शहरं
Join us  
Trending Stories
1
सर्वसामान्यांचे ₹ 1.8 लाख कोटी लुटणाऱ्यांची नावे उघड करा; राहुल गांधींचा SEBI वर हल्लाबोल
2
'लाडक्या बहिणी' कमळाला मत देतील, म्हणून हा जुगाड; भाजप आमदाराचा व्हिडीओ वडेट्टीवारांकडून पोस्ट!
3
राहुल गांधींचा पासपोर्ट रद्द करा... भाजप खासदाराचे लोकसभा अध्यक्षांना पत्र 
4
रशिया-युक्रेन युद्ध संपणार का? PM मोदी आणि झेलेन्स्कींची तीन महिन्यांत तिसऱ्यांदा भेट...
5
बदलापूर प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेचा मृतदेह अखेर नातेवाईक घेणार ताब्यात
6
"...तर विरोधकांचाही 'त्या' एन्काउंटरला पाठिंबा असेल"; नाना पटोलेंनी शिंदे सरकारला दिलं चॅलेंज
7
"मग नंतर तो कधी शिकणार?"; यशस्वी जैस्वालबद्दल पाकिस्तानी माजी क्रिकेटरचं रोखठोक मत
8
निवडणुकीदरम्यान मतभेद बाजूला ठेवा, गटबाजी खपवून घेणार नाही, अमित शाहांनी टोचले कान
9
Gayatri Shingne : राजेंद्र शिंगणेंविरोधात पवारांचा उमेदवार ठरला? गायत्री शिंगणे लढवणार विधानसभा!
10
राज्यातील विविध तीर्थक्षेत्र विकासांच्या ३०५ कोटी रुपयांच्या आराखड्यांना मंजुरी
11
६ लाख मोबाईल फोन बंद, ६५ हजार URLs ब्लॉक... सायबर फ्रॉड रोखण्यासाठी सरकारची मोठी कारवाई
12
जयंत पाटलांचं अजित पवारांना नवं चॅलेंज; "मोदींकडून एवढं काम करून घेतलं, तर..."
13
जोगेश्वरी पूर्व विधानसभा मतदारसंघावरून शिवसेना शिंदे गट आणि भाजपात रस्सीखेच
14
राहुल गांधी यांच्याविरोधात तामिळनाडुतील 30 पोलिस ठाण्यात तक्रारी; कारण काय?
15
ऑडिशनमध्ये १०० वेळा रिजेक्ट झाला 'हा' स्टारकिड; डिप्रेशनचाही केला सामना, म्हणाला...
16
"अक्षय शिंदेला गोळ्या घालून मारणं फारच सहज झालं, त्याला...", उदयनराजेंची संतप्त प्रतिक्रिया
17
"आता मी एकालाही जिवंत सोडणार नाही", अक्षय शिंदेच्या एन्काऊंटरपूर्वी काय घडलं?
18
Harini Amarasuriya : हरिणी अमरसूर्या बनल्या श्रीलंकेच्या नव्या पंतप्रधान, या पदावर विराजमान होणाऱ्या देशातील दुसऱ्या महिला
19
IND vs BAN : दुसऱ्या कसोटी सामन्यापूर्वी पोलिसांची मोठी कारवाई; 'त्या' २० जणांवर FIR दाखल
20
"आम्हा तिघांनाही CM व्हायचंय, पण निर्णय हायकमांडचा", रणदीप सुरजेवालांनी केले मोठे वक्तव्य

पुढील लोकसभेसाठी विरोधकांनी एकत्र यावे, काँग्रेस पक्षाध्यक्ष सोनिया गांधी यांचे आवाहन

By ऑनलाइन लोकमत | Published: August 21, 2021 6:28 AM

Sonia Gandhi : काँग्रेससह २० बिगरभाजप पक्षाच्या नेत्यांच्या शुक्रवारी घेतलेल्या बैठकीत सोनिया गांधी बोलत होत्या.

- व्यंकटेश केसरी

नवी दिल्ली : स्वातंत्र्य चळवळीने देशाला दिलेली मूल्ये मानणारे सरकार २०२४च्या लोकसभा निवडणुकांनंतर सत्तेवर आणायचे आहे, असा निर्धार करून बिगरभाजप पक्षांनी आपली धोरणे आखावीत, असे आवाहन काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी केले आहे. हे ध्येय आपण एकजुटीने साध्य करू. त्याशिवाय आपल्याकडे अन्य पर्यायही नाही, असेही त्या म्हणाल्या.

काँग्रेससह २० बिगरभाजप पक्षाच्या नेत्यांच्या शुक्रवारी घेतलेल्या बैठकीत सोनिया गांधी बोलत होत्या. केंद्र सरकारने सहकार हे नवीन खाते स्थापन करून केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे त्या खात्याची जबाबदारी दिली आहे. केंद्राची ही कृती म्हणजे राज्यांच्या व राज्य सरकारांच्या अधिकारात ढवळाढवळ आहे, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी म्हटले होते.

बिगरभाजप राज्यांना लसपुरवठा करण्यात केंद्र सरकार पक्षपात करीत आहे, असा आरोप पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी व महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केला होता. त्याचाही उल्लेख सोनिया गांधी यांनी आपल्या भाषणात केला.सोनिया गांधी म्हणाल्या की, सार्वजनिक महत्त्वाच्या व तातडीच्या विषयांवर संसदेमध्ये चर्चा न करण्याचा अत्यंत उद्धट पवित्रा केंद्र सरकारने घेतला. त्यामुळे संसदीय पावसाळी अधिवेशन अक्षरश: वाया गेले. या अधिवेशनात विरोधकांनी दाखविलेली एकजूट संसदेच्या आगामी अधिवेशनांमध्येही कायम ठेवावी, असे आवाहन काँग्रेस पक्षाध्यक्ष सोनिया गांधी यांनी केले.

बसप, सप बैठकीला अनुपस्थित२० बिगरभाजप पक्षांची संसदेच्या पावसाळी अधिवेशनानंतर झालेली पहिलीच बैठक आहे. या बैठकीत समाजवादी पक्ष, बहुजन समाज पक्ष यांनी हजेरी लावली नव्हती. मात्र देशातील इतर प्रमुख पक्षांच्या नेत्यांनी हजेरी लावल्याने विरोधी आघाडीची चर्चा जोरात सुरू झाली आहे.

२०२४ जिंकण्यासाठी २० विरोधी पक्षांची बैठककाँग्रेससह २० बिगरभाजप पक्षाच्या नेत्यांशी शुक्रवारी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून बैठक पार पडली. या बैठकीला पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन, झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन, माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री डॉ. फारुक अब्दुल्ला, माकपचे सरचिटणीस सीताराम येचुरी, लोकतांत्रिक जनता दलाचे नेते शरद यादव, काँग्रेस नेते राहुल गांधी आदी नेते हजर होते.

लोकशाहीवर विश्वास ठेवणाऱ्या पक्षांनी एकत्र यावे : शरद पवारदेशापुढील सर्व समस्या सोडविण्यात केंद्र सरकार अपयशी ठरले आहे. त्यामुळे सेक्युलर विचारसरणी व लोकशाहीवर विश्वास असलेल्या सर्व पक्षांनी सध्याच्या स्थितीचा विचार करून एकत्र येण्याची गरज आहे, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी बिगरभाजप पक्षांच्या बैठकीत सांगितले. ते म्हणाले की, सर्व प्रश्नांवर एकत्रितरीत्या चर्चा करण्याऐवजी प्राधान्यक्रमाने एकेक प्रश्न घेऊन तो सोडवूया. त्यातून देशाला उत्तम भवितव्य देण्याचा प्रयत्न करूया, असेही आवाहन शरद पवार यांनी केले.बिगरभाजप पक्षांची आघाडी स्थापन व्हावी यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या दिल्लीतील निवासस्थानी काही दिवसांपूर्वी बैठक झाली होती. 

टॅग्स :Sonia Gandhiसोनिया गांधीSharad Pawarशरद पवारcongressकाँग्रेस