Mamata Banerjee: ममतांवर कोणीच हल्ला केला नाही; प्रत्यक्षदर्शी कार्यकर्त्याचा मोठा गौप्यस्फोट
By ऑनलाइन लोकमत | Published: March 11, 2021 09:06 AM2021-03-11T09:06:18+5:302021-03-11T09:08:22+5:30
Mamata Banerjee leg fracture : ममता कारमध्ये बसत असताना अचानक कोणीतही दरवाजा ढकलला. त्यामध्ये त्यांचा पाय सापडल्याचा आरोप करण्यात येत आहे. ममता यांच्या पायाचा एक्सरे काढण्यात आला असून त्यांच्या पायाला फ्रॅक्चर झाल्याने प्लॅस्टर घालण्यात आल्याचे एसएसकेएम हॉस्पिटलच्या डॉक्टरांनी सांगितले आहे.
देशात पाच राज्यांत विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु झाली आहे. परंतू सर्वात हायव्होल्टेज निवडणूक ही पश्चिम बंगालची (West Bengal Assembly Election) ठरणार आहे. भाजपाला काहीही करून बंगालची सत्ता मिळवायची आहे, तर तृणमूलला काहीही करून सत्ता टिकवायची आहे. या साऱ्या रणधुमाळीत बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांनी काल नंदीग्राम मतदार संघातून उमेदवारी अर्ज भरला. यानंतर रॅलीला संबोधित करून कारमध्ये बसत असताना त्यांच्यावर कथित हल्ला करण्यात आला आहे. (Mamata's tests detected injuries to her ankle, right shoulder, neck: Doctor)
ममता कारमध्ये बसत असताना अचानक कोणीतही दरवाजा ढकलला. त्यामध्ये त्यांचा पाय सापडल्याचा आरोप करण्यात येत आहे. ममता यांच्या पायाचा एक्सरे काढण्यात आला असून त्यांच्या पायाला फ्रॅक्चर झाल्याने प्लॅस्टर घालण्यात आल्याचे एसएसकेएम हॉस्पिटलच्या डॉक्टरांनी सांगितले आहे. तसेच त्यांच्या उजव्या खांद्याला, मानेला दुय़खापत झाल्याचे एमआरआय स्कॅनमध्ये समोर आले आहे. ममता यांचा हॉस्पिटलच्या बेडवर झोपलेला फोटो टीएमसी खासदार अभिषेक बॅनर्जी यांनी पोस्ट करून २ मे रोजी बंगालचे लोकच भाजपाला ताकद दाखवून देतील असे म्हटले आहे.
ममता यांना दुखापत झाली हे खरे असले तरी देखील ममता यांच्या कारजवळ उभ्या असलेल्या प्रत्यक्षदर्शी कार्यकर्त्याने असे काही घडलेच नसल्याचा गौप्यस्फोट केला आहे. ममता यांच्या पक्षाने तिथे 4-5 समाजकंटक होते. त्यांनीच ममता गाडीत बसत असताना दरवाजा ढकलल्याचा आरोप केला आहे. मात्र, चित्तरंजन दास नावाच्या तरुणाने तेथील घडलेला प्रकार सांगितला आहे.
तृणमूल काँग्रेसने निवडणूक जाहीरनामा प्रसिद्ध करण्याचा कार्यक्रम पुढे ढकलला. https://t.co/CbvSFUjpi9
— Lokmat (@MiLOKMAT) March 11, 2021
दासने सांगितले की, मी घटनास्थळी होतो. मुख्यमंत्री त्यांच्या कारमध्ये बसलेल्या होत्या. पण दरवाजा उघडा होता. हा दरवाजा एका पोस्टरला आपटला आणि बंद झाला. कोणीही त्यांच्या कारचा दरवाजा ढकललेला नाही. दरवाजाकडे कोणीही उभे नव्हते.
ममता बॅनर्जी यांच्यावरील हल्ल्याविरोधात तृणमूलचे नेते उद्या निवडणूक आयोगाकडे जाणार आहेत.https://t.co/CbvSFUjpi9
— Lokmat (@MiLOKMAT) March 11, 2021
तर आणखी एक प्रत्यक्षदर्शी असलेली विद्यार्थीनी सुमन हिने सांगितले की, ममता यांना पाहण्यासाठी लोक जमा झाले होते. सर्वजण त्यांना घेरून उभे होते. त्याचवेळी त्यांच्या मानेला दुखापत झाली. कोणी धक्का दिला नाही, त्यांची गाडी हळू हळू पुढे जात होती.
'मीसुद्धा एक हिंदू मुलगी, हिंदुत्ववादाचा खेळ माझ्यासोबत खेळू नका'; ममता बॅनर्जी कडाडल्या https://t.co/iGxPrWQkfO
— Lokmat (@MiLOKMAT) March 11, 2021