आमच्याकडून 'ती' चूक झाली; विज बिलावरून अशोक चव्हाणांचा 'शॉकिंग' खुलासा
By ऑनलाइन लोकमत | Published: November 26, 2020 08:53 PM2020-11-26T20:53:00+5:302020-11-26T20:55:22+5:30
अशोक चव्हाणांच्या कबुलीमुळे भाजप, मनसेच्या हाती आयतं कोलीत
मुंबई: लॉकडाऊन काळात आलेल्या भरमसाठ वीज बिलावरून भारतीय जनता पक्षासह महाराष्ट्र नवनिर्माण सेना आक्रमक झाली आहे. भाजप पाठोपाठ आज मनसेनं राज्यभर आंदोलनं केली. वाढीव विज बिलावरून ठाकरे सरकारबद्दल नाराजी असताना, विरोधकांनी आक्रमक पवित्रा घेतला असताना आता सामाजिक सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाणांच्या एका धक्कादायक खुलाशामुळे विरोधकांना आयतं कोलीत मिळण्याची शक्यता आहे.
...म्हणून स्वतःची वीजबिले भरणाऱ्या भाजपा आमदारांचे आभार, ऊर्जामंत्र्यांनी लगावला सणसणीत टोला
उर्जामंत्री नितीन राऊत यांनी वीजबिलात सवलत देण्याची घोषणा करताना घाई केली. त्यांनी अशा प्रकारची पक्षात आणि सरकारमध्ये घोषणा करण्याआधी चर्चा करायला हवी होती. प्रक्रिया पूर्ण करणं आवश्यक होतं. पण तसं झालं नाही, ही आमच्याकडून चूक झाली, अशी कबुली मंत्री अशोक चव्हाण यांनी दिली आहे. चव्हाण यांनी दिलेल्या घरच्या अहेरामुळे राज्य सरकारमध्ये समन्वय नाही का, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
कारभार हाकता येत नसेल तर ऊर्जामंत्र्यांनी राजीनामा देऊन कारकुनी करावी : प्रवीण दरेकर
काय म्हणाले ऊर्जामंत्री नितीन राऊत?
तिन्ही वीज कंपन्याही कुणाच्या तरी ग्राहक आहेत. कोरोनाच्या काळात आलेल्या तीन महिन्यांचं वीज देयके कुणाला जास्त आले असेल, तर तीन हफ्ते पाडून आणि कुणी एकत्र भरत असेल तर २ टक्के सवलत देऊ, अशा तरतुदी केल्या आहेत. याला पैसा लागतो, पैशाचं सोंग घेता येत नाही. माफीचा निर्णय राज्य सरकारचा आहे. कोरोनामुळे झालेल्या आर्थिक नुकसानामुळे आम्हाला थोडं माघारी यावं लागलं, असं उर्जामंत्री नितीन राऊत यांनी सांगितलं. ते नागपुरात पत्रकारांशी बोलत होते.
...मग केंद्राकडून दिलासा का नाही?; राऊतांचा सवाल
राज्यात विरोधी पक्षात असलेल्या भाजपचं केंद्रात सरकार आहे. पण आंतरराष्ट्रीय बाजारात खनिज तेलाच्या दरात घसरण होत असूनही मोदी सरकार त्याच दरानं म्हणजेच ८५ रुपयानं पेट्रोल विकत आहे. आमचे जीएसटीचे २८ हजार कोटी रुपये केंद्राकडे अडकले आहे. ते पैसे द्यायला सरकार तयार नाही. महापूर, अतिवृष्टीतही केंद्रानं मदत केलेली नाही. राज्यातील भाजप नेते कर्जमाफी देण्याची मागणी करतात. पण तुमच्या काळात राज्याची तिजोरी रिकामी झाली. भाजप सरकारनं राज्यावर ४ लाख कोटींचं कर्ज केलं. त्याचं काय?, असे सवाल राऊत यांनी विचारले.