बिहारच्या निवडणुकीत कमी फरकाने नितीश कुमार यांच्या नेतृत्वातील एनडीएला बहुमत मिळाले आहे. जदयूला गेल्या वेळेपेक्षाही कमी जागा मिळाल्याने भाजपा मोठा भाऊ ठरला आहे. तरीही नितीशकुमार यांना मुख्यमंत्री पद देत भाजपाने वेगळीच खेळी खेळली आहे. याच दरम्यान, बिहारच्या जहानाबादमधून धक्कादायक प्रकार समोर आला आहे. नितीशकुमार मुख्यमंत्री होताच एका व्यक्तीने चौथे बेट तोडले आहे.
जहानाबादच्या अनिल शर्मा य़ांनी त्यांचे बोट कापून गोरैया बाबांच्या मंदिरावर चढविली. अशाप्रकारे त्यांनी चार बोटे नितीशकुमार मुख्यमंत्री होताच कापली आहेत. कारण नितीशकुमार हे त्यांचे आवडीचे नेते आहेत. ही घटना जहानाबादच्या घोसी पालीस ठाणे क्षेत्रातील वैना गावाची आहे. 45 वर्षांचे अनिल शर्मा उर्फ अली बाबा यांनी याआधी तीन बोटे कापली आहेत. 16 नोव्हेंबरला नितीशकुमार यांनी सातव्यांदा शपथ घेतली. यामुळे शर्मा यांनी पुन्हा चौथे बोट कापले.
वैना गावच्या या अनिल शर्मा हे गेल्या काही वर्षांपासून आपले बोट कापून घेत आहेत. नितीशकुमार जेव्हा जेव्हा सत्तेत आले तेव्हा तेव्हा त्यांनी बोट कापून गोरैया बाबांच्या मंदिरावर चढविले आहे. नेहमीप्रमाणे शर्मा यांनी यावेळीही नितीशकुमारच मुख्यमंत्री व्हावेत म्हणून गाऱ्हाणे घातले होते. हे त्यांची मागणी देवाने ऐकली, या भावनेतून त्यांनी आणखी एक बोट कापले आहे.
नितीश कुमार सरकारला झटका; ७२ तासांत मंत्र्याचा राजीनामाडॉ. मेवालाल चौधरी यांनी नितीश कुमार यांच्या कॅबिनेटमध्ये मंत्रिपदाची शपथ घेतली होती. त्यानंतर लालूप्रसाद यादव यांच्यासह संपूर्ण राजद पक्षाने मेवालाल यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. एनडीए सरकारमध्ये भरती घोटाळ्यातील आरोपीला थेट कॅबिनेट मंत्री बनवलं गेलं, यावर बोट ठेवून लालूप्रसाद यादव यांनी नितीश कुमार यांच्यावर जोरदार टीका करण्यास सुरुवात केली होती. विरोधकांच्या जोरदार टीकेनंतर भ्रष्टाचाराचा आरोप असलेले नवनियुक्त शिक्षण मंत्री मेवालाल यांनी बुधवारी मुख्यमंत्री नितीश कुमार यांची त्यांच्या शासकीय निवासस्थानी भेट घेतली होती. जवळपास अर्धातास झालेल्या या बैठकीनंतर दोघांमध्ये नेमकी काय चर्चा झाली? याचे तर्कवितर्क राजकीय वर्तुळात लढवले जात होते. अखेर आज मेवालाल यांनी पदाचा राजीनामा दिला. मेवालाल चौधरी यांच्यावर सबौर विद्यापीठाचे कुलगुरू असतानाच्या काळात पदाचा गैरवापर करुन नियुक्ती केल्याच्या आरोपावरुन गुन्हा दाखल आहे. हे प्रकरण भागलपूर एडीजी-१ यांच्याकडे विचारधीन असून अद्याप चार्चशीट दाखल झालेली नाही.