शहरं
Join us  
Trending Stories
1
लाचप्रकरणी अदानींवर अमेरिकेत अटक वॉरंट, उद्धव ठाकरेंची टीका; म्हणाले, “चार दिवस आधीच...”
2
“४१ वर्षे काम, पण...” निकालापूर्वी भाजपाला मोठा धक्का; बड्या नेत्याने घेतला राजकीय संन्यास
3
महायुती की मविआ? कोणाला पाठिंबा देणार? हितेंद्र ठाकूरांचा निर्णय झाला; दिले सूचक संकेत
4
“आम्ही छोटे पक्ष किंगमेकर ठरु, पाठिंबा हवा असेल तर...”; महादेव जानकरांनी ठेवल्या अटी
5
“उद्या दुपारी १२ वाजता महायुती हद्दपार झालेली दिसेल, मी सत्तेतील आमदार असेन”: विजय वडेट्टीवार
6
"५० पैकी एकजरी पडला तर राजकारण सोडेन"; सुषमा अंधारेंनी करून दिली एकनाथ शिंदेना आठवण
7
सत्तास्थापनेसाठी आम्हाला 'त्यांची' गरज नाही, पण..; रावसाहेब दानवेंचा मोठा दावा
8
IPL Auction 2025: MIला ८, CSKला ७... कोणत्या टीमला किती परदेशी खेळाडू विकत घेता येणार?
9
“युगेंद्र पवार आमदार होणार, महाविकास आघाडीला १६० जागा मिळणार”; जितेंद्र आव्हाडांचा दावा
10
  राणेंचा दबदबा की ठाकरे गट बाजी मारणार? असा आहे सिंधुदुर्गाचा कल
11
“विधानसभेच्या निकालानंतर शरद पवार महायुतीसोबत येऊ शकतात”; नारायण राणेंचे सूचक विधान
12
राहुल गांधी, खर्गेंना विनोद तावडेंची कायदेशीर नोटीस; पैसे वाटप प्रकरण तापणार
13
नेत्रदिपक भरारी! शेतकऱ्याच्या लेकीने रचला इतिहास; अवघ्या १९ व्या वर्षी झाली पायलट
14
ईव्हीएम, कर्मचाऱ्यांसाठी वापरलेल्या एसटी बसमध्ये सापडली 500 रुपयांची बंडले; कोणाची? 
15
जास्त जागा त्याचा मुख्यमंत्री? मविआचा फॉर्म्युला काय ठरला? काँग्रेस नेत्यांनी सगळेच सांगितले
16
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: धडधड वाढते ठोक्यात! 'महानिकाला'ला उरले काही तास; राजकीय नेत्यांची आकडेमोड, प्रशासनाचा 'ॲक्शन मोड'
17
AUS vs IND Day 1: बुमराहचा 'चौकार'! २ सत्र गाजवणारा ऑस्ट्रेलियन संघ दिवसाअखेर बॅकफूटवर
18
घडामोडींना वेग! मनसे नेते बाळा नांदगावकरांनी घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट; बैठकीत काय घडले?
19
समंथा रुथ प्रभू बनली सर्वात लोकप्रिय भारतीय सेलिब्रिटी; करिना, दीपिकालाही टाकलं मागे
20
५१ चौकार, २९७ धावांचा पाऊस... वीरेंद्र सेहवागचा मुलगा आर्यवीरचा धुमधडाका, पण Ferrari थोडक्यात हुकली

शिवसेनेसोबत युती केली ही एकच गोष्ट चुकली - देवेंद्र फडणवीस

By ऑनलाइन लोकमत | Published: September 19, 2020 1:00 AM

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त मुंबई भाजपने आयोजित केलेल्या व्हर्च्युअल रॅलीत ते बोलत होते.

मुंबई : विधानसभा निवडणुकीत शिवसेनेसोबत युती केली ही एकच गोष्ट चुकली. अन्यथा, भाजपला १५० हून अधिक जागा मिळाल्या असत्या, असा दावा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त मुंबई भाजपने आयोजित केलेल्या व्हर्च्युअल रॅलीत ते बोलत होते.पंतप्रधान मोदींच्या वाढदिवसाचे औचित्य साधत भाजपने सेवा सप्ताहाचे आयोजन केले. त्यानिमित्त आयोजित व्हर्चुअल रॅलीत फडणवीस यांच्यासह भाजपचे संघटन मंत्री व्ही. सतिश, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, मुंबई अध्यक्ष मंगलप्रभात लोढा यांच्यासह भाजप आमदार, नेते उपस्थित होते. फडणवीस म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्लीतल्या प्रस्थापित व्यवस्थेला आव्हान देत भ्रष्टाचाराचे अड्डे उदध्वस्त केले. प्रशासकीय यंत्रणेत बाहेरच्या तज्ज्ञांना सामावून घेत प्रशासनाला नवा आयाम दिला. मोदींनी राष्ट्रवादाला कर्तुत्वाची जोड दिली. भारताचे नेतृत्व खंबीर असल्याचे जगाला दाखवून दिले. पंतप्रधानपदाची सूत्र हाती घेतल्यानंतर नरेंद्र मोदी यांनी जागतिक संधी समजून घेत अर्थव्यवस्थेला चालना दिली. त्यांनी गुंतवणुकीसाठी पोषक वातावरण तयार केल्याने मोठ्या प्रमाणात परकीय गुंतवणूक भारतात आल्याचेही ते म्हणाले.शेतमालाला चांगला भाव, शेतमालाची मोेठ्या प्रमाणात खरेदी, गरीबांसाठी योजना, लॉकडाउनच्या काळात आत्मनिर्भर अभियानाद्वारे सामान्य जनतेला मदतीचा हात यांसारख्या अनेक गोष्टी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यकाळात राबवण्यात येत आहेत. पंतप्रधानाच्या पाठीशी संपूर्ण देश उभा आहे आणि यापुढेही उभा राहील असा विश्वास फडणवीस यांनी यावेळी व्यक्त केला.

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसBJPभाजपाShiv Senaशिवसेना