शहरं
Join us  
Trending Stories
1
संजूचं शतक; आफ्रिकेत फिरकीची 'करामत' अन् सूर्याच्या कॅप्टन्सीत टीम इंडियाचा विजयी धडाका कायम!
2
ठाण्यात बिल न देता हॉटेलात जायची सवय तेच दावोसमध्ये केले; जयंत पाटलांचा शिंदेंना जोरदार टोला 
3
रावेरचे माजी आमदार आर. आर. पाटील यांचे निधन
4
मिस्ट्री स्पिनरची जादू; दक्षिण आफ्रिकेच्या ताफ्यातील स्फोटक फलंदाज ठरले फुसका बार!
5
मी शिवसेना सोडली तेव्हा ३५ आमदार, १५ खासदार माझ्याकडे आलेले...; राज ठाकरेंचा एकाच वाक्यात उद्धव, शिंदेंवर नेम
6
Aiden Markram नं रुबाब दाखवला; पण Arshdeep Singh समोर तो फिका ठरला (VIDEO)
7
फुटबॉल सामन्यावेळी इस्रायली नागरिकांवर हल्ला; १२ जखमी, नेतन्याहूंनी नेदरलँडला विमाने पाठविली
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'समोरासमोर चर्चेला तयार', पृथ्वीराज चव्हाणांचं अमित शाहांना खुलं चॅलेंज
9
Sanju Samson ची सेंच्युरी! एका डावात ३ खास रेकॉर्ड्सला घातली गवसणी
10
फक्त एक षटकार मारला त्यातही सुर्या भाऊची हवा! IPL मधील २१ कोटींचा सिक्सर किंग पडला मागे
11
जानेवारीमध्ये भाजपला मिळणार नवीन राष्ट्रीय अध्यक्ष; 22 नोव्हेंबरला दिल्लीत महत्वाची बैठक
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : महिलांबाबत अपमानास्पद वक्तव्यावर निवडणूक आयोग ॲक्शमोडवर,अधिकाऱ्यांना दिल्या कारवाईच्या सूचना
13
निमलष्करी दलाच्या अधिकाऱ्यांच्या रेशन मनी भत्त्याला कात्री; दर महिन्याला ४००० रुपयांचे नुकसान
14
कोणाचा फोटो लावायचा, हा आमचा निर्णय; मोदींचा फोटो न लावण्यावरुन नवाब मलिक स्पष्ट बोलले
15
"...तोपर्यंत त्यांचा निर्णय बदलणार नाही"; अजित पवारांना परत घेण्याबद्दल शरद पवारांचं विधान
16
जम्मू-काश्मीरच्या सोपोरमध्ये सैन्याची मोठी कारवाई; दोन दहशतवाद्यांचा खात्मा
17
"...तर बाळासाहेबांनी उद्धव ठाकरेंना गोळ्या घातल्या असत्या"; नारायण राणेंचं विधान
18
ऐकावं ते नवलच! १२ वर्षे जुन्या कारचे अंत्यसंस्कार, चार लाख खर्च करुन बांधली समाधी
19
सध्यातरी इतकेच महायुतीत ठरले...; अमित शाह यांच्या मुख्यमंत्री नावाच्या दाव्यावर प्रफुल्ल पटेलांची प्रतिक्रिया
20
"अरे देवा...", राहुल-अथियाने दिली गुडन्यूज; सूर्यकुमारची पत्नी देविशाच्या कमेंटनं मात्र वेधलं लक्ष

opinion poll bihar 2020 :बिहारमध्ये पुन्हा नितीश सरकार, पण महाआघाडीच्याही जागा वाढणार

By बाळकृष्ण परब | Published: October 20, 2020 9:04 PM

Bihar Assembly Election 2020 : नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखालील एनडीएचे पुनरागमन होण्याचे संकेत ओपिनयन पोलमधून दिसत आहेत.

ठळक मुद्देनितीश कुमार यांच्या नेतृत्वाखालील एनडीएला १३३ ते १४३ जागा मिळण्याची शक्यता

नवी दिल्ली/पाटणा - बिहारमधील विधानसभा निवडणुकीमध्ये पुन्हा एकदा नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखालील एनडीएचे पुनरागमन होण्याचे संकेत ओपिनयन पोलमधून दिसत आहेत. लोकनीती-सीएसडीएसने प्रसिद्ध केलेल्या ओपिनियन पोलनुसार या विधानसभा निवडणुकीत नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखालील एनडीएला १३३ ते १४३ जागा मिळणार आहेत. तर तेजस्वी यादव यांच्या नेतृत्वाखालील महाआघाडीला ८८ ते ९८ जागा मिळतील. तर स्वतंत्रपणे लढत असलेल्या एलजेपीला २ ते ६ आणि इतर पक्षांना ६ ते १० जागा मिळण्याची शक्यता आहे.या सर्वेनुसार यंदाच्या निवडणुकीत एनडीएला ३८ टक्के मते मिळण्याची शक्यता आहे. तर महाविकास आघाडीला ३२ टक्के मते मिळण्याची शक्यता आहे. या मतांचे जागांमध्ये परिवर्तन केल्यास एनडीएला १३३ ते १४३, महा आघाडीला ८८ ते ९८, लोकजनशक्ती पार्टीला २ ते ६ जागा मिळण्याची शक्यता आहे. तर इतर पक्षांना ६ ते १० जागा मिळण्याची शक्यता आहे.तसेच या ओपिनियन पोलमधील आकडेवारीमध्ये बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या लोकप्रियतेत मोठी घट झाली असून, तेजस्वी यादव यांच्या लोकप्रितेत वाढ झाल्याचे दिसून आले आहे.समोर आलेल्या आकडेवारीनुसार राज्यातील पुढील मुख्यमंत्रिपदासाठी नीतीश कुमार यांना ३१ टक्के मतदारांनी पाठिंबा दिला. तर राजद नेते तेजस्वी यादव यांना २७ टक्के मतदारांनी पाठिंबा दिला. एनडीएपासून वेगळे होत स्वतंत्रपणे निवडणूक लढवणाऱ्या चिराग पासवान यांना ५ टक्के मतदारांनी पाठिंबा दर्शवला. तर भाजपाचे नेते सुशील कुमार मोदी यांना चार टक्के मतदारांनी पाठिंबा दिला. सर्वेमध्ये ३ टक्के मतदारांनी लालूप्रसाद यादव यांना ३ टक्के मतदारांनी समर्थन दिले.दरम्यान, नितीश कुमार यांच्या कारभारावर समाधानी असलेल्या मतदारांच्या संख्येमध्येही मोठी घट सर्वेमध्ये दिसून आली आहे. सर्वेत सहभागी झालेल्या राज्यातील ५२ टक्के मतदारांनी नितीश कुमार यांच्या कारभारावर समाधान दर्शवले. तर ४४ टक्के मतदारांनी नितीश कुमार यांच्या कारभाराबाबत असमाधान व्यक्त केले. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कारभारावर ६१ टक्के मतदारांनी समाधान आणि ३५ टक्के मतदारांनी असमाधान व्यक्त केले.बिहार विधानसभेच्या २४३ जागांसाठी तीन टप्प्यांमध्ये निवडणूक होणार आहे. २८ ऑक्टोबर, ३ नोव्हेंबर आणि ७ नोव्हेंबर रोजी बिहारमध्ये मतदान होणार आहे, तर १० नोव्हेंबर २०२० रोजी मतमोजणी होईल. नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखालील एनडीए आणि काँग्रेसच्या नेतृत्वाखालील महाआघाडीमध्ये चुरशीची लढाई अपेक्षित आहे.

टॅग्स :Bihar Assembly Election 2020बिहार विधानसभा निवडणूकBiharबिहारPoliticsराजकारणNitish Kumarनितीश कुमार