शहरं
Join us  
Trending Stories
1
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
2
"तुम्हाला आत टाकणार"; आदित्य ठाकरेंचा सदा सरवणकरांना भरसभेत इशारा
3
आधी २ 'बदक' आता 'पदक' मिळवणारी सेंच्युरी! संजूनं मोडला KL राहुलचा रेकॉर्ड
4
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
5
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
6
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
7
IND vs SA : सर्वोच्च धावसंख्या, सर्वाधिक षटकार अन् दोन शतकवीर; मॅचमधील ५ रेकॉर्ड्स 
8
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
9
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
10
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
11
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
12
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
13
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
14
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
15
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
16
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
17
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
18
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
19
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
20
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?

दोस्त दोस्त ना रहा! NDA ची अवस्था; केंद्रीय मंत्रिमंडळात बिगर भाजपाचा एकच मंत्री, तर...

By ऑनलाइन लोकमत | Published: October 11, 2020 1:32 AM

BJP, Narendra Modi Cabinet, Ramdas Athwale News: मित्रपक्ष झाले कमी । रालोआमध्ये प्रथमच ही स्थिती; भाजपचे जुने सहकारी होऊ लागले दूर

नवी दिल्ली : केंद्रीय मंत्री रामविलास पासवान यांचे निधन झाल्यानंतर व त्याआधी काही मतभेदांमुळे अकाली दल रालोआमधून बाहेर पडल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या ५१ जणांच्या मंत्रिमंडळात रिपब्लिकन पक्षाचे मंत्री रामदास आठवले वगळता बाकीचे सर्व मंत्री भाजपचेच आहेत.

देशात १९७७ साली पहिले आघाडी सरकार स्थापन झाले. तेव्हापासून अशी वेळ पहिल्यांदाच आली आहे. आठवले केंद्रीय सामाजिक कल्याण राज्यमंत्री आहेत. रालोआ २०१९ साली पुन्हा सत्तेत आल्यानंतर आपल्या घटक पक्षांना काही मंत्रीपदे देऊ केली होती. शिवसेनेच्या अरविंद सावंत यांना अवजड उद्योग, अकाली दलाच्या हरसिमरत कौर बादल यांना अन्नप्रक्रिया खात्याचे व रामविलास पासवान यांना ग्राहक संरक्षण, अन्न व सार्वजनिक वितरण खात्याचे मंत्री केले होते.

गेल्या वर्षी महाराष्ट्रामध्ये भाजपची साथ सोडून शिवसेनेने काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर आघाडीचे सरकार स्थापन केले. केंद्रीय मंत्री अरविंद सावंत यांनी पदाचा राजीनामा दिला. कृषी विधेयकांवरून मतभेद झाल्याने हरसिमरत कौर यांनीही मंत्रिपद सोडले. आता प्रदीर्घ आजारामुळे रामविलास पासवान यांचे निधन झाले आहे.जनता दल (यु) बाहेरच2014 साली रालोआतून बाहेर पडलेले व कालांतराने पुन्हा परतलेल्या जनता दल (यु) या पक्षाने केंद्रीय मंत्रिमंडळात सामील न होण्याचा निर्णय घेतला.या पक्षाला दोन मंत्रिपदे हवी होती. ती मिळणार नसल्याने या पक्षाने हा पवित्रा घेतला. नितीशकुमार प्रमुख असलेल्या या पक्षाचे १५ खासदार आहेत.2019 च्या लोकसभा निवडणुकीत रालोआने ३४३ लोकसभेच्या जागा लढविल्या होत्या. त्यातील ३०३ जागा भाजप एकटा जिंकला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पहिल्या कारकीर्दीत रालोआतील पाच घटक पक्षांच्या खासदारांचा केंद्रीय मंत्रिमंडळात समावेश करण्यात आला होता.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपाShiv SenaशिवसेनाRamdas Athawaleरामदास आठवले