मुंबई - हिंदी सिने सृष्टीतील कलाकार हे प्रेक्षकांचे आदर्श असतात. त्यामुळे जे चित्रपट कलावंत अंमली पदार्थ सेवन करतात, ज्यांच्या नावावर नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोकडून अंमली पदार्थ सेवन करतात म्हणून शिक्केमोर्तब झाले आहे अशा कलाकारांना चित्रपट निर्मात्यांनी आपल्या चित्रपटात काम देऊ नये अन्यथा अशा चित्रपटांचे चित्रीकरण आरपीआय बंद पाडेल असा इशारा केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवलेंनी दिला आहे.
याबाबत रामदास आठवले म्हणाले की, अंमली पदार्थ सेवन करणाऱ्या कलाकारांचे चित्रपट प्रदर्शित होऊ देणार नाही. नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोतर्फे अंमलीपदार्थ वापरल्याच्या संशयातून सध्या फक्त महिला कलाकारांची चौकशी केली जात असल्याचा संदेश जात आहे. लागोपाठ अभिनेत्रींचीच नावे पुढे आली आहेत. यात पुरुष कलाकारांची नावे जर असतील तर त्यांची त्वरित चौकशी करावी. स्त्री पुरुष भेदभाव नसावा मात्र यात केवळ अभिनेत्रींचीच नावे पुढे येत आहेत या प्रश्नांकडेही नार्कोटिक्स विभागाने लक्ष द्यावे असं आवाहन त्यांनी केले आहे.
तसेच दिशा सालियन हिचा संशयास्पद मृत्यू ही आत्महत्या नसून हत्या आहे. दिशा सालियन यांच्या संशयास्पद मृत्यूची सीबीआय चौकशी व्हावी अशी मागणी करत अभिनेत्री पायल घोष यांनी दाखल केलेल्या तक्रारीनुसार सिने दिग्दर्शक अनुराग कश्यप यांना मुंबई पोलिसांनी अटक केली पाहिजे असंही रामदास आठवलेंनी सांगितले.
दीपिकाची तीन-चार राउंडमध्ये होणार चौकशी, एनसीबीने जप्त केला फोन
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार एनसीबीची टीम दीपिकाची तीन - चार राउंडमध्ये चौकशी करणार आहे. प्रश्न सुरू करण्यापूर्वी दीपिकाला NDPS अॅक्ट समजावला गेला. रिपोर्ट्सनुसार, प्रश्न विचारणाऱ्या टीमला केपीएस मल्होत्रा लीड करत आहेत.एनसीबी दीपिका पादुकोणची तीन ते चार राउंडमध्ये चौकशी करू शकते असेही सांगितले जात आहे. पहिल्या फेरीत जया साहा आणि करिश्मा प्रकाश यांच्या स्टेटमेंटसंदर्भात प्रश्न असू शकतात, तर दुसर्या राउंडमध्ये व्हॉट्स अॅप ग्रुपचे स्क्रीनशॉट, चॅट आणि त्यांचे फोन याबद्दल प्रश्न उद्भवू शकतात. तिसऱ्या राउंडमध्ये दीपिकाची चौकशी केली जाऊ शकते आणि चौथ्या फेरीत दीपिका आणि करिश्मा यांना समोरासमोर बसवून चौकशी होऊ शकतो, अशी माहिती आज तकने दिली आहे.
सुशांत ड्रग्स घेत असल्याचं पाहिलं होतं
एबीपी लाईव्हच्या रिपोर्टनुसार सारा अली खान आणि श्रद्धा कपूर दोघींनाही ड्रग्जसंबंधीच्या चॅटबद्दल अनेक प्रश्न विचारले. NCB च्या चौकशीत साराने 'केदारनाथ' सिनेमाच्या शूटिंगवेळी सुशांतला अनेकदा व्हॅनिटी व्हॅनमध्ये ड्रग्स घेतल्याचे पाहिले असल्याचा धक्कादायक खुलासा केला आहे. 2018 मध्ये केदारनाथ सिनेमाच्या शूटिंगदरम्यान आपण सुशांतबरोबर रिलेशनशिपमध्ये असल्याचंही कबूली तिने दिली आहे.एवढंच नाही तर या शूटिंग संपल्यानंतर सुशांतच्या केप्री हाऊस इथल्या घरात त्याच्याबरोबर राहायलाही सारा गेली होती असेही तिने सांगितले. तर सुशांतला कधी व्हॅनिटीमध्ये तर कधी सेटवर देखील ड्रग्स घेताना पाहिल्याची श्रद्धानेही कबुली दिली आहे. 'छिछोरे'च्या सिनेमाच्या सक्सेस पार्टीमध्ये पवना फार्म हाऊसवर गेली होती तेव्हा त्या पार्टीमध्ये केवळ डान्स केला होता. यावेळी ड्रग्स घेतले नव्हते असेही तिने सांगितले.
अन्य महत्त्वाच्या बातम्या
भाजपाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत महाराष्ट्रातील किती जण?; कोणाला मिळालं कोणतं पद?... वाचा
“शिवसेनेनं नागरिकांना डॉक्टरचा सल्ला न घेता 'कंपाउंडर'कडून औषधे घेण्यास प्रोत्साहन देऊ नये”
“कोरोना लशीवर खर्च करण्यासाठी केंद्र सरकारकडे ८० हजार कोटी आहेत का?”
कोरोनामुळे मृत्यू झाल्यास सरकारच्या ‘या’ दोन योजनेचा लाभ मिळणार नाही? जाणून घ्या सत्य
मुख्यमंत्र्यांना थंड जेवण दिल्यानं अधिकाऱ्याचं निलंबन; प्रोटोकॉल मोडल्यानं जिल्हाधिकाऱ्यांची कारवाई