“सरकारमध्ये कोणी ऐकत नाही, फोन उचलत नाहीत”; महाविकास आघाडीतला घटक पक्ष नाराज

By ऑनलाइन लोकमत | Published: July 1, 2021 06:08 PM2021-07-01T18:08:24+5:302021-07-01T18:10:37+5:30

Abu Azami: आम्हाला भेटा, आमचे प्रश्न जाणून घ्या त्याशिवाय आम्ही काही मागत नाही असं अबु आझमी म्हणाले.

"No one in government listens, no one picks up the phone"; MLA Abu Azami is unhappy on government | “सरकारमध्ये कोणी ऐकत नाही, फोन उचलत नाहीत”; महाविकास आघाडीतला घटक पक्ष नाराज

“सरकारमध्ये कोणी ऐकत नाही, फोन उचलत नाहीत”; महाविकास आघाडीतला घटक पक्ष नाराज

googlenewsNext
ठळक मुद्देभिवंडी महापालिकेच्या आयुक्तांची बदली केली. जे भ्रष्टाचार करतात त्यांच्या बोलण्यावरून आयुक्तांची बदली करण्यात आली. गणेशोत्सवाबद्दल नियमावली आली आहे परंतु बकरी ईद जवळ आली तरी नियमावली नाही पुरोगामी विचारांना आम्ही बांधील आहोत. त्यामुळे महाविकास आघाडी सरकारला पाठिंबा दिला आहे.

मुंबई – राज्यातील महाविकास आघाडीत काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना यांच्यासोबत इतर छोटे पक्षही सहभागी आहेत. महाविकास आघाडीतील प्रमुख तीन पक्षांमध्ये अनेकदा विसंवाद दिसून येतो. आगामी निवडणुका काँग्रेस पक्ष स्वबळावर लढेल अशी भूमिका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले वारंवार मांडत आहेत. तर दुसरीकडे शिवसेना-राष्ट्रवादीही सावध भूमिका घेत आहेत. राज्यातील या महाविकास आघाडीत सहभागी असणारा समाजवादी पक्ष नाराज असल्याचं बोललं जात आहे.

समाजवादी पक्षाचे आमदार अबु आझमी म्हणाले की, आमची गरज असेल तेव्हाच बोलवू नका, महाराष्ट्रात भाजपाचं सरकार नको म्हणून आम्ही महाविकास आघाडी सरकारला पाठिंबा दिला आहे. परंतु या सरकारमध्ये कोणीही ऐकत नाही. फोन उचलत नाही. बकरी ईदबाबत अद्याप नियमावली काढली नाही. १-२ दिवसांत नियमावली काढू असं म्हणतात. परंतु समाजातील लोकांना बोलावून चर्चा करा आणि नंतर नियमावली काढा असं मी मागणी केली आहे अशी माहिती त्यांनी दिली.  

त्याचसोबत भिवंडी महापालिकेच्या आयुक्तांची बदली केली. जे भ्रष्टाचार करतात त्यांच्या बोलण्यावरून आयुक्तांची बदली करण्यात आली. याबाबतही मंत्र्यांकडे नाराजी व्यक्त केली आहे. भाजपाला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी आम्ही आलो आहोत. पुरोगामी विचारांना आम्ही बांधील आहोत. त्यामुळे महाविकास आघाडी सरकारला पाठिंबा दिला आहे. आता विधानसभा अध्यक्षपदाची निवडूक होणार असेल तेव्हा आमची आठवण होईल. आम्हाला भेटा, आमचे प्रश्न जाणून घ्या त्याशिवाय आम्ही काही मागत नाही असं अबु आझमी म्हणाले.

महाविकास आघाडी सरकार पाच वर्षे टिकेल यात शंका नाही

‘सरकार चालवताना काही प्रश्न जरूर निर्माण होतात. महाविकास आघाडीची निर्मिती होतानाच असे प्रश्न सोडविण्यासाठी एक यंत्रणा असावी, असा निर्णय झाला होता. त्याची जबाबदारी देखील तिन्ही पक्षांच्या काही सहकाऱ्यांकडे सोपवली आहे. कोणत्याही महत्त्वाच्या धोरणात्मक प्रश्नासाठी हे सहकारी एकत्र बसतात आणि त्यावर निर्णय घेत असतात. त्यामुळं हे सरकार अत्यंत व्यवस्थित चाललं आहे. हे सरकार पाच वर्षे टिकेल याबद्दल शंका नाही असं विधान राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी अलीकडेच केले होते.

Web Title: "No one in government listens, no one picks up the phone"; MLA Abu Azami is unhappy on government

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.