मुंबई: अयोध्येतील श्रीराम मंदिर निर्माण कार्यासाठीच्या जमीन खरेदीत झालेल्या कथित घोटाळ्यावरून बुधवारी शिवसेना भवन परिसरात शिवसेना आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये राडा झाला होता. यानंतर आता भाजप आमदार नितेश राणे यांनी शिवसेना भवनावर मोर्चा काढणाऱ्या भाजप युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांचा सत्कार केला आहे. (nitesh rane felicitates bjp yuva morcha workers over marching on shiv sena bhavan)
राम मंदिर न्यासाच्या अयोध्येतील एका जमीन खरेदीवरून राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. शिवसेना नेत्यांनी या व्यवहाराच्या चौकशीची भूमिका घेतली. त्या भूमिकेविरोधात भारतीय जनता युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी बुधवारी शिवसेना भवनसमोर फटकार मोर्चा काढला. काँग्रेससोबत सत्तेत सहभागी झालेली शिवसेना हिंदुत्व विसरली, धर्मनिरपेक्ष बनलेली शिवसेना आता खोटे आरोप करत हिंदुत्वाच्या आस्थेवरही आघात करत असल्याचा आरोप भाजपने केले. यानंतर भाजप आणि शिवसेना यांच्यात आरोप-प्रत्यारोपांच्या फैऱ्या झडत असून, भाजप आमदार नितेश राणे यांनी भाजप युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांचा सत्कार केल्यामुळे वाद वाढण्याची चिन्हे असल्याचे सांगितले जात आहे. यासंदर्भात नितेश राणे यांनी एक ट्विट केले आहे.
आज शूर मावळ्यांचा सत्कार केला!!
राणे नावाने शिवसेना घाबरते. परत समोर आले तर जोरदार उत्तर द्या, आम्ही तुमच्या सोबत आहोत, असे सांगत नितेश राणे यांनी ट्विटवर काही फोटो शेअर केले आहेत. याला आज शूर मावळ्यांचा सत्कार केला, असे ट्विट केले आहे. यावेळी भाजप युवा मोर्चा मुंबई अध्यक्ष तेजींदर तीवाना, दक्षिण मुंबई अध्यक्ष सनी सानप, दक्षिण मध्य मुंबई अध्यक्ष अजित सिंग, उत्तर पश्चिम जिल्हाध्यक्ष सचिन भिलारे, मुंबई कमिटी सदस्य रोहन देसाई यांच्यासाहित ४० कार्यकर्त्यांचा नितेश राणे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
“कोरोनाची तिसरी लाट अधिक दूर नाही”; हायकोर्टाची केंद्र सरकारला नोटीस
दरम्यान, जाऊन सांगा आज सेनाभवन समोर भिडणाऱ्या शिवसैनिकांना..तुमचा उद्धव.. आमच्या मोदी साहेबांसमोर नाक घासून आला आहे. मग तुम्ही कोणाच्या जोरावर छाती फुगवत आहात ?? मानले मुंबईतील भाजप युवा मोर्चाला, असे ट्विट नितेश राणे यांनी करत शिवसेना आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार निशाणा साधला होता.