मी ओबीसी असल्यानं...; वडेट्टीवारांकडून खदखद व्यक्त, बाळासाहेब थोरातांनी दिलं स्पष्टीकरण

By ऑनलाइन लोकमत | Published: June 28, 2021 11:37 AM2021-06-28T11:37:46+5:302021-06-28T11:41:26+5:30

ओबीसी विचार मंथन शिबिरात विजय वडेट्टीवारांनी बोलून दाखवली नाराजी

not got revenue ministry as i am from obc says congress leader vijay wadettiwar | मी ओबीसी असल्यानं...; वडेट्टीवारांकडून खदखद व्यक्त, बाळासाहेब थोरातांनी दिलं स्पष्टीकरण

मी ओबीसी असल्यानं...; वडेट्टीवारांकडून खदखद व्यक्त, बाळासाहेब थोरातांनी दिलं स्पष्टीकरण

googlenewsNext

मुंबई: महसूल मंत्रीपद मिळण्याची अपेक्षा होती. पण ओबीसी असल्यानं संधी मिळाली नाही, अशा शब्दांत मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी नाराजी व्यक्त केली. यानंतर आता काँग्रेसचे नेते आणि महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी वडेट्टीवारांना सबुरीचा सल्ला दिला आहे. वडेट्टीवार यांचं वय पाहता त्यांना भविष्यात खूप मोठी संधी मिळणार आहे. त्यासाठी त्यांना थोडी वाट पाहावी लागेल, असं म्हणत थोरात यांनी वडेट्टीवारांना सबुरीचा सल्ला दिला. 

लोणावळ्यात आयोजित करण्यात आलेल्या ओबीसी चिंतन शिबिरात बोलताना विजय वडेट्टीवार यांनी त्यांची खदखद व्यक्त केली. ओबीसींचं राजकीय आरक्षण टिकवण्याची गरज यावेळी त्यांनी बोलून दाखवली. आज लढलो नाही तर भविष्यात नोकरी आणि शिक्षणातील आरक्षण जाण्याची भीती त्यांनी व्यक्त केली. आपली ताकद फार मोठी आहे आणि ती आपण ओळखली पाहिजे, असं वडेट्टीवार म्हणाले.

महसूल मंत्रीपद न मिळाल्याची खदखद वडेट्टीवार यांनी त्यांच्या भाषणातून व्यक्त केली. 'मी ओबीसी मंत्रालयासाठी निधी मागितला. तर सरकार म्हणतं पैसा नाही. आपण एकत्र नसल्यामुळे ही स्थिती निर्माण झाली आहे. मी विरोधी पक्षनेता होता. त्यामुळे महसूलसारखं महत्त्वाचं खातं मिळेल असं वाटलं होतं. मात्र मिळालं ओबीसी मंत्रालय,' असं वडेट्टीवार म्हणाले.

वडेट्टीवार यांनी त्यांची नाराजी व्यक्त करताच महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी त्यांना सबुरीचा सल्ला दिला. 'काँग्रेस जातीयवादी पक्ष नाही, धर्मवादी तर अजिबातच नाही. आम्ही धर्मनिरपेक्ष आहोत. त्यामुळे असं काही होण्याचा प्रश्नच नाही. वडेट्टीवार यांचं वय त्यांच्या बाजूनं आहे. त्यांच्या हातात असलेलं वय पाहता भविष्यात त्यांना खूप मोठी संधी मिळणार आहे. त्यासाठी त्यांना थोडी वाट पाहावी लागेल. आगामी काळात त्यांना मोठी जबाबदारी मिळेल,' असं थोरात म्हणाले.

Web Title: not got revenue ministry as i am from obc says congress leader vijay wadettiwar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.