शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
2
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
3
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
4
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
5
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
6
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
7
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
8
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
9
ढगाळ हवामानामुळे मुंबईत थंडी पळाली; बदलत्या हवामानाचा परिणाम
10
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
11
लॉटरी किंगकडून आठ कोटींची रक्कम जप्त
12
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
13
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
14
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
15
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
16
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
17
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
18
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
19
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
20
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा

आता नगरपंचायत निवडणुकीतही चालणार महाविकास आघाडी फॉर्म्युला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 05, 2020 2:40 PM

सोयगाव नगरपंचायतीच्या निवडणुकीत शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस अशी महाविकास आघाडी होण्याचे संकेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते रंगनाथ काळे यांनी दिले.

ठळक मुद्देनगरपंचायत निवडणुकीआधी आघाडी नंतर जागा वाटपाचा निर्णय होणार असल्याचे संकेत निवडणुकीपूर्वी महाविकास आघाडी होण्यावरच तिन्हीही पक्षांचा सकारात्मक विचार

औरंगाबाद : विधानपरिषदेच्या ६ जागेवर महाविकास आघाडीने एकत्रित निवडणूक लढत ४ जागा जिंकल्या आहेत. सरकार स्थापनेनंतर पहिल्याच परीक्षेत महाविकास आघाडीने घवघवीत यश संपादन केले आहे. यामुळे आता आगामी काळात होणाऱ्या महापालिका, नगरपंचायत निवडणुकीतही हाच फॉर्म्युला चालणार यावर खलबत सुरु आहेत. औरंगाबाद जिल्ह्यातील सोयगाव नगरपंचायतची आगामी निवडणूक महाविकास आघाडी एकत्र लढणार असल्याची चर्चा आहे. याबाबत शिवसेना, कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी या तीनही पक्षातील नेत्यांनी तसे संकेतही दिले आहेत. यामुळे येणाऱ्या काळात महाविकास आघाडी विरुद्ध भाजप हा सामना आणखी रंगत जाणार आहे.

विधानपरिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघांच्या निवडणुकीचा निकाल शुक्रवारी जाहीर झाला. मराठवाडा पदवीधर मतदारसंघ, नागपूर पदवीधर मतदारसंघ, पुणे पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघ या ४ जागांवर महाविकास आघाडीने दणदणीत विजय मिळवला आहे. तर भाजपला  धुळे - नंदुरबार स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाची केवळ एक जागा मिळाली आहे. अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघात अपक्ष उमेदवाराने बाजी मारली आहे. महाविकास आघाडीचे भविष्य ठरवणारी निवडणूक असेच या सहा जागेकडे पाहण्यात येत असल्याने यात चुरस होती. यात वर्चस्व राखल्याने आता तीनही पक्षांचे लक्ष पुढील काळातील होणाऱ्या महापालिका, नगरपंचायत निवडणुकांवर आहे. 

याबाबत कोणत्याच पक्षाने जाहीर भूमिका मांडली नसली तरी तीनही पक्ष महाविकास आघाडी खालीच निवडणुकीस सामोरे जाणार असल्याचे संकेत मिळत आहेत. लवकरच याचा प्रत्येय औरंगाबाद जिल्ह्यातील नगरपंचायत निवडणुकीत येऊ शकतो अशी चर्चा आहे. आगामी काळात होऊ घातलेल्या औरंगाबाद जिल्ह्यातील सोयगाव नगरपंचायतीच्या निवडणुकीत शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस अशी महाविकास आघाडी होण्याचे संकेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते रंगनाथ काळे यांनी दिले. मागील निवडणुकीत शिवसेनेसोबत असलेली भाजपा या निवडणुकीत एकाकी पडणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे. तर शिवसेनेच्या वतीने घेण्यात आलेल्या मेळाव्यातही पक्षाचे संपर्क प्रमुख विनोद घोसाळकर यांनी महाविकास आघाडीला हिरवा कंदील दाखविला होता. आता फक्त घोषणेची औपचारिकता बाकी असून काँग्रेसशी देखील चर्चा होत आहे, असेही रंगनाथ काळे यांनी सांगितले. 

आधी आघाडी नंतर जागा वाटपाचा निर्णयआगामी काळात सोयगाव नगरपंचायतीच्या निवडणूक होणार असून, त्या दृष्टीने रणधुमाळी सुरू झाली आहे. या निवडणुकीत काँग्रेस, राष्ट्रवादी व शिवसेना यांच्या महाविकास आघाडीत फाॅर्म्युला ठरणार आहे. निवडणुकीपूर्वी आधी महाविकास आघाडी होण्यावरच तिन्हीही पक्षांचा सकारात्मक विचार असून त्यानंतर मात्र जागा वाटपाचा फाॅर्म्युला ठरणार असल्याची माहिती रंगनाथ काळे यांनी दिली आहे.

टॅग्स :ElectionनिवडणूकNCPराष्ट्रवादी काँग्रेसBJPभाजपाShiv SenaशिवसेनाAurangabadऔरंगाबाद