पुणे : राज्यात १४ आणि देशात ११७ ठिकाणी लोकसभेच्या जागेसाठी मतदान होत असताना मतदारयादीत नाव शोधण्याची काळजी करण्याचे कारण नाही. खाली असलेल्या लिंकवर क्लिक केले तर तुमचे नाव असलेले ठिकाण अगदी गुगलच्या नकाशासह उपलब्ध आहे. त्यामुळे मतदानचा हक्क बजावण्यासाठी अजिबात मागे-पुढे न बघता निर्धास्त राहा.
असे शोधा तुमचे नाव
https://ceo.maharashtra.gov.in
- या संकेतस्थळावर गेल्यानंतर डाव्या बाजुला दिलेल्या लिंकवरील इलेक्ट्रोल सर्ज इंजिनवर क्लिक करा.
- नावानुसार आणि आयडी कार्डनुसार इथे नाव तपासता येते.
- नावानुसार तपासायचे असेल तर त्यावर क्लिक केल्यानंतर जिल्ह्यानुसार किंवा विधानसभानुसार असे दोन पर्याय दिले आहेत.
- विधानसभा मतदार संघानुसार नाव तपासायचे असेल तर त्यावर क्लिक करावे. जिल्हा, मतदारसंघ, नाव अशी माहिती टाकल्यानंतर सर्चवर क्लिक केल्यानंतर यादीतील तुमचे नाव दिसेल.
- या संकेतस्थळावर गेल्यानंतर सर्च युवर नेम इन इलेक्टोरल रोल वर क्लिक करा. राष्ट्रीय मतदाता सेवा पोर्टल मे आपका स्वागत है, असे वाक्य झळकेल.
- मतदान केंद्राची माहिती जाणून घेऊ शकता.
- या माहितीची प्रिंटही काढता येते.
- मतदार यादीत नाव नोंदविणे, नाव शोधणे,
- नावात पत्त्यात बदल करण्यासाठी अर्ज करू शकता.
बीएलओची माहितीही मिळू शकेल. निवडणूक अधिकाºयाची माहितीही यावर उपलब्ध आहे. कंटिन्यू या लिंकवर क्लिक केल्यानंतर दोन पद्धतीने नाव शोधण्याची सुविधा उपलब्ध आहे. नाव, वय, जन्मतारीख, राज्य, जिल्हा, जिल्हा विधानसभा क्षेत्र ही माहिती टाकल्यानंतर मतदार यादीत नाव शोधता येते. यासह मतदार ओळखपत्र क्रमांक टाकूनही नाव शोधता येते.