नेत्याकडून करण्यात आली आहे. (nilesh rane criticized thackeray govt over 12 bjp mla suspended in assembly)
राज्यातील १५ हजार ५११ रिक्त पदांच्या भरतीसाठी वित्त विभागाची मंजुरी: अजित पवार
पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विधानसभेत जोरदार गोंधळ झाल्याचे पाहायला मिळाले. तसेच विधानसभा अध्यक्षांच्या दालनात झालेल्या शिवीगाळ प्रकरणावरून भाजपच्या १२ आमदारांना एक वर्षासाठी निलंबित करत असल्याचे निर्देश देण्यात आले. यानंतर भाजपने आक्रमक पवित्रा घेत ठाकरे सरकारवर टीकास्त्र सोडले. विधिमंडळाच्या बाहेरही भाजप नेत्यांनी या प्रकारावर तीव्र नाराजी व्यक्त करत महाविकास आघाडी सरकावर निशाणा साधला. भाजप नेते निलेश राणे यांनी ट्विटरच्या माध्यमातून टीका केली आहे.
“शेतकरी देशाचे दुश्मन आहे की पाकिस्तानातून आलेत?” भुजबळांची मोदी सरकारवर टीका
लढायचं असेल तर मैदानात लढा
विधिमंडळात भारतीय जनता पक्षाचे सदस्य कमी करून जर ठाकरे सरकारला वाटत असेल त्यांनी फार मोठा पराक्रम केला तर तो बालिशपणा ठरेल. लढायचं असेल तर मैदानात लढा, खोटं बोलून मैदान सोडायचे असेल तर काही हरकत नाही. जिथे दिसाल तिथे भारतीय जनता पक्ष तुम्हाला पुरून उरेल, या शब्दांत निलेश राणे यांनी टीका केली आहे.
आणि हे वाघ म्हणे...
दुसऱ्या एका ट्विटमध्ये तालिका अध्यक्ष भास्कर जाधव यांना देण्यात आलेल्या संरक्षणाबाबतही निलेश राणे यांनी टोला लगावला आहे. आणि हे वाघ म्हणे... अशा चिंधीचोरांना संरक्षण देण म्हणजे पोलिस दलाचा अपमान आहे. ज्याला मुंगी मारणार नाही त्याला पोलीस संरक्षण देऊन जनतेच्या पैशाचा चुराडा का करत आहात?? भास्कर जाधव स्वतःच्या घरात बाहेरून कडी लावून झोपतो त्याला कोणीही मारणार नाही. आम्ही standard बघून मारतो, असे निलेश राणे यांनी म्हटले आहे.