शहरं
Join us  
Trending Stories
1
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
2
चिन्मय दास यांच्या अटकेवरून बांगलादेशात हाहाकार! पोलिसांनी डागले 'ग्रेनेड', लाठीचार्जही केला; एकाचा मृत्यू
3
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
4
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
5
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
6
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
7
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
8
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
9
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
10
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
11
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
12
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
13
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
14
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
15
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
16
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
17
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
18
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले
19
TV, OTT, AI सगळं एकाच ठिकाणी; टीव्हीसोबतच मिळणार सगळ्याचं 'सबस्क्रिप्शन'
20
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील महायुतीच्या विजयानंतर, काँग्रेसची मोठी घोषणा; देशभरात खास मोहीम चालवणार 

विरोधकांकडून लोकसभा अध्यक्षांवर कागदाची उधळण, 10 खासदारांवर निलंबनाची कारवाई ?

By ऑनलाइन लोकमत | Published: July 28, 2021 4:08 PM

Parliament Monsoon Session: लोकसभेत 12 वाजेच्या सुमारास काही खासदारांनी लोकसभा अध्यक्षांवर कागद उडवले.

ठळक मुद्देआज  विरोधी पक्षातील नेत्यांनी संसदेतील चेम्बरमध्ये महत्त्वपूर्ण बैठक घेऊन पेगासस विषयावर चर्चा केली.

नवी दिल्ली:संसदेच्या पावसाळी अधिवेशनाला सुरुवात झाल्यापासून पेगॅससच्या माध्यमातून झालेल्या कथित हेरगिरीचा मुद्दा विरोधकांनी लावून धरला आहे. पॅगेससवरून चर्चेची मागणी करत विरोधकांनी संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये जोरदार घोषणाबाजी केली. त्यामुळे लोकसभा आणि राज्यसभेचं कामकाज अनेकदा तहकूब करण्यात आलंय. घोषणाबाजीसह आज सकाळी तर काही सदस्यांनी थेट अध्यक्षांवरच कागदांची उधळण केली. त्यामुळे या सदस्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात येण्याची शक्यता आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, आज 12 वाजेच्या सुमावार लोकसभेत विरोधकांनी पेगासस हेरगिरी प्रकरणावरुन प्रचंड गोंधळ घातला. सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करत काही खासदारांनी लोकसभा अध्यक्षांच्या खुर्चीजवळ आणि पत्रकारांच्या दालनाजळ जाऊन कागद फाडून उडवले. त्यांच्या या कृत्यामुळे आता त्यांच्यावर निलंबनाची कारवाई होऊ शकते. सरकार त्यांच्या निलंबनासाठी आज प्रस्ताव मांडेल.

याबाबत केंद्रीय मंत्री अनुराग ठाकुर म्हणाले की, संसदेत आपले मुद्दे उचलले जातील, असा विश्वास जनतेला असतो. पण, आज काँग्रेस आणि टीएमसीच्या खासदारांनी संसदेची मर्यादा तोडली. पत्रकारांच्या दालनात कागद फेकणे ही लोकशाहीसाठी लज्जास्पद बाब आहे. अनुराग ठाकूर यांच्यासह सत्ताधारी पक्षाच्या इतर सदस्यांनीही या घटनेबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली. भाजपा खासदार रामकृपाल यादव म्हणाले की, विरोधक संसदेत गुंडगिरी करत आहेत. सरकार संसदेत प्रत्येक मुद्द्यावर चर्चा करण्यास तयार आहे पण, विरोधी खासदार समाजकंटकांप्रमाणे संसदेत वर्तन करत आहेत.

राहुल गांधींसह विरोधी पक्षातील नेत्यांची बैठकदरम्यान, आज  विरोधी पक्षातील नेत्यांनी संसदेतील चेम्बरमध्ये महत्त्वपूर्ण बैठक घेऊन पेगासस विषयावर चर्चा केली. शिवसेना नेते खासदार संजय राऊत हेही या बैठकीला उपस्थित होते. त्यानंतर विरोधकांनी संसदेबाहेर पत्रकार परिषद घेत सरकारवर गंभीर आरोप केले. पेगॅससच्या माध्यमातून करण्यात आलेली हेरगिरी म्हणजे देशद्रोहच असल्याचं म्हणत काँग्रेस खासदार राहुल गांधींनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर थेट निशाणा साधला. 

टॅग्स :delhiदिल्लीBJPभाजपाcongressकाँग्रेसlok sabhaलोकसभाParliamentसंसद