Opinion Poll : दिल्लीनंतर आता या राज्यातही आप मुसंडी मारणार, सर्वात मोठा पक्ष ठरणार 

By ऑनलाइन लोकमत | Published: March 19, 2021 08:18 PM2021-03-19T20:18:15+5:302021-03-19T20:28:07+5:30

Opinion Poll: दिल्लीच्या सत्तेत पाय घट्ट रोवल्यानंतर आता आम आदमी पक्ष अजून एका राज्यात मोठं यश मिळवण्याच्या दिशेने आगेकूच करताना दिसत आहे.

Opinion Poll: After Delhi, AAP will now be the biggest party in Punjab too, if elections are held today | Opinion Poll : दिल्लीनंतर आता या राज्यातही आप मुसंडी मारणार, सर्वात मोठा पक्ष ठरणार 

Opinion Poll : दिल्लीनंतर आता या राज्यातही आप मुसंडी मारणार, सर्वात मोठा पक्ष ठरणार 

Next
ठळक मुद्देएबीपी न्यूज आणि सी वोटरने पंजाबमधील जनतेचा कल जाणून घेण्यासाठी हा सर्व्हे केला होताया सर्व्हेनुसार पंजाबमध्ये सत्ताधारी काँग्रेसला मोठा धक्का बसणार आहे. तर आघाडी मोडल्यानंतर स्वतंत्र झालेल्या अकाली दल आणि भाजपाचीही निराशा होणारआप सर्व बड्या पक्षांना मागे टाकत पंजाबमधील सर्वात मोठा पक्ष ठरणार

नवी दिल्ली - अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांच्या नेतृ्त्वाखाली दिल्लीच्या सत्तेत पाय घट्ट रोवल्यानंतर आता आम आदमी पक्ष (AAP)अजून एका राज्यात मोठं यश मिळवण्याच्या दिशेने आगेकूच करताना दिसत आहे. एबीपी न्यूज आणि सी वोटरने (ABP News-C Voter) केलेल्या सर्व्हेमध्ये आम आदमी पक्ष पंजाबमध्ये मोठी मुसंडी मारणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला असून, आज निवडणुका झाल्यास आम आदमी पक्ष काँग्रेसला (Congres) मात देत पंजाबमधील सर्वात मोठा पक्ष ठरणार आहे. (Opinion Poll: After Delhi, AAP will now be the biggest party in Punjab too, if elections are held today) 

पंजाबमध्ये कॅप्टन अमरिंदर सिंग यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसने स्थापन केलेल्या सरकारला चार वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर एबीपी न्यूज आणि सी वोटरने पंजाबमधील जनतेचा कल जाणून घेण्यासाठी हा सर्व्हे केला होता. पंजाबमध्ये पुढील वर्षी विधानसभेची निवडणूक होणार आहे.  

या सर्व्हेनुसार पंजाबमध्ये सत्ताधारी काँग्रेसला मोठा धक्का बसणार आहे. तर आघाडी मोडल्यानंतर स्वतंत्र झालेल्या अकाली दल आणि भाजपाचीही निराशा होणार आहे. अकाली दल तिसऱ्या तर भाजपा चौथ्या स्थानी राहण्याची शक्यता आहे. तर आप सर्व बड्या पक्षांना मागे टाकत पंजाबमधील सर्वात मोठा पक्ष ठरणार आहे.  

सर्व्हेमधील आकडेवारीनुसार राज्यातील एकूण ११७ जागांपैकी ४३ ते ४९ जागा काँग्रेसला मिळण्याची शक्यता आहे. तर आपला ५१ ते ५७ जागा मिळू शकतात. अकाली दलाला १२ ते १८ जागा मिळू शकतात. तर भाजपाला ० ते ५ जागा मिळतील. इतर पक्षांच्या खात्यात ० ते ३ जागा जाण्याची शक्यता आहे.   

ओपिनियन पोलनुसार असं असेल पक्षीय बलाबल 
एकूण जागा ११७ 
काँग्रेस - ४३ ते ४९ 
आप - ५१ ते ५७ 
अकाली दल - १२ ते १८ 
भाजपा - ० ते ५ 
इतर - ० ते ३ 

Web Title: Opinion Poll: After Delhi, AAP will now be the biggest party in Punjab too, if elections are held today

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.