मुंबई – सत्ताधारी आणि विरोधी पक्षातील कार्यकर्त्यांमध्ये सोशल मीडियावर अनेकदा वादविवाद रंगत असतात. दोन्ही बाजूचे कार्यकर्ते आपापल्या पक्षाच्या बाजूने समोरच्याला उत्तर देतात. आगामी काळात पक्षाच्या कार्यकर्त्यांनी कोरोनाचं भान राखत आक्रमक पद्धतीने काम करावं, टीकेला जशास तसे उत्तर द्यावं असे आदेश भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी कार्यकर्त्यांना दिले आहेत.
भाजपा प्रदेश पदाधिकारी बैठकीत ते बोलत होते, यावेळी चंद्रकांत पाटील म्हणाले, कोरोनामध्ये लोकांना मदत करुन राज्य सरकारविरोधात आंदोलन केले, आगामी काळात विविध मुद्द्यांवरुन पक्षाला आंदोलन करावं लागेल, कोरोनाच्या लढाईत पक्षाच्या कार्यकर्त्यांनी लोकांनी मदत करावी, लोकांच्या अडीअडचणीला धावून जा, सामान्य माणसांच्या प्रश्नावर रस्त्यावर उतरुन आंदोलन करावं लागणार आहे असं त्यांनी सांगितले.
तसेच सत्ताधाऱ्यांनी मृतदेहाच्या बॉडी बॅगचा भ्रष्टाचार सुरु केला, मृताच्या टाळूवरचं लोणी खाण्याचं काम केले आहे. कोट्यवधीचा भ्रष्टाचार केला आहे, कोरोना काळातील भ्रष्टाचार उघड करावा लागेल, खूप मोठी राजकीय लढाई लढावी लागणार आहे. विरोधी पक्ष म्हणून प्रभावीपणे जबाबदारी पार पाडावी लागणार आहे. कोणी टरबुज्या म्हणतं, चंपा म्हणतं पलटवार केला पाहिजे असंही चंद्रकांत पाटील म्हणाले.
त्याचसोबत प्रचंड आक्रमक पद्धतीने विरोधी कार्यकर्त्यांना उत्तर द्यावा, शांत बसणं म्हणजे मान्य करणे असं होतं, शब्द जपून वापरा जेणेकरुन ते मागे घ्यावं लागणार नाही. शब्दांची धार वापरा, कोरोनाच्या परिस्थितीचं भान ठेवत आक्रमक राहिलं पाहिजे असे आदेश भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी कार्यकर्त्यांना दिले आहेत.
दरम्यान, येणाऱ्या काळात स्वबळावर सरकार आणण्यासाठी कार्यकर्त्यांनी तयार राहावं असं भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी नड्डा यांनी सांगितले. त्यामध्ये आम्ही यापुढे राज्यात कोणतीही निवडणूक एकत्र लढणार नाही, वेगळी लढणार, निवडणुकीनंतर एकत्र येण्यावर चर्चा होईल. मात्र अद्याप ४ वर्ष आहेत, यादरम्यान शिवसेनेच्या बाजूने प्रस्ताव आला तरी निवडणूक वेगळी लढू, प्रस्ताव आल्यास केंद्रीय नेतृत्व विचार करेल, केंद्रीय नेतृत्वाने आदेश दिल्यास आम्ही एकत्रही येऊ असंही त्यांनी सांगितले.
अन्य महत्त्वाच्या बातम्या
राज्याच्या हितासाठी एकत्र यायला तयार, पण निवडणुका वेगळ्या लढू; शिवसेनेबाबत भाजपाचं मोठं विधान
शिक्षण पूर्ण करण्यासाठी 'त्याने' पहाटे ४ वाजता उठून कार धुण्याचं काम केलं, बारावीत मिळाले ९१ % गुण
सोन्याच्या दराने बनवला नवा रेकॉर्ड तर चांदीही करणार मालामाल; जाणून घ्या आजचे दर
केंद्र सरकारकडून महाराष्ट्राला मोठं गिफ्ट; राज्याला दिला १९ हजार २३३ कोटी जीएसटी परतावा