Nilesh Rane reaction: 'शरद पवारांनी नाना पटोलेंचा पार पान टपरीवालाच करून टाकला...'
By ऑनलाइन लोकमत | Published: July 11, 2021 04:58 PM2021-07-11T16:58:37+5:302021-07-11T17:03:01+5:30
Nilesh Rane reaction on sharad pawar comments to nana patole:नाना पटोलेंच्या टीकेला शरद पवारांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे
मुंबई: राज्यात सध्या राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार(Sharad Pawar) यांनी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंवर(Nana Patole) केलेल्या टीकेची जोरदार चर्चा सुरू आहे. नाना पटोलेंसारख्या लहान माणसांवर मी बोलणार नाही, अशी टीका पवारांनी केली होती. त्यावरून भाजप नेते निलेश राणे(Nilesh Rane) यांनीही पटोलेंवर निशाणा साधलाय.
अरे रे रे... पवार साहेब कधी कधी वाटतं तुम्ही काही लोकांची लायकी खूप चांगली ओळखता. नाना पटोले आत्ता कुठे स्वतःला मुख्यमंत्री पदाच्या स्पर्धेत बघू लागले होते की पवार साहेबांनी त्यांना पान टपरी वालाचं करून टाकला. https://t.co/lY3cxkv4Yd
— Nilesh N Rane (@meNeeleshNRane) July 11, 2021
निलेश राणे यांनी ट्विट करून पटोलंवर टीका केली आहे. आपल्या ट्विटमध्ये राणे म्हणतात, 'अरे रे रे... पवार साहेब कधी कधी वाटतं तुम्ही काही लोकांची लायकी खूप चांगली ओळखता. नाना पटोले आत्ता कुठे स्वतःला मुख्यमंत्री पदाच्या स्पर्धेत बघू लागले होते की पवार साहेबांनी त्यांना पान टपरी वालाचं करून टाकला, असा टोला निलेश राणेंनी लगावला आहे.
काय म्हणाले होते शरद पवार?
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी महाविकास आघडीच्या पाठीत सुरा खुपसला जात आहे. ती बिघाडीच्या मार्गाने जात असल्याची चर्चा सुरु झाली आहे. अशी नाना पटोले यांनी अप्रत्यक्षपणे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर टीका केली होती. त्याबद्दल पत्रकारांनी प्रश्न विचारला असता, पटोलेंसारखी माणसे लहान आहेत. लहान माणसांवर मी बोलणार नाही. सोनिया गांधी बोलल्या असत्यात तर भाष्य केले असते, असे शरद पवार म्हणाले.